चालू घडामोडी - ०१ सप्टेंबर २०१७

Date : 1 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एकनाथ खडसे यांना जाफराबाद न्यायालयाने जामीन मंजूर :
  • जाफराबाद न्यायालयाने एक महिन्यापूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयात हजर राहण्याविषयी समन्स बाजवले होते. त्यानुसार एकनाथ खडसे हे जाफराबाद न्यायालयात हजर राहिले, अ‍ॅड. रामेश्वर अंभोरे यांच्यामार्फत जामीनअर्ज दाखल केला.

  • माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाफराबाद न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला असून पंधरा हजारांच्या जमानत रकमेवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

  • त्यामुळे शेतकर्‍यांचा अवमान झाला म्हणून त्यांच्या विरोधात जाफराबाद येथील काँग्रेस कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, शेतकर्‍यांकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत; परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते

  • एक वेळ शेतकर्‍यांनी आपला मोबाईल रिचार्ज नाही केला तरी चालेल; परंतु त्यांनी वीज बिल पहिले भरावे. तेव्हाच आपण चांगले पीक घेऊन उत्पादन घेऊ शकू, असा माझा म्हणण्याचा उद्देश होता.

भारतीय नेमबाजांचे ‘मिशन विश्वकप’ :
  • नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार असून या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.

  • जगभरातील शॉटगन नेमबाजांसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते आहेत कारण, चांगल्या कामगिरीसह नवी दिल्लीत पुढील महिन्यात आयोजित विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान पटकावण्याची संधी याच स्पर्धेद्वारे मिळेल.

  • स्कीट प्रकारात मैराज अहमद खान हा भारताकडून पदकाचा प्रबळ दावेदार असून महिला गटात रश्मी राठोड आव्हान सादर करेल, अस्ताना येथे माहेश्वरी चौहान हिने स्कीटमध्ये आंतरराष्ट्रीय पदक जिंकले होते.

  • पुरुष स्कीट संघात मैराजशिवाय अंगदवीरसिंग बाजवा आणि शिराजसिंग; तर महिला ट्रॅप संघात राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग आणि सीमा तोमर आव्हान सादर करतील.

  • ज्युनियर गटात १५ वर्षांचा शपथ भारद्वाज याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. याशिवाय, मानवादित्यसिंग राठोड, लक्ष्य आणि अनंतजितसिंग नरुका हेदेखील पदकाचे दावेदार असतील. 

मारिया शारापोवा तिस-या फेरीत यूएस ओपन :
  • जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू आणि १५ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या मारिया शारापोवाने आपला दर्जेदार खेळ कायम राखताना यूएस ओपन स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला.

  • त्याचवेळी, नवोदित अलेक्झांडर ज्वेरेव आणि निक किर्गियोस यांना स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला असून स्टार खेळाडू शारापोवाने बंदीनंतर पुनरागमन करताना पहिल्याच ग्रँडस्लॅममध्ये जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या सिमोना हालेप हिला धक्का देत दिमाखदार पुनरागमन केले.

  • यानंतर तिने हंगरीच्या ५९ व्या मानांकीत टिमिया बाबोस हिचा ६-७ (४-७), ६-४, ६-१ असा पराभव करुन तिसºया फेरीत प्रवेश केला, आर्थर अ‍ॅश स्टेडियममध्ये झालेल्या या चुरशीच्या सामन्यात शारापोवाने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत आपला हिसका दाखवाला.

  • आॅगस्ट महिन्यातंच झालेल्या मँट्रीयल स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिग्गज रॉजर फेडररला नमवलेल्या आणि या मोसमात ५ एटीपी विजेतेपद पटकावलेल्या ज्वेरेवला स्पर्धेबाहेर पडावे लागले. चौथ्या मानांकीत ज्वेरेवला क्रोएशियाच्या ६१ व्या मानांकीत बोर्ना कोरिच याने ३-६, ७-५, ७-६(७-१), ७-६(७-४) असे नमवले.

  • १४ व्या मानांकीत निक किर्गियोसला पहिल्याच सामन्यात २३५व्या मानांकीत आॅस्टेÑलियाच्या जॉन मिलमैन याने ६-३, १-६, ६-४, ६-१ असा धक्का दिला. 

सीबीआय युनिटचे नवे अधीक्षक विजयेंद्र बिद्री :
  • बिद्री हे तामिळनाडू कॅडरचे आयपीएस अधिकारी असून प्रतिनियुक्तीवर त्यांना नागपुरात नियुक्त करण्यात आले आहे.

  • चंबळच्या खोर्‍यात डाकूंची (दरोडेखोरांची) दाणादाण उडवून देणारे विजयेंद्र बिद्री यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) च्या नागपूर युनिटचे अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे.

  • २००५ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले विजयेंद्र बिद्री यांची राजस्थान कॅडर साठी निवड झाली होती. मात्र, लग्नानंतर त्यांनी केलेल्या विनंतीला मंजुरी देत त्यांना तामिळनाडू कॅडरमध्ये स्थानांतरित करण्यात आले.

  • कार्यशैली बघून त्यांना चंबळच्या खोर्‍यात नियुक्त करण्यात आले, त्यांनी अनेक कुख्यात डाकूंचे एन्काऊंटर करून चंबळमध्ये डाकूंची दाणादाण उडवून दिली होती.

  • सर्वप्रथम त्यांना राजस्थानातील दऊसा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यावेळी राजस्थानमध्ये गुजर आंदोलनाने तीव्र रूप घेतले होते.

  • बिद्री यांनी प्रसंगावधान राखत येथील परिस्थिती हाताळली. त्यानंतर स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांनी या पदावर असताना अमली पदार्थाचा देशातील सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळवले.

केंद्रातील सहा मंत्र्यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले राजीनामे :
  • केंद्रातील सहा मंत्र्यांनी गुरुवारी संध्याकाळी राजीनामे दिले असल्याची चर्चा असून, केंद्रीय मंत्रिमंडळात शनिवारी फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री आणि भाजपाचे बिहारचे नेते राजीव प्रताप रूडी, गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारती

  • आरोग्य राज्यमंत्री फागनसिंह कुलस्ते यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, तसेच संजीव बलियान, कलराज मिश्रा, महेंद्र पंड्या या मंत्र्यांनीही राजीनामा दिल्याचे कळते.

  • सूत्रांनुसार, मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचे कळते, त्यानुसार आज अनेक मंत्री अमित शहा यांना भेटले.

  • नितीश कुमार यांच्या जदयूच्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असून अण्णा द्रमुकला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.

  • अण्णा द्रमुकने यासाठी काहीसा वेळ मागितला असून, त्यामुळे सध्या केवळ मंत्रिमंडळ फेरबदल केला जाऊ शकतो, पंतप्रधान मोदी चीन दौºयावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक-महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती :
  • केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले असून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक-महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली असून सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

  • गृह सचिव पदाचा ३१ ऑगस्ट रोजी राजीनामा देणारे राजीव महर्षी आता कॅगचे प्रमुख राहतील, शशिकांत शर्मा यांची जागा घेतील ते १९७८ च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

  • आयएएस अधिकारी सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तीपदी नेमण्यात आले आहे, तर अनिता करवाल यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • राजीवकुमार यांना अर्थ सेवा विभागाचे सचिव तर आशा राम सिहाग यांना अवजड उद्योग विभागाचे सचिव म्हणून नेमले आहे.

धोनी तू नेहमीच आमचा कर्णधार असशील : विराट कोहली
  • धोनीच्या विशेष उपलब्धीबद्दल कोहलीने संघाच्या वतीने त्याला स्मृतिचिन्ह भेट दिले असून तुला स्मृतिचिन्ह देणे माझ्यासाठी गौरवास्पद असून, तू नेहमी आमचा कर्णधार असशील, असे विराट म्हणाला.

  • माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ३०० न-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील २० खेळाडू बनला, लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले. 

  • आमच्यापैकी ९० टक्के खेळाडूंनी त्यांच्या करिअरची सुरुवात धोनीच्याच नेत्तृत्वात केली आहे, त्याचा हा सन्मान करणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

  • मनीष पांडे आणि कारकिर्दीतील महेंद्रसिंह धोनी यांनी सहाव्या विकेटसाठी वेगवान शतकी भागीदारी करून अखेरच्या १२.२ षटकांत १०१ धावा वसूल केल्या.

  • वन-डेत शंभर अर्धशतकांची नोंद करण्याची त्याला आजच संधी होती, पण एका धावेमुळे ही संधी हुकली असून ४६३ वन-डे खेळलेल्या सचिनने ३००वेळा वन-डे कॅप घालणे ही अप्रतिम कामगिरी आहे.धोनीने भारताकडून २९७ तसेच तीन सामने आशिया एकादशकडून खेळले आहेत.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • शिक्षक दिन : सिंगापुर.

  • स्वातंत्र्य दिन : उझबेकिस्तान.

जन्म /वाढदिवस

  • ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक : ०१ सप्टेंबर १८९६

  • पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी : ०१ सप्टेंबर १९४९

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु : ०१ सप्टेंबर १५७४

  • गुरु रामदास, चौथे शीख गुरु : ०१ सप्टेंबर १५८१

ठळक घटना

  • भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली : ०१ सप्टेंबर १९४७

  • इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापली : ०१ सप्टेंबर १९६४

  • गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांनी पुणे येथे ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली : ०१ सप्टेंबर १९११

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.