चालू घडामोडी - ०२ ऑगस्ट २०१७

Date : 2 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी सरकारबरोबरच्या मतभेदांमुळे दिला राजीनामा : अरविंद पनगढिया
  • देशाची आर्थिक धोरणे ठरविण्यामध्ये पनगढिया अध्यक्ष असलेल्या निती आयोगाची महत्वाची भूमिका असून निती आयोग आणि सरकारमध्ये काही मुद्यांवर मतभेद झाले होते.

  • ‘नीति’ आयोगाचे पहिले उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी मंगळवारी अचानक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  • इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार निती आयोग आणि सरकारमध्ये काही मुद्यांवर मतभेद झाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नियोजन आयोग मोडीत काढून निती आयोगाची स्थापना केली.

  • नियोजन आयोगामध्ये पंतप्रधानांच्यानंतर उपाध्यक्षाकडे अंतिम अधिकार असायचे. 

  • पण निती आयोगामध्ये वेगवेगळे उच्चअधिकारी विविध उपक्रम हाताळायचे, त्यामुळे निती आयोगामध्येच वेगवेगळी सत्ता केंद्रे तयार होत होती.

राज्याचे औद्योगिक विकास धोरण देशात अग्रेसर :
  • औद्योगिक विकास धोरण देशात अग्रेसर आहे, अन्य राज्याच्या तुलनेने आपण खूप पुढे आहोत.

  • जेव्हा पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसू मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील एमआयडीसींचा आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले होते, यावरून आपल्या धोरणाचे यश स्पष्ट होते, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व खनिजकर्म मंत्री तसेच एमआयडीसीचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले.

  • प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ५५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.

  • या वेळी उद्योग राज्यमंत्री आणि एमआयडीसीचे उपाध्यक्ष प्रवीण पोटे-पाटील, उद्योग खात्याचे मुख्य सचिव सुनील पोरवाल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, एमआयडीसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष जी.एस. पोपट यांचीही उपस्थिती होती.

  • तसेच या सोहळ्यात एमआयडीसी कर्मचार्‍यांच्या गुणवंत मुलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

गुजरातचे माजी पोलीस उपसंचालक डी.जी. वंजारा यांची आरोपमुक्तता :
  • गुजरातचे माजी पोलीस उपसंचालक डी.जी. वंजारा व एम.एन. दिनेश यांची विशेष सीबीआय न्यायालयाने सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्तता केली.

  • आयपीएस अधिकारी डी.जी. वंजारा अहमदाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख होते, त्यानंतर त्यांना उपमहासंचालक करण्यात आले.

  • राजस्थानमधील आयपीएस अधिकारी एम.एन. दिनेश हे गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते.

  • अहमदाबादेत २००५ मध्ये घडलेल्या बनावट चकमकीतील प्रमुख आरोपी म्हणून वंजारा यांचा उल्लेख सीबीआयने केला आहे, तर सोहराबुद्दिन शेखची हत्या करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाचे नेतृत्व दिनेश यांनी केले होते. 

चीनच्या भूभागाचे विभाजन होऊ देणार नाही : राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
  • चीन आणि भारत यांच्यात डोकलाम भागावरून तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, आमचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास याबाबत आम्ही स्वत:चे नुकसान होऊ देणार नाही.

  • चीनची जनता शांतताप्रिय आहे, आक्रमकता दाखविण्याचा किंवा क्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत नाही.

  • पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) ९० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होत,. युद्धासाठी आणि जिंकण्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

  • सिक्किममधील तणावाचा येथे थेट संदर्भ नव्हता. पण, युद्धाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी असून आम्ही लढाईसाठी तयार आहोत.

जीएसटी इफेक्ट : 'एकावर एक फ्री' ऑफर कंपन्यांना परवडेना :
  • जीएसटी लागू झाल्यावर ‘बाय वन गेट वन फ्री’ यासारख्या योजनांना चाप बसला असून मोफत वस्तूंवरील कर आकारणीमुळे कंपन्यांना ही ऑफर परवडेनाशी झाली आहे.

  • जर तुम्हाला ‘एक खरेदी करा, एक मोफत मिळवा’ यासारख्या ऑफर्समध्ये इंटरेस्ट असेल, तर एक तुमच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. 

  • वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर मोफत दिल्या जाणार्‍या वस्तूंवरही कर आकारला जात आहे. त्यातच ‘इनपुट क्रेडिट टॅक्स’च्या तरतुदीनुसार मिळणारी खरेदीवरील कर सवलत या ‘मोफत’ वस्तूंवर मिळणार नाही. 

  • अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर स्वतंत्र डिस्काऊंट जाहीर केला आहे, मात्र ‘एकावर एक फ्री’ ही संकल्पना आता बाद होण्याची शक्यता आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • वायु सेना दिन : रशिया.

जन्म, वाढदिवस

  • प्रफुल्लचंद्र रे, बंगाली रसायनशास्त्रज्ञ : ०२ ऑगस्ट १८६१

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • केटो कियोमासा, जपानी सामुराई : ०२ ऑगस्ट १६११

  • वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष : ०२ ऑगस्ट १९२३

ठळक घटना

  • अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू : ०२ ऑगस्ट १७९०

  • जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट : ०२ ऑगस्ट १८६९

  • 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापन केली : ०२ ऑगस्ट

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.