चालू घडामोडी - ०२ मे २०१७

Date : 2 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी, तुर्की अध्यक्षांनी घेतला सुरक्षेचा आढावा :
  • पंतप्रधान मोदी यांनी ईर्दोगान यांचे स्वागत केले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी टिष्ट्वटरवर सांगितले. दरम्यान परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ईर्दोगान यांची भेट घेतली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर आलेले तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप ईर्दोगान यांनी सोमवारी नवी दिल्ली येथील बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला असून बैठकीत सुरक्षा आणि व्यापार या प्रमुख क्षेत्रांसह परस्परांच्या चिंतेचा विषय असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही उभय नेत्यांनी चर्चा केली.

  • दहशतवादविरोधी कारवाई करण्याबाबत द्विपक्षीय सहकार्य बळकट करणे, भारताचा एनएसजीचे सदस्यत्व मिळविण्याचा प्रयत्न आणि प्रादेशिक सुरक्षा यासह इतर अनेक प्रमुख मुद्यांवर मोदी-ईर्दोगान यांच्या भेटीत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. हैदराबाद हाऊस येथे ही बैठक पार पडली.

  • परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चेच्या आधी अध्यक्ष ईर्दोगान यांचे स्वागत केले, असे बागले यांनी म्हटले आहे. १६ एप्रिल रोजी वादग्रस्त सार्वमत जिंकल्यानंतर ईर्दोगान यांनी भारताला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारत हा प्रदूषण पसरवणारा देश : डोनाल्ड ट्रम्प :
  • पॅरिस कराराचं पालन करताना अमेरिकेच्या जीडीपीला येत्या १० वर्षांत २.५ ट्रिलियन डॉलर म्हणजेच १६०६ अरब रुपयांहून जास्तीचं नुकसान सोसावं लागू शकते. त्यामुळे येत्या काळात अमेरिकेतील कारखाने आणि प्लांट्स बंद होतील, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारावर भारतासह रशिया आणि चीनवर निशाणा साधला असून पेन्सिल्वेनियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत ट्रम्प म्हणाले, पॅरिस करारासाठी अमेरिका ट्रिलियन डॉलर खर्च करत आहे.

  • रशिया, चीन आणि भारतासारखे प्रदूषण करणारे देश काहीच देत नाही आहेत. येत्या दोन आठवड्यात पॅरिस करारावर मोठा निर्णय घेणार असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितले, रॅलीमध्ये त्यांनी जागतिक पर्यावरणाच्या मुद्द्यावर झालेल्या या क्लायमेट डीलला एकतर्फी सांगितलं आहे.

  • जलवायू परिवर्तन डोळ्यांसमोर ठेवून २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पारंपरिक रूपरेषेंतर्गत १९४ देशांनी करारावर स्वाक्षरी केली होती. यातील १४३ देशांनी या कराराचं जोरदार समर्थनही केलं आहे.

संपूर्ण विकास होईपर्यंत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ सुरूच राहणार :
  • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे अनोखे दृश्य सोमवारी वरळी येथील एनएससीआय सभागृहात पाहायला मिळाले.

  • ‘अ‍ॅक्शन फॉर कलेक्टिव्ह ट्रान्स्फॉर्मेशन (एसीटी)’अंतर्गत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत राज्यभर एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  • सहा लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत, तब्बल २३०० संकल्पनांचे सादरीकरण केले. त्यातून विविध महाविद्यालयांच्या ११ संघांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. या ११ संघांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांसमोर उपाययोजनांचे सादरीकरण केले.

  • दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, घनकचरा व्यवस्थापन, नागरी गरिबी निर्मूलन, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, नागरिकांचा प्रशासनात सहभाग, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, जलद न्यायदानासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब आदी एकूण ११ विषयांवर सादरीकरण करण्यात आले.

  • ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येईल. यात मंत्रिगटातील एक, मुख्यमंत्री सचिवालयातील संबंधित अधिकारी आदींचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रतन टाटांसारखे दुसरे नाहीच : 
  • रतन टाटा यांचे काम उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  • रतन टाटा यांच्यासारखा कुणी असू शकत नाही, ते एकमेव आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करत, मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारण आणि कापोर्रेट यांनी राष्ट्राला प्राधान्य देत, हातात हात घालून काम केले पाहिजे.

  • आपण राष्ट्रासाठी काम करतोय, राष्ट्र प्रथम ही भावना लक्षात घेऊन परिवर्तनासाठी प्रयत्न करावे.

अक्षयकुमारची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी :
  • राज्यातील स्वच्छतागृहे जिओ टॅगिंगवर आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या कार्यक्रमात अक्षयकुमार आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

  • प्रश्नोत्तरादरम्यान अक्षयकुमारने विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

  • जुन्या काळातील टेलिफोन बुथच्या धर्तीवर प्रत्येक पाचशे अथवा हजार मीटरच्या अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत.

  • जागोजागच्या स्वच्छतागृहांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी विशेष अ‍ॅप विकसित करावे, अशी मागणी सुप्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

हनी ट्रॅप : 'त्या' महिलेने हरियाणाच्या खासदारालाही ओढले होते जाळ्यात :
  • भाजपा खासदार के. सी. पटेल यांनी एका महिलेविरोधात हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी दिल्ली पोलिसांनी त्या महिलेच्या घरावर छापा मारला.

  • खासदार पटेल आणि दिल्ली पोलिसांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. सदर महिलेने यापूर्वी हरयाणातील एका खासदाराविरोधात तिलक मार्ग पोलिस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

  • पेशानं वकील असलेल्या महिलेनं सांगितलं की, खासदार के. सी. पटेल यांचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू होते, त्याच दरम्यान माझी के. सी. पटेल यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी खटल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मला स्वतःच्या नर्मदा अपार्टमेंट, ६०४ नंबरच्या फ्लॅटवर बोलावलं.

  • महिलेने आपल्याकडून ५ कोटी रुपयांची मागणी केली असा आरोप पटेल यांनी केला आहे. के.सी.पटेल हे गुजरातच्या वलसाड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.  

जनतेच्या ‘मन की बात’वर आमचा विश्वास - राहुल गांधी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना ‘मन की बात’ ऐकविण्यात धन्यता मानतात. आमचा जनतेची ‘मन की बात’ ऐकण्यावर विश्वास आहे, या शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपरोधिक टोला हाणला.

  • गुजरातमध्ये दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून भाजप सत्तेवर असून या राज्याला पूर्णत: बदलण्यासाठी जनतेच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले.

  • आमचा पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ते गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अनौपचारिक प्रारंभ करताना म्हणाले. 

  • काँग्रेस पूर्ण शक्तिनिशी ही निवडणूक लढणार असून मोदींना त्यांच्याच राज्यात पराभूत करेल.

  • गुजरातमध्ये निवडणुका होत असून काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास ते कोणत्याही एका व्यक्तीचे न राहता प्रत्येकाचे असेल.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • ध्वज दिन : पोलंड.

  • शिक्षक दिन : ईराण.

  • शिक्षण दिन : ईंडोनेशिया.

जन्म, वाढदिवस

  • सत्यजित रे,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट -दिग्दर्शक : ०२ म१९२१

  • ब्रायन लारा, वेस्ट इंडिजचा डावखुरा फ़लंदाज : ०२ मे १९६९

  • डॉ. वसंतराव देशपांडे, विख्यात गायक : ०२ मे १९२०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन 

  • शिवाजीमहाराजांचे दक्षिणेतील अतिशय महत्त्वाकांक्षीतडफ़दार स्वामीनिष्ठ कारभारी रघुनाथपंत हणमंते : ०२ मे  १६८६

  • शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक : ०२ मे १९७५

  • पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेते : ०२ मे १९९८

  • मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती : ०२ मे २००१

  • ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक : ०२ मे २०११

ठळक घटना 

  • --

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.