चालू घडामोडी - ०३ जुलै २०१७

Date : 3 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शुक्रावर करणार सजीवसृष्टीचे ‘बीजारोपण’!
  • शुक्र हा आपल्या ग्रहमालेतील सूर्यापासूनचा दुसरा ग्रह असून रात्रीच्या व पहाटेच्या आकाशात तो तेजस्वीपण दिसतो म्हणून त्याला बोली भाषेत ‘शुक्रतारा’ असे म्हटले जाते.

  • कक्षेतील प्रदक्षिणेनुसार शुक्र पृथ्वीपासून जवळात जवळ ३.८० कोटी किमी तर दूरात दूर २६.१ कोटी किमी अंतरावर आहे. 

  • ग्रहमालेतील इतर ग्रहांहून उलट्या दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे असा तो स्वत:भोवती फिरत असतो.

  • भविष्यात गरज पडली तर मानवाला ‘सेकंड होम’ म्हणून शुक्र ग्रहावर जाऊन राहणे शक्य व्हावे या कल्पनेने पृथ्वीवरील जीवाणू शुक्राच्या वातावरणात नेऊन सोडून ते कालांतराने मानवी वस्तीसाठी अनुकूल करण्याची सुरुवात आतापासून सुरू करण्याची एक अभिनव आणि धाडसी योजना मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने आखली आहे.

  • संस्थेने त्यांच्या या प्रस्तावित योजनेला ‘बीजायन मिशन’ असे नाव दिले आहे. ‘बीजायन’ हा ‘बीज’ आणि ‘आयन’ या दोन संस्कृत शब्दांचा संयोग असून त्याचा अर्थ ‘बीजाचा अज्ञातातील प्रवास’ असा होतो.

आता विमानातूनही होणार उभ्याने प्रवास! कोलंबियन एअरलाइन्सची योजना :
  • बस, लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्यांनी प्रवास करणे नित्याचेच.

  • आता विमानामधूनही प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसण्याची शक्यता असून कोलंबिया एअरलाइन्स नावाच्या विमान कंपनीने तशी योजनाच आखली आहे.  

  • प्रवाशांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी या विमान कंपनीने आपल्या विमानामधून आसनव्यवस्था काढून टाकण्याचा विचार सुरू केला आहे.

  • उभ्याने प्रवास केल्याने अधिक प्रवाशी विमानातून प्रवास करू शकतील, आणि अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याने साहजिकपणे विमानाच्या तिकिटांचे दर कमी होतील, असा कंपनीचा कायास आहे. 

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन :
  • मराठी रंगभूमीवर 'मामा' म्हणून लोकप्रिय असलेले प्रा. तोरडमल यांचा 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकातील 'प्राध्यापक बारटक्के' नाट्यरसिकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला.

  • 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'गुड बाय डॉक्टर', 'चांदणे शिंपित जाशी', 'बेईमान', 'अखेरचा सवाल', 'चाफा बोलेना', 'संगीत मत्स्यगंधा' अशा असंख्य नाटकांच्या माध्यमातून मराठी रंगभूमी गाजविलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे ०२ जुलै रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

  • या नाटकाने रेकॉर्डब्रेक अशा पाच हजार प्रयोगांचा टप्पा गाठल्याने तोरडमलांचा 'ह'च्या बाराखडीतला 'प्रा. बारटक्के' मराठी रंगभूमीच्या इतिहासात कायमचा अजरामर झाला.

  • तसेच पुण्याच्या 'बालगंधर्व' नाट्यगृहात या नाटकाचे एकाच दिवशी तीन सलग प्रयोग झाले आणि या घटनेची रंगभूमीवर त्या काळी विशेष नोंद झाली.

आयसीसी महिला विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय :
  • आयसीसी विश्वचषकात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर ९५ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.

  • भारताने दिलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ ३८ षटकांत सर्वबाद ७४ धावांतच गारद झाला.

  • भारताकडून एकता बिष्ट हिने सर्वाधिक 5 बळी मिळवले आहेत. गोस्वामी, शर्मा, जोशी आणि कौर यांनीही प्रत्येकी एक बळी टिपला आहे.

'ही' तरुणी इस्रायलमध्ये मोदींचं स्वागत करणार !
  • कोण आहे लियोरा आयझॅक ?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ०४ जुलैपासून दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत.

  • मोदी इस्रायल दौरा करणारे भारताचे पहिले पंतप्रधान असतील. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजॅमिन नेत्यान्याहू द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

  • इस्रायलमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत मोठी उत्सुकता आहे. इस्रायल मीडियाच्या वृत्तांनुसार मोदींच्या स्वागत समारंभात भारताचं राष्ट्रगीत गाण्याचा मान भारतीय वंशाची गायिका लियोरा इतझाकला देण्यात आला आहे.

मंदिर समिती अध्यक्षपदी अतुल भोसले :
  • राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे भाजपा नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे.

  • तसेच या मंदिर समितीचे प्रशासन चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या हाती आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे सभापती आहेत.

  • समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती ३० जूनच्या आत करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात दिले होते. त्यामुळे समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार या बाबत प्रचंड उत्सुकता होती.

  • राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर भोसले यांच्या रुपाने दुसऱ्या भाजपा नेत्याच्या हातात पंढरपूरच्या समितीचा कारभार देण्यात आला आहे.

ऑस्करच्या ज्युरी मेंबर्समध्ये भारतीय माणसाची निवड :
  • प्रतिष्ठेच्या ऑस्कर चित्रपट पुरस्काराच्या ज्युरी सदस्यांमध्ये उज्जवल निरगुडकर यांची निवड झाली आहे.

  • ऑस्करच्या लार्ज-क्रिएटीव्ह सायन्स विभागात त्यांची ज्युरी म्हणून निवड झाली असून, या कॅटेगरीमध्ये निवड झालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत.

  • ग्लोबल मोशन पिक्चर टेक्नोलॉजीमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ऑस्करने उज्जवल निरगुडकर यांची निवड केली आहे. त्यांना कायमस्वरुपी ऑस्करचे ज्युरी सदस्यत्व मिळाले आहे.

  • उज्जवल निरगुडकर गेल्या २४ वर्षांपासून हॉलिवूडशी संबंधित असून, त्यांनी चित्रपट क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये अमूल्य योगदान दिले आहे.

  • मुंबईच्या युडीसीटीमधून केमिकल इंजिनिअरींगची पदवी घेणा-या उज्जवल निरगुडकर यांच्या नावावर अनेक पेटंटस असून, त्यांनी फिल्म प्रोसेसिंगमध्ये स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

चौथ्या वनडेत धोनीची कासवछाप फलंदाजी ११४ चेंडूत ५४ धावा
  • चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवासाठी महेंद्रसिंह धोनीला जबाबदार धरण्यात येत आहे. धोनीला जागतिक क्रिकेटमध्ये बेस्ट फिनिशर समजले जाते.

  • धावांचा पाठलाग करताना मोक्याच्या क्षणी धोनीने अनेक सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. पण रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध १९० धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनी सपशेल अपयशी ठरला. 

  • धोनी ४८ व्या षटकापर्यंत मैदानावर होता. पण धोनीला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

  • धोनीने ११४ चेंडूत ५४ धावांची कासवछाप खेळी केली. त्यासाठी धोनीला सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • गुरुदेव रामचंद्र रानडे यांचा जन्म : ०३ जुलै १८८६

  • हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू : ०३ जुलै १९८०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • संत नामदेव यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली : ०३ जुलै १३५०

  • संत जनाबाई यांनी समाधी घेतली : ०३ जुलै १३५०

ठळक घटना

  • महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली : ०३ जुलै १८५२

  • अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने १९६४चा नागरी हक्क कायद्यावर सही केली : ०३ जुलै १९६४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.