चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ ऑक्टोबर २०१९

Date : 31 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, देशभरात रन फॉर युनिटीचं आयोजन :
  • नवी दिल्ली : 'लोहपुरुष' सरदार पटेल यांची 144 वी जयंती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे देशात ठिकठिकाणी रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'रन फॉर युनिटी'ला फ्लॅग ऑफ केला. दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममधून रन फॉर युनिटीला सुरुवात झाली.

  • त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील केवडियाला जाऊन 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला अभिवादन केलं. सोबतच पंतप्रधान एकता दिवस परेडमध्ये भागही घेणार आहे.

  • तसंच टेक्नॉलॉजी डेमो साईटचा दौरा करतील आणि केवडियामध्ये सिव्हिल सर्व्हिस प्रोबेशनर्ससोबत बातचीत करणार आहेत.

मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश :
  • नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार उद्या 31 ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार असून, या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे. सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.

  • जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येणार आहेत. गुरुवार, ३१ ऑक्टोबरपासून हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश कार्यरत होतील. केंद्र सरकारने गुजारातमधील सनदी अधिकारी जी सी मुरमू यांची जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आली आहे. तर राधाकृष्ण माथूर यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.

  • जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असणार आहे. दिल्लीप्रमाणेच विधानसभा, नायब राज्यपाल यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मिरचा कारभार चालणार आहे. तर लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा असणार नाही. या प्रदेशाचा कारभार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नायब राज्यपालांच्या माध्यमातून पाहिला जाणार आहे.

‘इंडिगो’कडून ‘एअरबस’ला तब्बल ३०० विमानांची ऑर्डर :
  • स्वस्तात विमानसेवा पुरवणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सने विमान खरेदीची विक्रमी ऑर्डर दिली आहे. एअरबस कंपनीकडे इंडिगोने 300 विमानांची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर कोणत्या एका विमानकंपनीने एअरबसला दिलेली सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं म्हटलं जात आहे.

  • ‘ए-320 निओ फॅमिली’च्या तब्बल 300 विमानांची ऑर्डर देऊन इंडिगोने या क्षेत्रातील खरेदीचा नवा विक्रम आपल्या नावे केलाय. विमान खरेदीचा व्यवहार अंतिम टप्प्यात असून यात एअरबसच्या ‘ए 321 एक्सएलआर’ या नवीन विमानाचाही समावेश आहे. या ऑर्डरमध्ये ए-320-निओ, ए-321-निओ आणि ए-321-एक्सएलआर या विमानांच्या खरेदीचा समावेश आहे.

  • ही ऑर्डर मिळाल्यानंतर इंडिगोकडे एकूण 730 ‘ए-320 निओ फॅमिली’  एअरक्राफ्ट असतील. यापूर्वी इंडिगोने 2005 ते 2015 च्या काळात तीन टप्प्यांमध्ये 530 एअरबस विमानांची ऑर्डर दिली होती.

  • भारतातील विमानचालन क्षेत्रात जलद विकासाची अपेक्षा असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्याचं इंडिगोने म्हटलं आहे. याद्वारे ग्राहकांना आणखी स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची पूर्तता कंपनीकडून केली जाईल. हा तब्बल 33 अब्ज डॉलरचा (जवळपास 2.31 लाख कोटींचा) व्यवहार असू शकतो. याद्वारे शेअर बाजारातील आपले स्थान भक्कम करण्याचाही कंपनीचा प्रयत्न असेल.

आयसिसचा म्होरक्या बगदादीचा खात्मा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती :
  • वॉशिंग्टन : आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी ठार झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या सैन्याने घेरल्यानंतर बगदादीने स्वत:ला बॉम्बने उडवलं. या आत्मघाती स्फोटात बगदादीसह त्यांची तीन मुलंही ठार झाली आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. सीरियातील इदबिल प्रांतात एका विशेष ऑपरेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

  • अमेरिकेने दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम हाती घेतली आहे. बगदादीचा खात्मा हे या मोहिमेचं यश आहे. आयसिस आणि इतर दहशतवादी संघटनांचा नायनाट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, हे यातून दिसून येतं, असं ट्रम्प यांनी म्हटलं.

  • बगदादी आपल्या तीन मुलांसह एका बोगद्यात लपला होता. अमेरिकन सैन्याने बगदादीला घेरलं, त्यावेळी सैन्याच्या हाती लागण्याआधी बगदादीने आपल्या तीन मुलांसह स्वत:ला बॉम्बने उडवलं, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

दिनविशेष :
  • जागतिक बचत दिन / राष्ट्रीय एकता दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

  • १८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

  • १९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

  • १९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.

  • १९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

  • २०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.

जन्म 

  • १३९१: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)

  • १८७५: भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

  • १८९५: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)

  • १८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)

  • १९२२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २०१२)

मृत्यू 

  • १९२९: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन. (जन्म: २३ जून १८७७)

  • १९७५: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)

  • १९८४: भारताच्या ३र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)

  • १९८६: लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के याचं निधन. (जन्म: ३ जून १८९२)

  • २००५: पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)

  • २००९: मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.