चालू घडामोडी - ०३ मे २०१७

Date : 3 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘पनामा पेपर्स’प्रकरणी ४९ व्यक्ती, कंपन्यांची चौकशी :
  • पनामा पेपर्सप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ४९ व्यक्ती आणि कंपन्यांची चौकशी सुरू केली असल्याची माहिती सरकारने संसदीय पथकाला दिली.

  • पनामा पेपर्सबाबत कोणती कारवाई करण्यात आली, अशी विचारणा भाजपच्या निशिकान्त दुबे आणि हसमुख अधिया यांनी केल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्रतिसाद दिला

  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आपल्या तीन पानी अहवालांत लोकलेखा समितीला सांगितले की, वरील संबंधितांनी फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेकडून आल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • पनामाप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी १८ परदेशांत २६६ विनंती अर्ज पाठविण्यात आले. आतापर्यंत १६५ प्रकरणांत प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ४२४ नावे आणि २५६ समूहांची चौकशी सुरू आहे. त्यापैकी १४० जण मुंबईतील आहेत.

अमेरिकन व्हिसाधारक भारतीयाचे संयुक्त अरब अमिरातीत स्वागत
  • अमेरिकन वैध व्हिसा आणि ग्रीनकार्डधारक भारतीय पासपोर्टधारक व्यक्तींचे दुबई विमानतळावर १ मेरोजीअगत्याने स्वागत करण्यात आले.

  • संयुक्त अरब अमिरात आणि भारतादरम्यानचे आर्थिक , राजक ीय आणि व्यापारी संबंध दृढ क रण्याच्या उद्देशातहत संयुक्त अरब अमिरात सरक ारने अमेरिके चा वैध व्हिसा असलेल्या किंवा ग्रीनकार्डधारक भारतीयांना संयुक्त अरब अमिरातचा व्हिसा देण्याचा (व्हिसा आॅन अराईव्हल) धोरणात्मक निर्णय घेतला होता.

  • पहिली भारतीय व्यक्त ी असून, दुबईविमानतळाच्या अधिक ाऱ्यांनी, तसेच   संयुक्त अरब अमिरात सरक ारच्या प्रतिनिधींनी त्याचेस्वागत केले.

भारताची नेहमीचीच रडकथा - आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
  • ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांअखेर ७ गुणांची कमाई केली आहे. गतउपविजेत्या भारतीय संघाने तीन सामन्यांअखेर ४ गुण मिळवले आहेत.

  • बलाढय़ संघाविरुद्ध झकास सलामी केल्यानंतर ढेपाळण्याची भारतीय खेळाडूंची रडकथा पुन्हा प्रत्ययास आली. अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत १-० अशा आघाडीनंतर भारताला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून १-३ असा पराभव स्वीकारावा लागला.

  • साखळी गटातील चुरशीच्या लढतीत २६व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने भारताचे खाते उघडले. मात्र त्यानंतर एडी ओकेनदेन (३०वे मिनिट), टॉम क्रेग (३४वे मिनिट) व टॉम विकहॅम (५१वे मिनिट) यांनी मैदानी गोल करीत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला दोन सुवर्णपदके :
  • प्रियंका इंगळे व साहिल गोखले यांनी आपापल्या वजनगटात सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले.

  • भूतान येथे ३० एप्रिल रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोला युथ कराटे अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स क्लबच्या खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्णपदके पटकावले.

  • प्रियंका व साहिलची फ्लोरिडा (यूएसए) येथे १२ व १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपकरिता याच स्पर्धेतून निवड करण्यात आली आहे.

गाळमुक्त धरण अन् गाळयुक्त शिवार योजना :
  • लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव व विदर्भातील माजी मालगुजारी तलाव मिळून ३१ हजार ४५९ जलसाठ्यांमधील गाळ काढण्यात येईल.

  • राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने तसेच धरणांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये वापरण्याची तरतूद असलेली गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

  • त्यांची साठवण क्षमता ही ४२.५४ लक्ष घनमीटर असून सिंचन क्षमता ८ लाख ६८ हजार हेक्टर आहे.

कोकणात प्रथमच 'पितांबरी'चा सेंद्रिय गूळ प्रकल्प :
  • पितांबरी कंपनीच्या वतीने कोकणातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.

  • कोकणात प्रथमच साकारलेल्या पितांबरी कंपनीच्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन नुकतेच राजापूरच्या तळवडे गावात कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या हस्ते झाले.

  • ऊस लागवडीतून परिसरातील शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पामुळे कंपनीमध्ये ६० ते ७० कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

  • सुमारे दोन हजार टन उसाचे गाळप होणार असून, त्यासाठी २०० टन सेंद्रिय गुळाचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पामध्ये गूळ पावडर, गूळ ढेप, काकवी व इतर विविध पदार्थ बनवण्यात येणार आहेत.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • संविधान दिन : पोलंड, जपान.

  • आंतरराष्ट्रीय सूर्य दिन

  • जागतिक श्वसनदाह निवारण दिन

जन्म, वाढदिवस

  • अशोक गेहलोत, राजस्थानचा मुख्यमंत्री : ०३ मे १९५१

  • उमा भारती, भारतीय राजकारणी : ०३ मे १९५९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन 

  • थोर शिक्षणतज्ज्ञ व भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकिर हुसेन : ०३ मे १९६९

  • डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थतज्ञ आणि विचारवंत : ०३ मे १९७१

  • महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी व शिक्षणतज्ज्ञ वि.द. घाटे : ०३ मे १९७८

  • प्रमोद महाजन, भारतीय राजकारणी : ०३ मे २००६

ठळक घटना 

  • ‘राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला : ०३ मे १९१३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.