चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ ऑक्टोबर २०१९

Date : 25 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्र विधानसभा निकाल २०१९

 

Money Laundering Case : काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर
  • नवी दिल्ली : अर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

  • डी.के.शिवकुमार यांचा आज (बुधवारी) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

  • 25 लाख रूपयांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

“मुख्यमंत्रिपद हवं असल्यास आमच्यासोबत या”
  • विधानसभा निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

  • मुख्यमंत्रिपदासाठीही आता रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी निकालानंतर पत्रकार परिषद घेतली.

  • जागावाटपाच्या वेळी वाटाघाटी केल्या परंतु आता प्रत्येक वेळी अडचण समजून घेणार नसल्याचं सांगत अप्रत्यक्षरित्या उद्धव यांनी भाजपाला इशारा दिला.

  • त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर देत भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आपल्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार असं म्हटलं.

धोनीचं भारतीय संघात पुनरागमन आता विसरा ! निवड समितीने घेतला कठोर निर्णय
  • महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात पुनरागमन कधी करणार हा प्रश्न गेले काही दिवस देशातील क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे.

  • २०१९ मध्ये विश्वचषकात भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या स्पर्धेत धोनी आपल्या संथ फलंदाजीमुळे टिकेचा धनी बनला होता.

  • यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत धोनीने विश्रांती घेणं पसंत केलं होतं.

  • डिसेंबर महिन्यात घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध मालिकेत धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल अशी चर्चा होती, मात्र ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार निवड समिती आता धोनीला भारतीय संघात स्थान देण्याच्या मनस्थितीत नाहीये.

हरयाणात त्रिशंकू स्थिती
  • चंदीगड : हरयाणात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस असून, त्यांच्यापैकी कुणीही बहुमत मिळवण्याच्या स्थितीत नाही.

  • त्यामुळे दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पार्टी (जेजेपी) आणि अपक्ष यांची सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका राहण्याची शक्यता आहे.

  • ९० सदस्यांच्या विधानसभेत ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेल्या भाजपला ४० जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या आहेत.

पोटनिवडणुकीत भाजप, घटक पक्ष पहिल्या क्रमांकावर
  • देशातील १८ राज्यांमधील विधानसभेच्या ५१ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भाजप आणि घटक पक्षांनी २६ जागांवर विजय मिळविला तर काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळविला आहे.

  • एआयएमआयएमने बिहारमध्ये एक जागा पटकावून आपले खाते उघडले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपाने सत्तारूढ भाजप आणि बसपकडून प्रत्येकी एक जागा हिसकावून घेतली आहे.

  • तर गुजरातमध्ये सत्तारूढ भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. 

  • बिहारमध्ये सत्तारूढ जद(यू)ला मोठा धक्का बसला आहे, जद(यू)ने चार जागा लढविल्या होत्या त्यापैकी केवळ एकाच जागेवर त्यांना विजय मिळाला आहे.

  • पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राजदने दोन तर एआयएमआयएमने एक जागा पटकावली आहे. उर्वरित जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.

  • १९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.

  • १९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.

  • २००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

जन्म 

  • १८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी१९२०)

  • १८८१: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

  • १९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै २०११)

  • १९४५: अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६४७: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८)

  • १९५५: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२१)

  • १९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

  • १९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९२१)

  • २००३: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)

  • २००९: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९२३)

  • २०१२: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.