चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ मार्च २०२०

Date : 31 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोनाचे जगभरात आतापर्यंत ३४ हजार ६१० बळी : 
  • करोनाची लागण झाल्याने जगभरात आतापर्यंत ३४ हजार ६१० जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोनतृतीयांशहून अधिक जणांचा युरोपमध्ये मृत्यू झाला आहे, असे अधिकृत सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

  • जगभरातील १८३ देशांमध्ये एकूण सात लाख २७ हजार ०८० जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी एक लाख ४२ हजार ३०० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.

  • इटलीमध्ये करोनामुळे फेब्रुवारी महिनाअखेरीस एकाचा मृत्यू झाला, मात्र इटलीमध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजार ७७९ इतकी झाली आहे. तर एकूण ९७ हजार ६८९ जणांना लागण झाली असून १३ हजार ३० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.

  • स्पेनमध्ये सात हजार ३४० जणांचा करोनामुळे बळी गेला असून त्यामध्ये गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या ८१२ जणांचा समावेश आहे आणि ८५ हजार १९५ जणांना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारपासून स्पेनमध्ये दिवसभरात घेतलेल्या बळींचा संख्या प्रथमच कमी झाली असून इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. स्पेनमध्ये  १४ मार्चला टाळेबंदी लागू करण्यात आली असून त्यात लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले आहे.

महाराष्ट्राला २५ हजार कोटींचं पॅकेज देण्याची केंद्राकडे मागणी : 
  • करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा एक हजार २५१ वर पोहोचला आहे, तर ३२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.

  • दुसरीकडं लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र आर्थिक कोंडी अडकला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्रानं २५ हजार कोटींचं विशेष पॅकेज मंजुर करावं, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता केली आहे.

छत्तीसगढ सरकारचा मोठा निर्णय; आता १४ नाही तर २८ दिवसांचं होम आयसोलेशन :
  • करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सर्व राज्य सरकारदेखील आपापल्या पातळीवर योग्य ती पावलं उचलत आहेत. यादरम्यान करोनाच्या संशयित रूग्णांबाबत छत्तीसगढ सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता करोनाच्या संशयितांना १४ नाही तर २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

  • दरम्यान, सुकमा जिल्ह्यात तेलंगणहून आलेल्या अनेक गावकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी १०० बेड असलेले आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी करोनाच्या संशयित रूग्णांना ठेवण्यात आलं आहे, शेजारी राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता सुकमा जिल्ह्यात आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे.

  • करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आता छत्तीसगढ सरकारच्या निर्देशाप्रमाणे करोना संशयितांना १४ ऐवजी २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, तेलंगण सरकारनंही करोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. निझामुद्दीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या नवीन तारखा जाहीर :
  • जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका, जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेलाही बसला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने परिस्थितीचं गांभीर्य ओळखत ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली आहे. २०२१ साली होणाऱ्या या स्पर्धेच्या नवीन तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार असल्याचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय.

  • गेल्या काही दिवसांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्या-ज्या संघटनांनी हातभार लावला आहे, त्या सर्वांचा मी आभारी आहे.

  • जपान सरकार, टोकियोचं स्थानिक प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने आपण या संकटाचा सामना करु असा मला विश्वास आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी आभार मानले. इतर महत्वाच्या स्पर्धांसोबत ऑलिम्पिकचं आयोजन होणार नाही याची काळजी घेऊन नवीन तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

३१ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.