चालू घडामोडी - ०१ जानेवारी २०१८

Date : 1 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'बीएसएनएल'ने लॉन्च केला 499 रुपयांत मोबाइल :
  • मोबाइलचे उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे.

  • Detel D1 हा सर्वात स्वस्त फिचर मोबाइल असल्याचा दावा कंपनी करत आहे. या मोबाइलमध्ये BSNL कनेक्शन असणार आहे.

  • पहिल्या रिचार्जची वैधता 365 दिवसांसाठी असणार आहे. मोबाइल फोनमध्ये एका वर्षापर्यंत इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉलची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय 103 रुपयांचा टॉकटाइमही दिला जात आहे. बीएसएनएल टू बीएसएनएल कॉलसाठी प्रती मिनिट 0.15 पैसे आणि इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 0.40 पैसे प्रती मिनिट आकारण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी घोषणा :
  • मुस्लिम महिलांना पुरुष पालकाशिवाय हज यात्रेला जाता येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या मासिक कार्यक्रमात केली आहे. हा धागा पकडून लगेच पुढील वर्षी 1300 मुस्लिम महिलांना पुरूष सहकाऱ्याशिवाय हज यात्रेला पाठवण्यात येत आहे, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जाहीर केले.

  • त्रिवार तलाक विरोधी विधेयकाच्या मंजुरीनंतर मुस्लिम महिलांच्या जोखडमुक्तीसाठी सरकारने उचललेले हे दुसरे मोठे पाऊल आहे.

  • पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात सांगितले की, मुस्लिम महिलांना पुरुष सहकारी बरोबर असल्याशिवाय हज यात्रेला जाता येणार नाही हा गेल्या अनेक वर्षांपासून अमलात असलेला निर्णय त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. आता आमचे सरकार हा र्निबध काढून टाकत आहे. मुस्लिम महिला पुरुषाशिवाय हज यात्रेला जाऊ शकतील.

  • अल्पसंख्याक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार आता 45 वयाच्या वरील मुस्लिम महिला पुरुष सहकाऱ्याशिवाय हज यात्रेला जाऊ शकतील. फक्त त्यांनी चार-चारच्या गटाने जावे.

सुपरस्टार रजनीकांत भाजपाला पाठिंबा देणार :
  • सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली.

  • जयललिता यांच्या मृत्यूनंतर रजनीकांतसारख्या सुपरस्टारने राजकारणात प्रवेश कऱणे महत्त्वाचे मानले जात आहे.

  • माझा पक्ष तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवेल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. आपण वेगळा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली असली तरीही त्यांनी अद्याप आपल्या पक्षाचे नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवले आहे.

  • तामिळनाडूचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तमिलिसे सौदरराजन यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी रजनीकांत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठींबा देणार असल्याचे म्हटले आहे.

अक्कलकोट येथे योग आणि चिकित्सा शिबिर आयोजन :
  • विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने अक्कलकोट येत्या 17, 18 आणि 19 मार्च रोजी योग गुरू स्वामी रामदेवबाबा यांचे योग आणि चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

  • तालुक्याच्या ठिकाणी असे शिबिर पहिल्यांदाच होत आहे. दरवर्षी विवेकानंद प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा, रद्दीतून शिक्षण, गणेशोत्सव व्याख्यानमाला यासह अनेक प्रकारचे उपक्रम राबविते.

  • गेल्या वर्षी विजयपूरच्या सिद्धेश्वर महाराजांची भव्य प्रवचनमाला प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आली. त्याचे उत्कृष्ट नियोजन झाले होते. यावर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रतिष्ठानने तालुक्याला नव्हे तर जिल्हयालाही आरोग्यदायी व चिकित्सा मिळणारी भेट दिली आहे.

आता टेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट सुविधा :
  • टेलिग्राम मॅसेंजरवर आता कुणीही युजर तीन विविध मोबाईल क्रमांकांचे तीन स्वतंत्र अकाऊंट वापरू शकणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे.

  • टेलिग्राम मॅसेंजरची 4.7 ही नवीन आवृत्ती अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. एका महिन्यातच या मॅसेंजरने दोन अपडेट सादर केल्याची बाब लक्षणीय आहे.

  • तसेच यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे मल्टीपल अकाऊंट होय.

  • सध्या पॅरलल स्पेससारख्या अन्य थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सच्या मदतीने एका स्मार्टफोनवर टेलिग्रामचे दोन अकाऊंट वापरणे शक्य आहे. आता मात्र कोणत्याही बाह्य अ‍ॅपच्या मदतीविना ही सुविधा मिळणार आहे.

  • ताज्या अपडेटमध्ये मल्टीपल अकाऊंटची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने एकाच स्मार्टफोनवर तीन विविध मोबाईल क्रमांकाने टेलिग्राम अकाऊंट वापरता येतील. या तिन्ही खात्यांचे नोटिफिकेशन्स त्या युजरला मिळतील. या नोटिफिकेशन्सला कस्टमाईज करण्याची सुविधाही असेल. तर साईडबारवर स्वाईप करून कुणीही आपल्याला हव्या त्या अकाऊंटचा वापर करू शकेल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.

  • १८०८: अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

  • १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.

  • १८४२: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.

  • १८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.

  • १८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.

  • १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.

  • १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.

  • १८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.

  • १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.

  • १९०८: संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.

  • १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

  • १९२३: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.

  • १९३२: डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.

जन्म

  • १६६२: पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)

  • १८७९: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९७०)

  • १८९२: स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)

  • १८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)

  • १९००: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)

  • १९०२: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)

  • १९१८: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)

  • १९२३: अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टुन टुन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)

  • १९२८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९८)

  • १९३६: साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९७)

  • १९४१: चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.

  • १९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.

  • १९५०: भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.

  • १९५१: अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.

मृत्य

  • १५१५: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १४६२)

  • १७४८: स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन.

  • १८९४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)

  • १९४४: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १८६९)

  • १९५५: भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.

  • १९७५: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१)

  • १९८९: समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.

  • २००९: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट१९२८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.