चालू घडामोडी - ०२ नोव्हेंबर २०१८

Date : 2 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डाऊनलोड स्पीड मध्ये एअरटेल फोरजीच टॉप :
  • भारती एअरटेल याने डाऊनलोड स्पीड फोरजीमध्ये टॉपचे स्थान पटकावले आहे. तर फोरजी अपलोड मध्ये आयडिया सेल्युलर टॉपवर झेप घेतली आहे. मोबाइल सेवांचे विश्लेषण करणाऱ्या ओपन सिग्नलने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये केलेल्या सर्वेसंदर्भातला हा अहवाल आहे ज्यामध्ये डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेलने बाजी मारली आहे.

  • जिओ हे या रिलायन्सच्या स्वस्तात मस्त आणि लोकप्रिय झालेल्या कंपनीने फोरजी सेवेच्या अॅव्हेलिबिलिटीच्या बाबत 96.7 टक्के इतका स्कोअर नोंदवला आहे.

  • ओपन सिग्नलच्या अहवालानुसार मोबाइल व्हिडीओचा अनुभव कसा आहे हे तपासण्यासाठी एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन यांच्यात तुलना करण्यात आली. ज्यामध्ये डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेल टॉपला आहे हे समोर आले आहे.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ‘मोदी जॅकेट’च्या प्रेमात; ट्विट करुन मानले मोदींचे आभार :
  • नवी दिल्ली : दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जे-इन यांनी भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॅकेटची भरभरून प्रशंसा केली होती. या जॅकेटमध्ये तुम्ही खूपच रुबाबदार दिसतात, अशी तारीफही त्यांनी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी सद्भावनेतून मून यांना काही खास तयार केलेली जॅकेटस् भेट दिली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मलाही काही सुंदर जॅकेटस् पाठविली आहेत. ही जॅकेटस् भारतीय पारंपरिक पोशाखांच्या मालिकेतील आधुनिक वस्त्रालंकार आहेत.

  • मोदी जॅकेट कोरियातही परिधान करता येऊ शकतात. त्यांनी पाठविलेली जॅकेटस् मला येतील अशीच आहेत, असे मून यांनी ट्वीट करून या भेटीबद्दल मोदी यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत. याच ट्वीटसोबत त्यांनी ‘मोदी जॅकेट’मधील स्वत:ची छायाचित्रेही जोडली आहेत. याच छायाचित्रांसोबत मून यांनी विविध रंगातील चार जॅकेटस्ही प्रदर्शित केली आहेत.

  • तथापि, ही जॅकेटस् वस्तूत: ‘नेहरू जॅकेटस्’ असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकार संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या योजनांचे नामांतर केले आहे. मोदींनी नेहरूजॅकेटचेही नामांतर केले आहे, असेही अनेकांनी ट्वीटमधून म्हटले आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून :
  • मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ते ९ दिवस चालणार आहे. विधानसभा व परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी ही माहिती दिली.

  • अधिवेशनाचे कामकाज ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ व विधान परिषदेची दोन प्रलंबित विधेयके मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनात दुष्काळावरची महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे बापट यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास सुट्टीच्या दिवशी कामकाज होईल. बैठकीस अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे आदींसह अनेक नेते उपस्थित होते.

  • अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असून, त्यावर विस्तृत चर्चेसाठी अधिवेशनाचा कालावधी किमान तीन आठवड्यांचा असायला हवा होता. मात्र सरकारने मुद्दाम अधिवेशन दोन आठवड्यांचे केल्याचा आरोप विखे यांनी केला.

‘विराट’ युद्धनौकेचे होणार वस्तुसंग्रहालय :
  • मुंबई : गौरवशाली इतिहास असणाऱ्या आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मान्यता देण्यात आली. ८५२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

  • मार्च २०१७ मध्ये ती भारतीय नौसेनेच्या सेवेतून निवृत्त झाली. सध्या ती नौसेना गोदीमध्ये (नेव्हल डॉकयार्ड) ठेवण्यात आली आहे. भारतीय नौसेनेचा समृद्ध इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा तसेच शालेय-महाविद्यालयीन तरुणांमध्ये सागरी क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी तिचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. 

  • वस्तुसंग्रहालय सिंधुदुर्गात - महाराष्ट्र शासनाने केंद्रीय संरक्षण मंत्रालयास सादर केलेल्या प्राथमिक प्रस्तावानुसार ही नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स येथे किनाºयापासून सात सागरी मैल अंतरावरील समुद्रात काँक्रीट पायाभरणी करून स्थापित करण्यात येईल. तेथील वैविध्यपूर्ण सागरी जैवविश्व पर्यटकांना पाहता येणार आहे. साहसी सागरी खेळांसाठी तिचा वापर होऊ शकेल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती ही या प्रकल्पासाठी निविदेचा तपशील निश्चित करेल.

  • जहाजावर सागरी प्रशिक्षणाची सुविधा - सागरी प्रशिक्षणासाठीही जहाजावर सुविधा उपलब्ध होणार असून व्यापारी जहाजावर काम करणाºया व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचाही प्रस्ताव आहे. वस्तुसंग्रहालयात सागरी क्षेत्राशी संबंधित वस्तू, दृकश्राव्य कार्यक्रम, सागरी क्षेत्राचा इतिहास सांगणारे आभासी दालन आदी सुविधा असतील.

तेलंगणात काँग्रेस ९५ जागा लढविणार :
  • हैदराबाद : काँग्रेसतेलंगणात विधानसभेच्या ९५ जागा लढविणार असून, उर्वरित २४ जागा प्रस्तावित आघाडीतील घटक पक्षांना सोडण्यात आल्या आहेत, असे तेलंगणाचेकाँग्रेसचे प्रभारी आर.सी. खुंटिया यांनी सांगितले.

  • काँग्रेसच्या उमेदवारांची यादी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, तेलुगू देसम, तेलंगण जनसमिती आणि भाकपने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व पक्ष जागा वाटपाबाबत आपसात चर्चा करीत आहेत. ७ डिसेंबर रोजी तेलंगणात विधानसभेची निवडणूक होणार आहे.

  • ९५ पैकी ५७ मतदारसंघांतील उमेदवारांबाबत आम्ही गुरुवारी चर्चा केली. उमेदवारांची पूर्ण यादी ८ नोव्हेंबर रोजी रात्री किंवा ९ नोव्हेंबर रोजी घोषित केली जाईल, असे खुंटिया यांनी स्पष्ट केले. तेलंगण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी आणि इतर वरिष्ठ नेते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अन्य नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आहेत.

पंतप्रधानांचा जपानी सायोनारा :
  • भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भातील दोन उल्लेखनीय घटनांनी या आठवड्याची सुरुवात झाली. एक म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २६ जानेवारी २0१९ रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनाला उपस्थित राहण्याचे भारताचे निमंत्रण नाकारल्याची बातमी आली आणि दुसरी घटना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा. या दोन्ही घटना भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

  • मोदी सरकार सत्तेत आल्यापासून चित्र असे रंगवले जात आहे की, भारत आणि अमेरिकेमधील संबंध सध्या सौहार्दाच्या सर्वोच्च पातळीवर आहेत, दोन्ही देशांमध्ये घनिष्ट मैत्री आहे. दोन्ही देशांतील संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची सुधारणा झाली असली तरी त्याची सुरुवात मोदी आणि ट्रम्प सत्तेत येण्यापूर्वीच झाली आहे; पण गेल्या चार वर्षांमध्ये या संबंधांना आणखी वरच्या पातळीवर नेण्यासारखे ना अमेरिकेने काही केले आहे, ना भारताने.

  • किंबहुना ट्रेड वॉर असो वा रशिया, इराणवरील निर्बंध, ट्रम्प यासंदर्भात भारताला अधूनमधून इशारे देण्याचे काम करत असतात. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांची दीर्घकालीन चौकट कायम असली तरी त्यावर अधूनमधून ट्रम्प यांच्या बेभरवशी वृत्तीचे प्रश्नचिन्ह लागत असते.

  • त्यातच अमेरिकन निर्बंधांची पर्वा न करता इराणकडून तेलखरेदी न थांबवणे आणि रशियाकडून एस ४00 एअर डिफेन्स मिसाइल यंत्रणेची खरेदी या भारताने केलेल्या ‘आगळिकी’च्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारताचे प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण नाकारल्यामुळे ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे सूर उमटू लागले. जागतिक पातळीवर या निमंत्रण नकाराची चर्चा आहे आणि त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत.

दिनविशेष :
  • भारतीय आगमन दिन

महत्वाच्या घटना 

  • १९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.

  • १९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

  • १९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.

  • १९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.

जन्म 

  • १४७०: इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)

  • १७५५: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १७९३)

  • १८३३: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

  • १८८२: महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९६३)

  • १८९७: दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते,  सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)

  • १९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)

  • १९४१: केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.

  • १९६५: अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८५: मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर यांचे निधन.

  • १९५०: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८५६)

  • १९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.

  • १९८४: मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.

  • १९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९०३)

  • २०१२: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)

  • २०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.