चालू घडामोडी - ०१ नोव्हेंबर २०१७

Date : 1 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी सरकारला दिलासा, ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ रँकिंगमध्ये भारत टॉप-100 मध्ये :
  • नवी दिल्ली : जीएसटी आणि नोटाबंदीमुळे विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका होत असताना, दुसरीकडे सरकारसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

  • जागतिक बँकेच्या ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’च्या ताज्या रँकिंगमध्ये भारताचा टॉप 100 देशांच्या यादीत समावेश झाला आहे. मात्र, ही रँकिंग देशात जीएसटी लागू होण्यापूर्वीची असल्याचेही सांगण्यात येत आहे.

  • 190 देशांच्या यादीत भारत 100 व्या स्थानावर जागतिक बँकेने ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ रँकिंगची 2018 ची यादी जाहीर करताना मोदी सरकारच्या कामांचं कौतुक केलं. 190 देशांच्या यादीत गेल्या वर्षी भारत 130 व्या स्थानावर होता.

  • मात्र, यंदा भारताने 30 अंकांनी झेप घेऊन, टॉप 100 मध्ये स्थान मिळवलं आहे. या रँकिंगमध्ये जून 2016 ते जून 2017 पर्यंतच्या सुधारणांच्या कार्यक्रमांचं मुल्यमापन करण्यात आलं. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, याचा परिणाम आगामी तीन ते पाच वर्षात पाहायला मिळेल. (source : abpmajha)

उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताची झेप,अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती :
  • वॉशिंग्टन/नवी दिल्ली : नोटाबंदी आणि विकासदर यामुळे केंद्र सरकारवर टीका होत असतानाच जागतिक बँकेच्या अहवालामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे.

  • या अहवालानुसार, भारताने बिझनेस रँकींगमध्ये (उद्योगस्रेही देशांच्या यादीत) मोठी झेप घेतली आहे. गत वर्षभरातील कामगिरीमुळे भारताने या यादीत यंदा ३० अंकांची झेप घेत १०० वा क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच ही माहिती दिली.

  • कर आकारणी, परवाना देणे, गुंतवणूकदारांना संरक्षण यामुळे हे यश मिळाले. जागतिक बँकेने म्हटले की, भारत त्या देशामध्ये आहे ज्या देशाने संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत. पहिल्या ५० देशांत येणे हे आमचे लक्ष्य आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान (source : lokmat)

हिमाचलमध्ये प्रेम कुमार धुमाल भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार :
  • नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचं मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून भाजपतर्फे प्रेम कुमार धुमाल यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे.

  • सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी धुमाल यांच्या नावाची घोषणा केली. हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या नावाचीही चर्चा होती.

  • मात्र राज्यात धुमाल यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांच्या खांद्यावर ही धुरा सोपवल्याचं म्हटलं जातं.

  • ‘प्रेम कुमार धुमाल यांच्या नेतृत्वात भाजप हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढवेल. धुमाल हे माजी मुख्यमंत्री असले, तरी 18 डिसेंबर नंतर ते नवे मुख्यमंत्री असतील’ असं शाह म्हणाले.(source : abpmajha)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यू-यॉर्कमधील हल्ल्याचा नोंदवला तीव्र निषेध :
  • वॉशिंग्टन - न्यू-यॉर्क येथील मॅनहॅटनमध्ये एक ट्रक चालकानं पादचा-यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

  • वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरियलसमोर ही घटना घडली. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

  • 'दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे', असा शोक व्यक्त  करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमधील हल्ल्याचा निषेधही नोंदवला आहे. (source : lokmat)

मेक्सिकोत ‘डे आॅफ द डेड’, अनेक वर्षांपासूनची ही परंपरा :
  • मेक्सिकोत गत आठवड्यात भूताखेतांच्या टोळ्या रस्त्यावर उतरल्या होत्या. निमित्त होते ‘डे आॅफ द डेड’च्या तयारीचे. मेक्सिकोत हे चित्र दरवर्षी दिसते. भुताचे मुखवटे लावून लोक रस्त्यावर एकत्र फेरी काढतात.

  • हा फेस्टिव्हल येथील लोकांसाठी आकर्षणाचा विषय आहे.

  • यावर्षी २ नोव्हेंबर रोजी ‘डे आॅफ द डेड’साजरा करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलचा इतिहास खूप जुना आहे. असे सांगतात की, २००० वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे.

  • पूर्वी लोक आपल्या पूर्वजांच्या थडग्यांना फुले वाहून हा दिवस साजरा करीत होते. काळानुसार यात बदल झाला आणि आता लोक उत्सवाच्या स्वरूपात हा दिवस साजरा करतात.

नेहराच्या जिद्दीला सलाम ठोकायचा तर आजच्या सामन्यात विजय हवाच :

  • नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतला सलामीचा सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

  • भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा या सामन्यात खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेणार आहे. त्यामुळं टीम इंडिया नेहराला विजयी निरोप देणार का, याकडे भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.

  • विराट कोहलीच्या टीम इंडियानं कानपूरच्या तिसऱ्या वन डेत न्यूझीलंडवर रोमांचक विजय मिळवत 2-1 अशी मालिका खिशात घातली आणि आता उभय संघ सज्ज तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत.

  • भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा या सामन्यात खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेणार आहे. त्यामुळं टीम इंडिया नेहराला विजयी निरोप देणार का, याकडे भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक शाकाहार दिन

महत्त्वाच्या घटना

  • १६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.

  • १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.

  • १८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.

  • १८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.

  • १८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.

  • १९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.

  • १९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९५६: भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.

  • १९५६: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.

  • १९५६: दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.

  • १९५६: केरळ राज्य स्थापना दिन.

  • १९५६: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

  • १९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

  • १९७३: मैसूर राज्याचे नाव बदलुन ते कर्नाटक असे करण्यात आले.

  • १९८२: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.

  • १९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

  • १९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • २००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म दिवस

  • १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.

  • १८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ – कोलकता, पश्चिम बंगाल)

  • १९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)

  • १९२६: संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकी चे लेखक यशवंत देव यांचा पेण येथे जन्म.

  • १९३२: कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

  • १९४०: भारताचे ३५वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.

  • १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)

  • १९६०: अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.

  • १९७३: अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा जन्म.

  • १९७४: क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.

मृत्य दिन

  • १९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.

  • १९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.

  • १९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.

  • १९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.

  • १९९६: श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)

  • २००५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)

  • २००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.