चालू घडामोडी - ०३ जून २०१७

Date : 3 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
CBSE 10th class result 2017: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल थोड्याचवेळात जाहीर होणार :
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई)  घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल थोड्याचवेळात जाहीर होणार आहे.

  • cbseresults.nic.in. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहायला मिळतील. ९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेला देशभरातून १६.५ लाख विद्यार्थी बसले होते.

  • सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज दुपारपर्यंत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील. www.results.nic.in , www.cbseresults.nic.in , www.cbse.nic.in या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील. यापूर्वी २८ मे रोजी सीबीएसकडून बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून दहावीच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या निकालाची प्रतिक्षा लागली होती.

  • विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल कशाप्रकारे पाहावेत, याची सविस्तर माहिती सीबीएसईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच ५२००१ (MTNL), ५७७६६ (BSNL), ५८००००२ (Aircel), ५५४५६०६८ (Idea), ५४३२१, ५१३२१ आणि ५३३३३०० (Tata Teleservices), ५४३२१२०२ (Airtel), आणि ९२१२३५७१२३ (National Informatics Centre) या क्रमांकावर मेसेज केल्यास आपला निकाल उपलब्ध होणार आहे. 

विमान निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प :
  • भारताला रशिया अणुऊर्जा निर्मितीसाठी २५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे.

  • भारताच्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा निर्मितीच्या तामिळनाडूतील प्रकल्पाच्या पाच आणि सहा क्रमांकाच्या संच बांधणीचा खर्च ५० हजार कोटी रुपये असून, त्याचा निम्मा भाग रशिया कर्जरूपाने देणार आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात १ जून रोजी झालेल्या वार्षिक शिखर भेटीत कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दोन नव्या रिअ‍ॅक्टर्ससाठी उभय देशांत करारावर स्वाक्षरी झाली.

  • तसेच या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सात वर्षे लागतील, असे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.के. शर्मा यांनी सांगितले.

लिओ अशोक वराडकर आयर्लंडचे नवे पंतप्रधान :
  • मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली.

  • आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत ७३ पैकी ५१ मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.

  • आयर्लंडमध्ये २००७ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली होती.

  • 'पंतप्रधान झाल्यास देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा; तसेच राजकीय स्थैर्य देण्याचा माझा प्रयत्न असेल', अशी भूमिका वराडकर यांनी मांडली होती.

  • भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांना आयर्लंडमधील पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहून त्यांच्या भारतातील कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.

मराठमोळे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी !
  • महाराष्ट्रातील मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर हे आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहेत. आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल लागला. त्यात वराडकर हे विजयी झाले असून, ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

  • लिओ वराडकर यांनी सिमोन केव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना शेवटच्या फेरीत ७३ पैकी ५१ मतं मिळाली.

  • आयर्लंडमध्ये २००७ साली झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली.

  • त्यानंतर ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले गेले आणि अखेर ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. सिमोन कोव्हिने हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी होते.

समीर दिघे यांची मुंबई संघाचे प्रशिक्षकपदी निवड :
  • मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांची निवड केली.

  • यंदा रणजी विजेतेपद राखण्यात अपयशी ठरलेले चंद्रकांत पंडित यांची जागा घेण्यास दिघे यांच्यासह माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांचेही नाव मुंबई प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते.

  • मुंबई क्रिकेट संघटनेने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, 'समीर दिघे यांना २०१७-१८ मोसमासाठी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले आहे.'

  • मुंबई निवड समितीचे प्रमुख आणि माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीने घेतलेल्या बैठकीमध्ये ४८ वर्षीय दिघे यांची प्रशिक्षकपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

'पृथ्वी-२' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :
  • अण्वस्त्र वाहक भारतीय बनावटीच्या पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची ओडिशातील चांदीपूरनजीकच्या एकात्मिक चाचणी तळावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किलो मीटर आहे.

  • फिरत्या प्रक्षेपकातून ०२ जून रोजी सकाळी ९.५० वाजता हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. ५०० ते १ हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. यात प्रगत दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आलेला असल्याने हे क्षेपणास्त्र अचूक वेध घेते.

  • २१ नोव्हेंबर २०१६ रोजी ही यशस्वी चाचणी पार पडली होती. २००३ मध्ये लष्करात सामील करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • बाबुराव पेंटर, महान चित्रकार व शिल्पकार : ०३ जून १८९०

  • खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी : ०३ जून १८९०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक : ०३ जून २०००

  • अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक : ०३ जून २०१०

ठळक घटना

  • ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची स्थापना. १९२० मध्ये ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.)असे नामांतर : ०३ जून १८३१

  • झूट सुट दंगे - लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील ६० लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणार्‍या लोकांना बडवून काढले : ०३ जून १९४३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.