चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ नोव्हेंबर २०१९

Updated On : Nov 26, 2019 | Category : Current Affairsव्हीप म्हणजे काय?, तो का काढतात?; जाणून घ्या :
 • राज्यामधील राजकीय पेच अधिक गुंतागुंतीचा होत असतानाच आता बहुमत सिद्ध करण्याचे राजकारण थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता कोण इथपर्यंत येऊन पोहचले आहे. राष्ट्रवादीचा गटनेता कोण ठरणार यावरुनच बहुमताचे आणि पर्यायाने सध्याचे सरकार टीकणार की पडणार याचा निकाल लागणार आहे.

 • विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जयंत पाटील यांचीच नोंद असल्याची माहिती समोर येत असतानाच भाजपाने अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचा दावा केला आहे.

 • त्यामुळेच आता राष्ट्रवादीच्या गटनेतापदावरुन वाद सुरु झाला आहे. गटनेतापदावरुन वाद सुरु होण्याचे मुख्य कारण म्हणजे गटनेत्याला असलेला व्हीप काढण्याचा अधिकार. पण व्हीप म्हणजे नक्की काय? तो कसा काढला जातो आणि त्याचे सध्या इतके महत्व का आहे हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न..

सत्तापेचावर आज निकाल :
 • राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता निकाल देणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी किती कालावधी द्यायचा याबाबत न्यायालय आदेश देईल. सोमवारी न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला, पण निकाल राखून ठेवला.

 • सर्वोच्च न्यायालयात रविवारी झालेल्या विशेष सुनावणीत न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना तीन दस्तऐवज सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार, राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथविधीसाठी दिलेल्या आमंत्रणाचे पत्र, राज्यपालांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले १७० सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

 • राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे.

 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी २२ नोव्हेंबर रोजी निवड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही अजित पवार यांनी राज्यपालांना दिले आहे. हे पत्रही न्यायालयाला सादर केले असल्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले.

सुभाष चंद्रा यांचा ZEEच्या चेअरमनपदाचा राजीनामा :
 • झी इंटरटेनमेंट इंटरप्रायजेस लिमिटेडचे (ZEEL) प्रवर्तक सुभाष चंद्रा यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. कंपनीने देखील त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. यानंतर चंद्रा आता गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील. तसेच चंद्रा यांच्याकडे आता केवळ कंपनीचे पाच टक्के शेअर्स राहतील.

 • एस्सेल समूहावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी उद्योजक सुभाष चंद्रा गोयल यांनी नुकताच झी एंटरटेनमेंटमधील १६.५ टक्के हिस्सा विकण्याच्या निर्णय घेतला होता. ही हिस्सेदारी विकल्यानंतर एस्सेल समुहावर ६००० कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक राहिल. झी समूह ९० टीव्ही चॅनेल चालवते.

 • १९९२ मध्ये झीने देशात पहिल्यांदा सॅटेलाईट चॅनेलची सुरुवात केली होती. समूहाने सप्टेंबरमध्ये झी एंटरटेनमेंटमधील ११ टक्के हिस्सा ४,२२४ कोटी रुपयांना इन्व्हेस्को-ऑपेनहायमर या मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक कंपनीला विकला होता.

दादासाठी कायपण ! BCCI संविधानातला महत्वाचा नियम बदलण्याच्या तयारीत : 
 • BCCI च्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची वर्णी लागली. गांगुलीच्या आगमनानंतर बीसीसीआय संघटनेत मोठे बदल व्हायला सुरुवात झाली. गेली अनेक वर्ष दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार देणाऱ्या भारतीय संघाने गांगुलीच्या पुढाकारामुळे बांगलादेशविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना मिळाला.

 • मात्र लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींनुसार गांगुलीचं हे अध्यक्षपद औट घटकेचं ठरणार आहे. तरीही सौरव गांगुली बीसीसीआयमध्ये अध्यक्षपदी रहावा यासाठी आता बीसीसीआय आपल्या संविधानातील महत्वाचा नियम बदलण्याच्या तयारीत आहे.

 • बीसीसीआय आपल्या संविधानातील Cooling-off period या नियमात बदल करण्याच्या विचारात आहे. आपल्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवीन अधिकारी या विषयावर चर्चा करतील. संघटनेचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी ही माहिती दिली.

दिनविशेष :

 • आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन / भारतीय संविधान दिन

मत्त्वाच्या घटना 

 • १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.

 • १९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.

 • १९४९: भारताची घटना मंजूर झाली.

 • १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

 • १९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

 • १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.

 • १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

 • १९९८: खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.

 • १९९९: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

 • २००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

 • २००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६/११ म्हणून ओळखले जाते.

जन्म 

 • १८८५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७५)

 • १८९०: भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७७)

 • १८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.

 • १९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)

 • १९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०११)

 • १९१९: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०११)

 • १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ – नडियाद, गुजराथ)

 • १९२३: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)

 • १९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २०१४)

 • १९२४: भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.

 • १९२६: भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.

 • १९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

 • १९३८: ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.

 • १९३९: अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म.

 • १९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.

 • १९५४: एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २००९)

 • १९६१: कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.

 • १९७२: हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.

 • १९८३: फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८९९)

 • १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. (जन्म: २ मे १८९९)

 • १९९९: पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचे निधन.

 • २००१: शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन.

 • २००८: मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह १७ पोलीस कर्मचारी शहीद.

 • २०१२: भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)

 • २०१६: रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)