चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ डिसेंबर २०१९

Date : 27 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘सेट’ परीक्षा २८ जूनला : 
  • पुणे : राज्यात सहायक  प्राध्यापक  होण्यासाठी अनिवार्य असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) येत्या २८ जूनला होणार आहे. सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी १ ते २१ जानेवारीदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येईल. यंदाही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होईल.

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक  तत्त्वांनुसार ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी एकूण ३०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. पहिली १०० गुण आणि दुसरी प्रश्नपत्रिका २०० गुणांची असेल. दोन्ही प्रश्नपत्रिकांची परीक्षा एकाच दिवशी होईल. पहिली प्रश्नपत्रिका सर्वासाठी समान असेल. दुसरी प्रश्नपत्रिका निवडलेल्या विषयाची असेल. ३२ विषयांसाठी ही परीक्षा होईल. गेल्या वर्षीच्याच धर्तीवर यंदाची परीक्षा होईल. त्यामुळे पात्रता, विषय, अभ्यासक्रम सारखाच असेल, अशी माहिती सेट विभागाचे समन्वयक  डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली.

  • नॉन क्रीमीलेअर गटातील विद्यार्थ्यांकडे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आर्थिक वर्षांतील वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास गटाचे आरक्षणही या परीक्षेला लागू असेल. आरक्षण आणि विषयाची अचूक निवड करावी. त्यात काही चूक झाल्यास दुरुस्तीसाठी अवधी दिला जातो. मात्र, त्यानंतर दुरुस्ती करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा, असेही डॉ. कापडणीस यांनी स्पष्ट केले.

चालकाची लेक कॅनडातील डिझायनिंग स्पर्धेत जगात तिसरी : 
  • वडील रात्रंदिवस तिच्या उज्वल यशासाठी टमटम चालवतात, घरची गरिबी. आई-वडिलांचे शिक्षणही जेमतेम. पण आपल्या वडिलांचे नाव जिद्दीने कॅ नडासारख्या विक सित देशात ज्या मुलीने मोठे केले ती म्हणजे सुषमा. आंतरराष्ट्रीय डिझाईनिंग स्पर्धेत जगात तिसरी आली आहे, ती मूळची कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील. आता तिला हाँगकोँग येथे दोन वर्षे उच्च शिक्षणासाठी जायचं आहे पण हाती पैसा नाही त्यासाठी तिचे वडील याचना करत आहेत.

  • कॅनडा येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी कोरल ड्रॉ इंटरनॅशनल स्पर्धा नुक त्याच पार पडल्या त्यात हजारो स्पर्धक  सहभागी झाले होते. कु मारी सुषमा अंबादास सोनवणे हिने स्पर्धेची तयारी क रून त्यात भाग घेतला आणि चक्क तिचा जगात तिसरा तर  भारत देशात पहिला क्रमांक  आला आहे.  त्याबद्दल तिला एक लाख १७ हजार रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.  सुषमा सोनवणे हिचे  प्राथमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती संभाजी विद्यालय कोळपेवाडी येथे चौथीपर्यंत झाले. त्यानंतर पाचवी ते बारावीचे शिक्षण राधाबाई कोळे क न्या विद्यालय को ळपेवाडी कोपरगाव येथे झाले. 

  • गुण चांगले मिळाल्याने तिने यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलयात डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिला टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये क रिअर करायचं होतं, त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. कोल्हापूरच्या इचलक रंजी येथील दत्ताजी कदम टेक्स्टाईल इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवला.  तेथे ती आता बी टेक  शेवटच्या वर्षांत शिक त आहे. शिक्षण घेत असतानाच तिने डिझाइनिंगच्या असंख्य स्पर्धेत यश मिळवले.  सध्या बेंगलोर येथे प्रशिक्षण सुरू आहे.  

  • कॅ नडा येथे झालेल्या कोरल ड्रॉ इंटरनॅशनल स्पर्धेत तिचा जगात तिसरा क्रमांक आला. त्याच्या जोरावर तिला आता जपानमधील हाँगकोँग येथे दोन वर्षांचा अभ्यासक्रम शिकोयचा आहे.   परदेशात शिक्षण घेणं सोपं नाही, पण तिने आपल्या वडिलांना सांगितलं मला शिकोयचं आहे.  

‘नागरिकत्व दुरुस्ती’साठी ३ कोटी कुटुंबांशी संवाद :
  • नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिकत्व नोंदणी या दोन्ही मुद्दय़ांबाबत लोकांचा विरोधी दृष्टिकोन बदलण्यासाठी भाजपने देशव्यापी जनजागृती मोहीम हाती घेतली असून ती ५ ते २० जानेवारी या पंधरा दिवसांमध्ये राबवली जाणार असून ३ कोटी कुटुंबांशी संवाद साधला जाणार आहे.

  • राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेची सुरुवात ५ जानेवारी रोजी पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशातील भाजपचे प्रमुख ५० नेत्यांच्या हस्ते होणार आहे. नड्डा यांच्या उपस्थितीत गुरुवारी मोहिमेची सविस्तर आखणी करण्यात आली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व नोंदणी देशव्यापी नसेल अशी ग्वाही देऊनसुद्धा नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिक नोंदणी विरोधातील जनआंदोलन कमी झालेले नाही. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलायचा कसा, असा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला असल्यामुळे तातडीने पक्षाची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

IAF चा पराक्रमी ‘बहादूर’ आज होणार निवृत्त : 
  • इंडियन एअर फोर्सचं अत्यंत घातक विमान MIG-27 उद्या सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-२७ विमानांची तुकडी उद्या शेवटचं उड्डाण करणार आहे. मिग-२७ फायटर विमाने इंडियन एअर फोर्सच्या वैभवशाली परंपरेची साक्षीदार आहेत. मागच्या चार दशकापासून ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती.

  • जोधपूर एअर बेसवर मिग-२७ ची शेवटची स्क्वाड्रन तैनात असून या स्क्वाड्रनमध्ये सात विमाने आहेत. “मिग-२७ चे स्क्वाड्रन आज आपले शेवटचे हवाई कौशल्य सादर करेल. त्यानंतर ही विमाने निवृत्त होईल. देशभरात पुन्हा कुठेही ही विमाने उड्डाण करणार नाहीत” अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल सोमबीत घोष यांनी दिली.

२७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.