चालू घडामोडी - ०३ जानेवारी २०१८

Date : 3 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या :
  • औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आज (बुधवार) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीए अभ्यासक्रमाचे आज पेपर होणार होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानं विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

  • या परीक्षांप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा एक पेपर पुढे ढकलला आहे. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती.

  • राज्याच्या काही भागातील संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मारिया शारापोव्हाचा विजय :
  • शेनझेन : पाच वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन रशियाच्या मारिया शारापोव्हाने एक सेटने पिछाडीनंतरही शानदार पुनरागमन केले आणि अमेरिकेच्या एलिसन रिस्के हिचा पराभव केला. या विजयाबरोबरच मारियाने शेनझेन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

  • जगातील माजी नंबर वन खेळाडू असलेल्या मारियाला एलिसनने संघर्ष करायला भाग पाडले. मात्र, अनुभवाच्या जोरावर मारियाने दीड तास चाललेल्या सामन्यात ३-६, ६-४, ६-२ ने बाजी मारली. एलिसनने सुरुवातीला आघाडी मिळवल्यानंतरही शारापोव्हाने ३४ विनर लगावले जे अमेरिकन खेळाडूच्या तिप्पट होते.

  • जगात ५९व्या क्रमांकावर असलेल्या शारापोव्हाने जिंकण्याचा प्रयत्न सोडला नाही. फ्रेंच ओपन चॅम्पियन व दुसरी मानांकित येलेना ओस्तापेंकोला चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना प्लिसकोव्हाविरुद्ध १-६, ४-६ ने पराभवाचा सामना करावा लागला.

२४ तास मोफत वीज : तेलंगण सरकारवर शेतकरीराजा झाला खूश :
  • हैदराबाद : तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्राला मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन, तेथील शेतकºयांना नववर्षाची अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

  • या राज्यात गेल्या १० वर्षांत अनेक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने मोठाच दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या २३ लाख कृषिपंपांना बारमाही अखंड वीजपुरवठा करण्यात येईल. सर्व क्षेत्रांतील ग्राहकांना अहोरात्र अखंडित वीजपुरवठा करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

  • येत्या मार्चपर्यंत राज्यातील विजेची मागणी ११ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे असे सरकारच्या वीजपुरवठा कंपनीने म्हटले आहे. कालेश्वरमसहित काही जलसंधारण योजना जून महिन्यापासून अंमलात येणार असून, त्यामुळे विजेची मागणी व पुरवठा यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

  • पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करून देऊ, हे शेतकºयांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी शेजारच्या राज्यांकडूनही आम्ही वीज खरेदी करू, असे मुख्यमंत्री राव यांनी सांगितले. राज्याच्या ऊर्जा विभागाने सध्याची वीजपुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी १२,६१० कोटी रुपये आजवर खर्च केले आहेत.

देशात ५० हजार वनस्पतींपैकी केवळ पाच हजाराची नोंद - सोनल पाटणकर :
  • अंबरनाथ - जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. आपल्याकडची पारंपारिक वनौषधी बहुगुणी असली तरी जागतिक स्तरावर त्या औषधांचा फारसा प्रसार झालेला नाही.

  • आयुर्वेदिक औषधे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवू शकली नाहीत. नवनव्या विज्ञान विषय शाखा निवडून देशातील तरु णांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, अस मत सोनल आयकर-पाटणकर यांनी व्यक्त केले. येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते.

  • सरत्या वर्षाच्या अखेरच्या रविवारी मराठी विज्ञान परिषदेने बदलापूर येथील तरूण संशोधक डॉ. सौरभ पाटणकर आणि सोनल आयकर-पाटणकर या दाम्पत्याचे व्याख्यान झाले. जैविक वनस्पतीजन्य पदार्थांपासून अतिसूक्ष्म काष्ठशिल्प बनवण्यात यशस्वी ठरलेल्या प्रयोगाविषयी डॉ. पाटणकर यांनी उपस्थितांना माहिती दिली.

  • सध्या पेट्रोलजन्य इंधनामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्याला पर्याय ठरणाºया पर्यावरणस्नेही इंधनांचा सध्या शोध सुरू आहे.

  • अतिसूक्ष्म तंत्रज्ञान शाखेत (नॅनो-टेक्नॉलॉजी) पर्यावरणस्नेही पद्धतीने प्रक्रि या करून जैविक घटकांपासून उर्जा मिळवण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत.

सौदी अरेबियाच्या नियमांचे ‘क्रेडिट’ मोदी घेत आहेत - ओवेसी :
  • मेहरमविना महिलांना हज यात्रेस जाण्याची सवलत देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवरून राजकारण सुरू झाले आहे. सौदी अरेबियाने दिलेल्या सवलतीचे श्रेय पंतप्रधान मोदी घेत असल्याचा आरोप एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

  • सौदी सरकारने भारत सरकारच्या आधीच ४५ वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना विना मेहरम हज यात्रेस जाण्याची सवलत दिल्याचे ओवेसी यांनी सांगितले. सौदी अरेबियाने ३ वर्षांपूर्वीच हा नियम बदलला होता. मोदी सरकारने २०१७ मध्ये याला मंजुरी दिली आहे. ज्या पुरूषाशी विवाह होऊ शकत नाही जसे वडील, सख्खा भाऊ, मुलगा आणि नातू म्हणजे मेहरम.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात मुस्लिम महिला आता पुरूष सहकाऱ्यांशिवाय हज यात्रेस जाऊ शकतील अशी घोषणा केली होती.

  • महिलांवर हा अन्याय आणि भेदभाव असल्याचे म्हटले होते. महिलांवरील अन्याय पाहून मी हैराण झालो होतो. परंतु, आम्ही हा नियम आता बदलला असून १३०० मुस्लिम महिलांनी पुरूष सदस्यविना हज यात्रेवर जाण्यासाठी अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले होते.

एक दिवस आधीच मुंबईत बंद! कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद :
  • मुंबई  - कोरेगाव-भीमा येथील रॅलीवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी, ३ जानेवारीला एक दिवसीय महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

  • मात्र या हल्ल्याचे तीव्र पडसाद मुंबईत मंगळवारी सकाळपासूनच उमटू लागल्याने दादर, हिंदमाता, चेंबूर, घाटकोपर अशा विविध ठिकाणी दुपारनंतर कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सकाळपासूनच चेंबूरच्या रास्ता रोकोपासून गोवंडी येथील रेल रोकोमुळे मुंबईतील वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते.

  • कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असताना मुंबईतील चेंबूर येथून आंदोलन पेटण्यास सुरुवात झाली. शांततेत काढलेल्या रॅलीचे रूपांतर रास्ता रोकोतून रेल रोकोपर्यंत कधी पोहोचले, हे कळलेच नाही. चेंबूर, कुर्ला, गोवंडी येथे निदर्शने सुरू असताना गोवंडी व चेंबूर येथे चार वेळा रेल रोको करण्यात आला.

  • प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीकडे जात असलेल्या रेल्वेवर चेंबूरजवळ दगडफेक झाली. त्यानंतर रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या रेल्वेचे दरवाजे प्रवाशांनी बंद केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे ही माहिती रेल्वे प्रवाशांनीच एकमेकांना दिल्याने अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

दिनविशेष

जागतिक दिवस

  • बालिकादिन / अॅक्युपेशन थेरेपी दिन.

महत्वाच्या घटना

  • १४९६: लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.

  • १९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.

  • १९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

  • १९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.

  • १९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.

  • १९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.

  • २००४: नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.

जन्म

  • १८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च१८९७)

  • १८८३: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचा जन्म. (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)

  • १९२१: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै१९९७)

  • १९२२: सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.

  • १९३१: मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

मृत्य

  • १९०३: अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचे निधन. (जन्म: ७ जून १८३७)

  • १९७५: भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी१९२३)

  • १९९४: मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.

  • १९९८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)

  • २०००: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

  • २००२: भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)

  • २००५: भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.