चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ मार्च २०२०

Date : 26 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी सरकारच्या ‘लॉकडाउन’ला यश, भारतातील करोनाग्रस्त वाढण्याचा वेग मंदावला : 
  • जगभरामध्ये करोना विषाणूचा संर्सग वाढत असताना देशामध्येही करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसावे असं आवाहन मोदींनी केलं आहे.

  • करोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसांच्य लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या आकडेवारी लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या कमी प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी दुपारी बारावाजेपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढला. बुधवारी दुपारी देशामध्ये ५३९ करोनाग्रस्त रुग्ण होते. हीच संख्या मंगळवारी ६७ ने वाढला होता.

  • सध्या ही बातमी सकारात्मक असली तरी ही प्राथमिक आकडेवारी आहे. अमेरिका आणि भारताची तुलना केली असता अमेरिकेतील रुग्णांची संख्या ही भारतापेक्षा अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील पाच दिवसांमध्ये भारतातील करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली आहे. याच वेगाने करोनाग्रस्तांची संख्या वाढत राहिल्यास या आठवड्याच्या शेवटपर्यंत भारतातील करोनाग्रस्तांची संख्या एक हजारहून अधिक असेल.

  • पहिल्या २४ तासांमध्ये करोनाग्रस्तांचा देशातील संख्या वाढण्याची गती मंदावली असली तरी लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी अनेक लोकांनी जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळालं. त्यामुळे सरकारी प्रयत्नांना जास्तीत जास्त यश यावे म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंनी नागरिकांना २१ दिवस जास्तीत जास्त काळ घऱात थांबू आणि करोनाला हरवू अशापद्धतीचे आवाहन केल्याचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.

देशातील टोलनाक्यांवर तात्पुरती टोल वसुली बंद; गडकरींची घोषणा : 
  • देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केला आहे. दरम्यान. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांवर तात्पुरता टोल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • आपात्कालिन सेवांना काम करण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर तात्पुरत्या स्वरूपात टोल बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यामुळे आपात्कालिन सेवा देणाऱ्यांच्या वेळेचीही बचत होईल, असं ते म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली.

  • आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांच्या दुरूस्तीचं काम आणि टोल नाक्यांवरील आपात्कालिन सेवा सुरू राहणार असल्याचं गडकरी म्हणाले. सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर महामार्ग आणि त्यांच्या राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

  • केवळ आपात्कालिन वाहनांनाच ये-जा करण्याची परवानगी असते. याव्यतिरिक्त केवळ जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारे ट्रक, सरकारी वाहनं आणि रुग्णवाहीकांनाच जाण्याची परवानगी आहे. योग्य ते कारण दिल्यासच खासगी वाहनांना पोलिसांकडून जाण्यायेण्याची परवानगी देण्यात येते.

आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार ४ महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार : 
  • करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचं काम आहे. याची पूरेपूर जाणीव असल्यानेच ओडिशातील नवीन पटनाईक सरकारने आरोग्यविभागाच्या कर्माचाऱ्यांना ४ महिन्यांचा अॅडव्हान पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • करोना विषाणूचा देशभरात वेगाने फैलाव होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आजवर देशात ११ करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले आहेत. राजधानी दिल्लीत दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूत देखील एक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा हा ५६२वर पोहोचला आहे.

  • या पार्श्वभूमीवर करोनाच्या वाढत्या संकटाचा अंदाज घेऊन ओडिशा सरकारने आपले अनेक जिल्हे यापूर्वीच लॉकडाऊन केले होते. त्यानंतर मंगळवारी मध्य रात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर : 
  • करोनाच्या भीतीमुळे संपूर्ण देशभरात २१ दिवसांकरिता पूर्णपणे संचारबंदी करण्यात आल्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) रद्द करण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

  • ‘बीसीसीआय’ने काही दिवसांपूर्वीच आयपीएलचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकले होते. करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले तरच आयपीएल स्पर्धा होणे शक्य होते. पण करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सद्यस्थितीला ५००पेक्षा रुग्णांना करोनाची बाधा झाली असून १० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

  • टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षांने पुढे ढकलण्यात आल्यानंतर सध्याची परिस्थिती आणखीनच खडतर होत चालली आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने सांगितले.

२६ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.