चालू घडामोडी - ०२ जुलै २०१७

Date : 2 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत-इस्रायलमधील संबंध दृढतेच्या दिशेने :
  • नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा इस्रायल दौरा ४ जुलै रोजी सुरू होत असून, गेल्या ७० वर्षांत त्या देशाला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत.

  • इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी या दोघांची विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भेट झालेली आहे.

  • दोन्ही देशांतील संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या ७० वर्षांमध्ये कायम नव्हता. १९४७ साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते.

  • इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने १९४९ साली विरोध केला होता. १९५० साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली.

मोदींनी आणलेला जीएसटी हा सर्वाधिक वाईट कायदा : माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम
  • मोदी सरकारने मोठा गाजावाजा करून लागू केलेला वस्तू व सेवाकर हा खऱ्या अर्थाने ‘जीएसटी’ नाही. ‘एक देश, एक कर’ असा डांगोरा पिटला जात असला तरी वस्तुस्थिती तशी नाही.

  • ‘जीएसटी’ ही संकल्पना लागू करण्यासाठी केलेल्या सध्याचा कायदा हा सर्वात वाईट कायदा आहे, अशी कठोर टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे केली.

  • ‘जीएसटी’ची कल्पना केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वप्रथम मांडणारे चिदंबरम एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, काँग्रेसने ज्याचा पाठपुरावा केला होता व तज्ज्ञांनी ज्याचा आकृतिबंध तयार केला होता तो हा ‘जीएसटी’ नाही.

  • मूळ स्वरूप पार बदलून सध्याचा कायदा केला गेला आहे. याहून वाईट कायदा दुसरा असूच शकत नसून ते म्हणाले की, ‘जीएसटी’ म्हटले की सर्व वस्तू व सेवांवरील कराचा  दर असायला हवा.

  • ‘स्टँडर्ड’ दर १५ टक्के ठेवावा व काही वस्तू  व सेवांच्या बाबतीत या दरात  कमी-अधिक फरक ठेवावा, असा विचार मांडला होता.

भारत-पाकमध्ये आज पुन्हा 'मौका-मौका', महिला वर्ल्ड कपमध्ये भिडणार
  • क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानमधील सामन्याचा आनंद घेता येणार असून पाठोपाठ दोन विजय नोंदविणारा भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषकात आज रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढत देणार असून, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या भारताचे पारडे जड मानले जात आहे.

  • पाकिस्तान संघ या स्पर्धेत अद्यापही चांगली कामगिरी करू शकलेला नाही.

  • भारताने मागील चार मालिका जिंकल्या असून भारताने आधी श्रीलंका आणि वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर द. आफ्रिकेला आयसीसी पात्रता सामन्यात व त्यानंतर चौरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यातदेखील धूळ चारली होती.

भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत प्रवीण.

पाकिस्तान : सना मीर (कर्णधार), असमाविया इक्बाल, आयशा जफर, डायना बेग, गुलाम फातिमा, इरान जावेद, जावेरिया खान, कायनात इम्तियाझ, मरिना इक्बाल, नाहिदा खान, नैन अबिदी, नास्रा संधू, सादिया युसूफ, सिद्रा नवाज, वाहिदा अख्तर आणि बिसमाह महारुफ.

१ लाख बोगस कंपन्यांची नोंदणी नोटाबंदीनंतर रद्द :
  • नोटाबंदीनंतर हाती आलेल्या माहितीचे ‘डेटा मायनिंग’ करून काळ्या पैशाला वाट करून देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एक लाख कंपन्यांची नोंदणी लेखणीच्या एका फटकाऱ्याने रद्द करण्यात आली आहे.

  • एकूण तीन लाख कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि ३८ हजारांहून जास्त ‘शेल’ कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केली.

  • देशात ‘जीएसटी’ ही क्रांतिकारी करप्रणाली लागू झाल्यानंतर पंतप्रधांनाचे हे पहिलेच जाहीर भाषण होते. सुमारे एक तासाच्या भाषणात मोदींनी आपले मन मोकळे केले आणि ‘सीएं’ना त्यांच्या नेमक्या जबाबदारीचे भान करून दिले.

  • ‘इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंटस्् आॅफ इंडिया’च्या (आयसीएआय) वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, केवळ राजकारणाचा विचार करून असा धाडसी निर्णय घेता येत नाही.

  • देशभक्तीने प्रेरित होऊनच असे निर्णय शक्य होतात. देशहितासाठी कोणाला तरी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता : ०२ जुलै १८८०

  • चार्ल्स टपर, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान : ०२ जुलै १८२१

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • भारतरत्न राजर्षी पुरुषोत्तम येथे निधन : ०२ जुलै १९६२

  • तरूण पिढीवर समाजवादी विचारांचा प्रभाव पाडणारे समाजवादी नेते युसुफ़ मेहराअली यांचे निधन : ०२ जुलै १८५८

ठळक घटना

  • स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला : ०२ जुलै २००२

  • मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो अॅक्सियाँ नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड : ०२ जुलै २०००

  • अॅबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण : ०२ जुलै २००१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.