चालू घडामोडी - ०२ सप्टेंबर २०१७

Date : 2 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा : बकरी ईदचा उत्साह
  • बकरी ईदच्या शुभेच्छा, आपल्या समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि सुसंवादाची भावना वाढत राहो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 

  • आज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करत आहेत, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुस्लिमांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस असून या सणाला ‘ईद-उल-अज़हा’ किंवा ‘ईद-उज़-जुहा’ असेही म्हणतात, याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. 

  • ईद-उल-अधा किंवा बकरी ईद हा मुस्लिमांचा सण आहे, या  दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरा केली जाते.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा १ सप्टेंबर रोजी :
  • राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये प्राथमिक विशेष शिक्षक पुरस्कार अर्चना दळवी आणि सुरेश धारराव यांना जाहीर झाला.

  • राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा १ सप्टेंबर रोजी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या १७ व माध्यमिकच्या ८ अशा एकूण २५ शिक्षकांचा समावेश आहे.

  • २०१६-१७ या वर्षात मुंबईचे नागोराव तायडे व तृप्ती हातिस्कर यांची निवड झाली असून माध्यमिक विभागामध्ये माध्यमिक विशेष शिक्षक पुरस्कार मीनल सांगोले यांना जाहीर झाला.

रिझर्व्ह बँकेचा अहवालात दावा नोटाबंदीने आम्हाला झाला तोटा :
  • आरबीआयकडून सरकारलाही खूपच कमी लाभांश मिळाला. या आर्थिक तोट्यामागचे एकमेव महत्त्वाचे कारण म्हणजे ‘नोटाबंदी’ होय, असे परखड मत दस्तुरखुद्द आरबीआयनेच वार्षिक अहवालात व्यक्त करून, अप्रत्यक्षपणे नोटाबंदीच्या निर्णयावर बोट ठेवले .

  • केंद्र सरकार आणि भाजपाचे नेते नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे मोजून सांगत असले, तरी या निर्णयाचा मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) तोटाच सोसावा लागला.

  • ३० जून रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आरबीआयचे उत्पन्न २३.५६ टक्क्यांनी घटून ६१,८१८ कोटी रुपयांवर आले. परिणामी, आरबीआयकडून सरकारला ३०,६६३ कोटी रुपये इतकाच लाभांश देता आला असून मागच्या वर्षी आरबीआयकडून सरकारला ६५,८८० कोटी रुपये लाभांश मिळाला होता.

  • आरबीआयला विदेशी स्रोतांपासून मिळणारे उत्पन्नही ३५.३ टक्क्यांनी घटले. याचे कारण रुपयातील घसरण होय. देशांतर्गत स्रोतांपासून मिळणाºया उत्पन्नातही १७.११ टक्के घट झाली. यामागचे कारण नोटाबंदीच आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणावर बँकिंगप्रणालीत नोटा जमा केल्या. 

शाळांना स्वच्छता विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार :
  • स्वच्छतेच्या आदर्श मानदंडांची कसोशीने अमलबजावणी करणा-या देशातल्या १७२ शाळांचा या स्पर्धेत पुरस्कार व प्रशस्तीपत्राने सन्मान करण्यात आला.

  • मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे वर्ष २०१६-१७ साठी देशभरातील सर्व सरकारी शाळांसाठी स्वच्छता विद्यालयाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

  • मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विजेत्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

  • देशातील ३ राज्ये, ११ जिल्हे व १७२ शाळांना स्वच्छतेबाबत विशेष परिश्रम घेतल्याबद्दल या सोहळयात गौरवण्यात आले.

  • देशभरातल्या २ लाख ६८ हजार शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्या शाळांना मिळालेल्या पुरस्काराचे ५० हजार रुपये व प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे.

भारतीय वंशाचे जे. वाय. पिल्ले सिंगापूरचे हंगामी राष्ट्राध्यक्ष :
  • भारतीय वंशाचे ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. वाय पिल्ले यांची सिंगापूरच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष निवड झाली असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत ते या पदावरती राहतील जे. वाय पिल्ले ८३ वर्षांचे आहेत.

  • टोनी टॅन केंग याम यांनी राष्ट्रपतीपदाची ६ वर्षे पूर्ण केल्यानंतर जे. वाय पिल्ले यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली.

  • पिल्ले हे कौन्सील ऑफ प्रेसिडेंशियल अॅडवायजर्सचे अध्यक्ष असून मतदानाचा दिवस २३ सप्टेंबर पर्यंत किंवा जर अध्यक्षपदाचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यास १३ सप्टेंबर पर्यंत कामकाज पाहतील.

  • सिंगापूरचे संस्थापक पंतप्रधान ली कुआन यू हे त्यांना ' इक्वल टू द बेस्ट ब्रेन्स इन अमेरिका ' असे संबोधत असत.

  • पिल्ले यांना ही जबाबदारी सांभाळणे फारसे नवे नाही कारण ज्या ज्या वेळेस राष्ट्राध्यक्ष परदेश दौऱ्यावर जात तेव्हा पिल्ले यांनी ही जबाबदारी पार पाडलेली आहे.

  • २००७ साली राष्ट्राध्यक्ष एस. आर. नाथन आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले असताना सलग १६ दिवस जे. वाय पिल्ले या पदावरती होते.

ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली १७ वर्षीय मुलीला बेड्या :
  • गेमच्या नावे मुलांना जीव द्यायला भाग पाडणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक झाली असून धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली आरोपी १७ वर्षाची मुलगी आहे.

  • रशियन पोलिसांनी तिला बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

  • ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्यांना टास्क द्यायची, त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची जर टास्क पूर्ण केला नाही, तर गेम खेळणाऱ्याला त्याच्या परिवाराची हत्या करण्याची धमकी देत असे असा आरोप तिच्यावर आहे.

  • आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी असून तिने आपला गुन्हा कबूल केल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे आरोपी मुलीला न्यायालयात हजर केलं असता, तिला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

दिनविशेष :

जन्म /वाढदिवस

  • श्रीपाद महादेव माटे, मराठी साहित्यिक : ०२ सप्टेंबर १८८६

  • इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू : ०२ सप्टेंबर १९८८

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • वि.स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक : ०२ सप्टेंबर १९७६

  • वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री : ०२ सप्टेंबर २००९

  • श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार : ०२ सप्टेंबर २०११

ठळक घटना

  • -

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.