चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ डिसेंबर २०१९

Date : 31 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी : 
  • भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअॅक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता 5Gच्या चाचण्या घेणार आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे.

  • यापूर्वी 4G इंटरनेट सुविधेमुळे भारतातल्या इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. यामुळे लोकांच्या हातातील जुन्या आणि मर्यादित सुविधा उपलब्ध असणारे मोबाईल फोन जाऊन त्याची जागा स्मार्टफोन्सनी घेतली. यानंतर आता भारत इंटरनेटच्या दुनियेत आणखी मोठ्या बदलावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • सरकार टेलिकॉम क्षेत्रातील सर्व कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटणार आहे. त्यासाठी आम्ही 5G तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. यापुढे 5Gचं आता भविष्य आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणार आहोत. सर्व टेलिकॉम कंपन्या या तंत्रज्ञानाच्या चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.

आधार आणि पॅन लिंक करण्यास ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ : 
  • ज्यांनी अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या संपणार होती. मात्र आधार-पॅन लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. आत्तापर्यंत मुदतवाढ देण्याची ही आठवी वेळ आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एक निर्णय दिला होता. ज्यानुसार आधार कार्ड आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड हवं असल्यास बंधनकारक आहे. 1 जुलै 2017 पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.

  • आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI कडून भारतातल्या नागरिकाला मिळते. तर पॅन हा दहा अंकांचा क्रमांक आयकर विभागाकडून दिला जातो. हा क्रमांक एखाद्या व्यक्तीचा किंवा कंपनीचा असू शकतो.

  • आधार आणि पॅन कार्ड कसे लिंक कराल?

  • https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाईटवर जा

  • त्यानंतर डाव्या बाजूला Link Aadhaar हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा

SBI एटीएममधून पैसे काढण्यासाठी एक जानेवारीपासून नवीन नियम : 
  • देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. बँक ‘वन-टाइम पासवर्ड'(OTP) आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली अंमलात आणणार आहे. उद्यापासून अर्थात 1 जानेवारी 2020 पासून ही नवीन प्रणाली अंमलात येईल.

  • एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे. ओटीपी प्रणालीअंतर्गत रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला बँकेकडे असणाऱ्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.

  • हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांना लागू असेल. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिलीये. यामुळे अवैध व्यवहार रोखू शकतील असे बँकेचे म्हणणे आहे.

पंतप्रधान मोदींना दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिला सल्ला : 
  • सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी आणि एनआरपीच्या मुद्यावरून मोदी सरकारवर सिनेक्षेत्रातील काही कलाकारांकडून टीका केली जात आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही सरकारच्या निर्णयांना विरोध केला आहे. त्यानं सातत्यानं याविषयी भूमिका मांडली असून, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं. “स्वदेशात तयार करण्यात आलेल्या वस्तूंना आपण प्रोत्साहन देऊ शकतो का? २०२२मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावी,” असं मोदी म्हणाले होते.

  • पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनावर दिग्दर्शक अनुराग कश्यपनं बोचरी टीका केली आहे. अनुराग कश्यपनं रिट्विट करून उत्तर दिलं आहे. अनुराग कश्यप म्हणाला, “सर, सूर्यग्रहण बघण्यासाठीचे चष्मे आपल्या इथेही तयार केले जातात,” असा सल्ला स्वदेशी वस्तूंच्या खरेदी करण्याच्या आवाहनावर मोदींना दिला आहे.

३१ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.