चालू घडामोडी - ०३ ऑगस्ट २०१७

Date : 3 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एलियन्सचा धोका; जगाला वाचवण्यासाठी 'नासा'मध्ये व्हॅकेन्सी : पगारही रग्गड
  • ''ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत का?  हे आम्हालाही अजून नक्की माहिती नाही... पण या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आमचे अनेक मिशन सुरू आहेत'' असं उत्तर एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नासाकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आलं होतं. 

  • एलियन्सच्या हल्ल्यापासून पृथ्वीचं रक्षण करता यावं यासाठी काही शूर अधिका-यांची नासाला गरज प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर (PPO) म्हणजेच ग्रह संरक्षण अधिकारी या पदासाठी भरती

  • प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरचं काम आव्हानात्मक असेल. त्याला एलियन्समुळे पृथ्वीला असलेल्या संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन त्याबाबत नासाला माहिती पुरवावी लागेल.

  • या अधिका-याला अभियांत्रिकी क्षेत्रात उच्चस्तरीय ट्रेनिंग आणि अनुभव असणं गरजेचं आहे. याशिवाय प्लॅनेट्री प्रोटेक्शनमध्ये तो तज्ञ असायला हवा.

  • वॉशिंग्टन पोस्ट आणि इन्डिपेंडंट(independent.co.uk)यासारख्या इंग्रजी वेसबाइटच्या वृत्तानुसार या कामासाठी नासा ०१ लाख २४ हजार ४०६ डॉलर ते १ लाख ८७ हजार डॉलर म्हणजे जवळपास १ कोटी २०ख रूपये वर्षाला देण्यास तयार आहे. 

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अध्यादेश जारी :
  • मुलींचा जन्मदर वाढविणे, तिच्या जन्माबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे व बालविवाहास प्रतिबंध म्हणून राज्य शासनाने ०१ जानेवारी २०१४  सुकन्या योजना सुरू केली आहे या योजनेचे राज्यात २६ हजार ८६२ लाभार्थी आहेत.

  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार रुपये आहे, अशा समाजातील सर्व घटकांना आता 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • राज्य शासनाने या योजनेतील किचकट अटी वगळून सुधारित आदेश काढला आहे.

  • तसेच ही योजना ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींनाच लागू राहील.

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान फक्त ४५ दिवसांसाठी : शाहिद अब्बासी
  • आज पाकिस्तानच्या संसदेत पीएमएल (एन) च्या शाहिद अब्बासी यांना २२१ मतं मिळाली, पण त्यांची ही निवड फक्त ४५ दिवसांसाठी झाली आहे.

  • भ्रष्टाचाराच्या आरोपात नवाज शरीफ यांची खुर्ची गेल्यानंतर आता शाहिद खकन अब्बासी हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. 

  • पाकिस्तानच्या संसदेत ३४२ सीट आहेत. १७२ मॅजिक फिगर आहे. पीएमएमलकडे १८८ जागा आहेत. तसेच इतर पक्षांचा जागा मिळून त्यांच्या आकडा २०९ पर्यंत जातो. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.

  • शाहिद अब्बासी हे पाकिस्तानचे ४५ दिवसांसाठी काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत, नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ हे पुढील पंतप्रधान असणार आहेत.

पणजी पोटनिवडणूक चुरशीची : माजी महापौर अशोक नाईक
  • गोव्यात येत्या २३ ऑगस्ट रोजी पणजी आणि वाळपईत पोटनिवडणूक आहे, यात पणजीतून मनोहर पर्रिकर निवडणूक लढवत आहेत, विशेष म्हणजे पर्रिकरांविरोधात शिवसेनेकडून माजी महापौर अशोक नाईक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

अशी होणार पोटनिवडणूक :

  • ०५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येईल.

  • ०७ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल.

  • ०९ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.

  •  २३ ऑगस्ट रोजी मतदान पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुका निवडणुका

  • २८ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाईल.

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ०७ ऑगस्टला दिसणार : खंडग्रास चंद्रग्रहण 
  • रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. म्हणजेच चंद्र पृथ्वीच्या छायेत येण्यास सुरवात होईल.

  • रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी ग्रहण मध्य होईल. त्या वेळी चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत येईल. त्यानंतर ग्रहण सुटण्यास सुरवात होईल.

  • रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल आणि चंद्रग्रहण सुटेल, असे सोमण यांनी सांगितले.

  • श्रावण पौर्णिमेच्या दिवशी (०७ ऑगस्ट रोजी) होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल, अशी माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.

  • तसेच हे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप खंड; तसेच पश्‍चिम पॅसिफिक महासागरातून दिसेल. ग्रहणाच्या दिवशी मुंबईत सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रोदय होईल. त्या वेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के प्रकाशित दिसेल.

जलविद्युत प्रकल्पांस जागतिक बॅंकेची मान्यता : काही बंधने
  • सिंधु नदीच्या या उपनद्यांवर भारताकडून किशनगंगा (क्षमता ३३० मेगावॅट) व रतल (क्षमता ८५० मेगावॅट) हे जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहेत. मात्र पाकिस्तानचा या प्रकल्पांस विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर, जागतिक बॅंकेकडून या प्रकल्पांसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  • भारतास 'काही बंधने' पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले.

  • या प्रकल्पांच्या तांत्रिक रचनांसंदर्भात असलेल्या आक्षेपांच्या सुनावणीसाठी एक न्यायालयीन लवाद नेमण्यासंदर्भातील पूर्वतयारी पाकिस्तानने करावी, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.

  • भारताने यासंदर्भातील आक्षेपांची छाननी करण्यासाठी एका अलिप्त तज्ज्ञ नेमण्यात यावा, अशी मागणी केली असून सिंधु पाणी वाटप करारांमधील कलमांचे उल्लंघन न करता या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी भारतास असल्याचे जागतिक बॅंकेने या निवेदनामध्ये स्पष्ट केले आहे.

ट्राफिक पोलिसांवर आता 'स्पेशल स्कॉड'ची नजर : हायकोर्ट
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने पोलिसांच्या हफ्तेखोरीविरोधात तक्रार नोंदवून घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केल्याची माहिती हायकोर्टाला दिली.

  • समाधान व्यक्त करत याबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्यात यावी त्यासाठी वृत्तपत्र, मराठी वृत्तवाहिन्या, इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देण्यात याव्यात अशी सूचनाही कोर्टाने वाहतूक पोलिसांना केली आहे.

  • भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या १३ वाहतुक पोलिसांविरोधात विभागीय कारवाई केली असल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टात सादर करण्यात आली आहे.

  • या प्रकणाची सुनावणी आठ आठवड्यांनी ठेवण्यात आली असून त्यावेळी वाहतूक पोलिसांनी पुढील प्रगती अहवाल द्यावा असा आदेश हायकोर्टानं दिला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : नायजर

  • सेना दिन : विषुववृत्तीय गिनी

जन्म, वाढदिवस

  • इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक : ०३ ऑगस्ट १८११

  • गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू : ०३ ऑगस्ट १९६०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • देवदास गांधी, हिंदुस्थान टाइम्सचे संपादक व महात्मा गांधींचे सुपुत्र : ०३ ऑगस्ट १९५७

  • स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी : ०३ ऑगस्ट १९९३

  • सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका : ०३ ऑगस्ट २००७

ठळक घटना

  • फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना : ०३ ऑगस्ट १९००

  • नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य : ०३ ऑगस्ट १९६०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.