चालू घडामोडी - ०२ ऑक्टोबर २०१७

Date : 2 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
७ आॅक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहीम प्रारंभ :
  • राज्यात ९ जिल्हे व १३ महापालिका क्षेत्रांत ७ आॅक्टोबरपासून पुढील चार महिन्यांपर्यंत मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत ० ते २ वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

  • सध्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये गृहभेटी देऊन बालकांना करण्यात आलेल्या लसीकरणाबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे, ते येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी या वेळी दिले. 

  • मिशन इंद्र्रधनुष्य मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच मंत्रालयात बैठक झाली असून या वेळी मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला.

  • ७ आॅक्टोबरला ही मोहीम सुरू होणार असून दर महिन्याच्या ७ तारखेला ही मोहीम राबवली जाईल.

  • यासाठी जाणीव जागृतीवर मोठ्या प्रमाणात भर द्यावा. लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारांमुळे बालमृत्यू होऊ नये यासाठी इंद्रधनुष्य मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य सचिवांनी या वेळी केले.

ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन :
  • प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात वयाच्या ७७ व्या वर्षी मराठे यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • आज पहाटे ०१:४५ वाजता त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, सोमवारी सकाळी ९ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

  • 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी'  ही वेगळ्या वळणाची दीर्घ कथा लिहून ते प्रकाशात आले असून चिपळूणला भरणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते.

  • ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. 

  • ह.मो. मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला होता हमो या टोपण नावाने ते ओळखले जात होते, वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव येतो.

जपान, जर्मनी, दक्षिण अफ्रिका आणि कॅनडातही आता ‘आकाशवाणी’ :
  • ऑल इंडिया रेडिओ (AIR) अर्थात ‘आकाशवाणी’ आता जपान, जर्मनी आणि अन्य देशांत आपली सेवा सुरु करणार असून अनिवासी भारतीयांना आकाशवाणीचा उपयोग व्हावा हा या सेवेमागील भारत सरकारचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे.

  •  कॅनडा, दक्षिण अफ्रिका आणि मालदिव या देशांमध्येही आकाशवाणीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आकाशवाणीतील वरिष्ठ अधिकारी अमलनज्योती मुझुमदार यांनी ‘पीटीआय’ला दिली.

  • सध्या बाह्य प्रसारण विभागाकडून (ईएसडी) १५० देशांत २७ भारतीय भाषांमध्ये आकाशवाणीची सेवा दिली जात आहे. यांपैकी १४ भाषांमध्ये शेजारील देशांत तसेच दक्षिण-पूर्व आशियातील देशांना सेवा पुरवण्यात येणार आहे.

  • यापुढे अनेक देशांत आकाशवाणीच्या सेवांचा विस्तार करण्याचे ध्येय ठेवल्याचे मुझुमदार यांनी सांगितले तसेच आकाशवाणी जपान, कॅनडा, जर्मनी, दक्षिण अफ्रिका, मालदीव आणि इतर काही राष्ट्रकुल देशांत नव्या सेवा सुरु करणार असल्याचे मुझुमदार यांनी सांगितले.

  • नुकताच आकाशवाणीचा हा प्रस्ताव बाह्य प्रसारण विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्याता आला होता.

महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या जाणून घ्या 'या' सात गोष्टी :

आज २ ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची १४८ वी जयंती. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख असून आजचा हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

  • शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी गांधीजींचे नाव पाच वेळा नोबेल समिती समोर आले होते. मात्र त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला नाही. गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांना नोबेल पुरस्कार न मिळाल्याची खंत पुरस्कार समितीने व्यक्त केली होती. 

  • भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजी आयुष्यभर लढले. ब्रिटिशांनी गांधीजींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले.

  • महात्मा गांधी यांची अंतयात्रा ही ८ किलोमीटर लांब होती. जवळजवळ १० दशलक्ष लोकं अंतयात्रेत सहभागी झाले होते. 

  • गांधीजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींना पत्रे लिहीली आहेत. यात हिटलर, टॉल्सटॉय आणि आइन्स्टाइन यांचा समावेश आहे. 

  • भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या संविधान सभेत पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणादरम्यान गांधीजी उपस्थित नव्हते.

  • महात्मा गांधीयांच्या मृत्यृवेळी त्यांनी परीधान केलेले कपडे आजही संग्रालयात सुरक्षीत ठेवण्यात आले आहेत.

  • अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा पगडा होता, गांधीजींना सन्मान देण्यासाठी म्हणून गोल फ्रेमचा चश्मा वापरत.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • गांधी जयंती- भारत

  • स्वातंत्र्य दिन - गिनी

जन्म /वाढदिवस

  • दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म : ०२ ऑक्टोबर १७७५

  • सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म : ०२ ऑक्टोबर १९२६

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले १९९२

  • पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने : ०२ ऑक्टोबर १९९५

  • कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री : ०२ ऑक्टोबर १९७५

ठळक घटना

  • भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली : ०२ ऑक्टोबर १९८४

  • सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान : ०२ ऑक्टोबर १९९७

  • थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला : ०२ ऑक्टोबर २०००

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.