चालू घडामोडी - ०३ मे २०१८

Date : 3 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्मृती इराणींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार नाही :
  • नवी दिल्ली : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात वितरण होणार आहे. मात्र पुरस्कार वितरणावरुन वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

  • कारण, व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे ते अकराच मानकऱ्यांना सन्मानित करणार आहेत. तर काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत.

  • राष्ट्रपती प्रदान करणार असलेले हे अकरा पुरस्कार नेमके कोणते हे अद्याप स्पष्ट नसलं तरी आधी तांत्रिक पुरस्कार आणि नंतर मुख्य पुरस्कार असा क्रम असतो, असं सूत्रांनी सांगितलं.

  • त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.

  • "स्मृती इराणींकडून पुरस्कार घेण्यास आमचा विरोध नाही, तर राष्ट्रीय पुरस्कार असून तो राष्ट्रपतींकडून न दिला जाण्याला आमचा विरोध आहे. इतर पुरस्कार सोहळ्यात आम्ही स्मृती इराणींच्या हस्ते सन्मान स्वीकारलाच असता," असं 'म्होरक्या'चे दिग्दर्शक अमर देवकर यांनी सांगितलं. यंदा 'म्होरक्या'ला सर्वोत्कृष्ट बालपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मोदी फेसबुकवर नंबर वन; संपूर्ण जगात सर्वाधिक पसंती :
  • नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर सर्वाधिक पसंती मिळालीय. सोशल मीडिया ब्रँड ट्विप्लोमसीनं जगात सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या नेत्यांबद्दल सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये मोदींना जगभरातून सर्वाधिक पसंती मिळालीय. मोदीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक लागतो. 

  • जगभरात कोणत्या नेत्याला सर्वाधिक पसंती दिली जाते, यासाठी ट्विप्लोमसीनं सर्वेक्षण केलं होतं. यासाठी फेसबुकवरील 650 पेजेसचा विचार करण्यात आला. या पेजवरील माहिती, फोटोज, व्हिडीओज यांचा अभ्यास करून, त्याला लोकांना मिळणारा प्रतिसाद पाहून अहवाल तयार करण्यात आला.

  • ओदिशातील लिंगाराज मंदिर यात्रेदरम्यानच्या मोदींच्या फोटोला सर्वाधिक लाईक्स मिळालेत. याशिवाय मोदींच्या इस्रायल दौऱ्यादरम्यानचा व्हिडीओ सर्वाधिक पसंती मिळवणारा इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडीओ ठरलाय. 

  • पंतप्रधान मोदींना 43.2 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. जगभरात फेसबुकवर अव्वल ठरलेल्या मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ्या फरकानं मागे टाकलंय. डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकवर 23.1 मिलियन लाईक्स मिळालेत. यानंतर या क्रमवारीत जॉर्डनची राणी रॅनिया, तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्डोगान, इंडोनेशियाचे अध्यक्ष विदोदो, इजिप्तचे अध्यक्ष सिसी आणि कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांचा क्रमांक लागतो. 

हुआवे आणणार स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम :
  • स्मार्टफोनसह अन्य संगणकीय उपकरणांमधील आघाडीचे नाव असणार्‍या हुआवेने आता स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम विकसित करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या जगभरातील स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉइड प्रणालीचा सर्वाधीक वापर केला जातो.

  • याच्या खालोखाल आयओएसचा क्रमांक असला तरी या दोन्हींच्या मार्केट शेअरमध्ये प्रचंड तफावत आहे. अर्थात अँड्रॉइडच्या मिरासदारीला अ‍ॅपलची आयओएस प्रणाली टक्कर देऊ शकेल अशी आजची स्थिती नाही. अर्थात अँड्रॉइडच्या पहिला क्रमांकाला सध्या तरी धोका नसल्याची बाब उघड आहे. तथापि, आता हुआवे या मातब्बी चीनी कंपनीने स्वत:ची ऑपरेटींग प्रणाली विकसित करण्यास प्रारंभ केल्याची माहिती आता समोर आली आहे.

  • हुआवे आणि या कंपनीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने चीन, भारत व अमेरिकेसह अन्य राष्ट्रांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. यांचे स्मार्टफोन हे अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे आहेत. तथापि, अमेरिकेमध्ये लायसन्सींगच्या मुद्यावरून अनेक चीनी कंपन्यांवर तेथील सरकारची कडक नजर आहे.

पाच वर्षांत झाले २३ हजार बँक घोटाळे!, रिझर्व्ह बँकेची माहिती :
  • नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत देशातील विविध बँकांमध्ये झालेले तब्बल २३ हजार बँक घोटाळे उघडकीस आले असून, या घोटाळ्यांमुळे बँकांना तब्बल १ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने एका माहिती अधिकार अर्जावर ही माहिती दिली आहे.

  • रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २0१७ ते १ मार्च २0१८ या वर्षभराच्या काळात सर्वाधिक ५,१२५ बँक घोटाळे उघडकीस आले. या काळात सर्वाधिक २८ हजार ४५९ कोटी रुपयांची रक्कम घोटाळ्यात अडकली.

  • सन २0१६-१७ मध्ये ५,0७६ बँक घोटाळे उघड झाले. या घोटाळ्यात अडकलेली रक्कम २३ हजार ९३३ कोटी रुपये होती, तसेच २0१३ ते मार्च २0१८ या काळात २३,८६६ बँक घोटाळे उघडकीस आले. त्यापैकी प्रत्येक घोटाळ्यातील रक्कम १ लाख रुपयांपेक्षा अधिक असून, सर्व घोटाळ्यांत मिळून १,00,७१८ कोटी रुपयांचा फटका बँकांना बसला आहे.

  • रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, २0१५-१६ मध्ये ४,६९३ बँक घोटाळे झाले. त्यात बँकांना १८ हजार ६९८ कोटी रुपयांचा फटका बसला. सन २0१४-१५ मध्ये ४,६३९ घोटाळे झाले. त्यातून बँकांचे १९ हजार ४५५ कोटी रुपये बुडाले, तर २0१३-१४ मध्ये ४,३0६ घोटाळ्यांत बँकांचे १0,१७0 कोटी रुपये बुडाले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६२ होणार :
  • नवी दिल्ली : सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारची पावले पडत आहेत.

  • मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाºयांचे सेवानिवृत्ती वय ६0 वरून ६२ करण्याबाबत केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. पुढील लोकसभा निवडणुकांच्या आधी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशने कर्मचाºयांबाबत या आधीच हा निर्णय घेतला, तर छत्तीसगडमधील सरकारी कर्मचाºयांबाबत मुख्यमंत्री रमणसिंह सरकारने २0१३ मध्येच निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढविले. पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेतला होता.

  • अर्थमंत्रालयातील अधिकाºयांच्या मते निवृत्तीचे वय वाढविल्यास सरकारी खजिन्यावरील भार काही अंशी कमी होईल. पेन्शन व अन्य खर्चातून सरकारला काहीशी सवलत मिळू शकेल. तब्बल ५0 लाख कर्मचाºयांना फायदा होईल. मोदी एखाद्या महत्त्वाच्या कारणाच्या निमित्ताने ही घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्याची घोषणा अपेक्षित आहे.

  • मात्र, असा निर्णय झाल्यास नव्या सरकारी नोकºयांची संख्या कमी होतील आणि नोकरीच्या संधींवरही संक्रांत येईल, पण सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय या आनंदी होतील आणि त्याचा राजकीय फायदा मोदी सरकारला होईल, असे गणित आहे.

गांधी जयंती व्हावा जागतिक उत्सव :
  • नवी दिल्ली : दहशतवादी आणि हिंसेला सामोरे जाणाऱ्या जगात राष्टÑपिता महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्त्व प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी केले. संयुक्त राष्टÑ आणि बहुस्तरीय आंतरराष्टÑीय संस्थांच्या माध्यमातून गांधी जयंती साजरी करून हा जागतिक सोहळा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

  • २ आॅक्टोबर २०१८ ते २०२० पर्यंत महात्मा गांधी जयंतीउत्सव कशी साजरी करावी, याचे नियोजन करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या राष्टÑीय समितीच्या पहिल्या बैठकीला उपराष्टÑपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहनसिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, २१ राज्यांचे मुख्यमंत्री, चीनचे विद्वान क्युयायू शांग आणि बर्नी मेयर यांची उपस्थिती होती. भारतातील ११६ जणांसह या समितीचे एकूण १२५ सदस्य आहेत.

  • गांधी जयंती साजरी करण्यासाठी महत्त्वपूर्ण रचनात्मक सूचना, शिफारशी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समितीच्या सदस्यांना धन्यवाद दिले.

  • कार्यांजली या विषयसूत्रानुसार कार्यक्रम आखले जावेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. महात्मा गांधी आणि त्यांची शिकवण चिरंतन आहे. जयंती साजरी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. जेणेकरून अवघे जग दखल घेऊन यात सहभागी होईल, असेही ते म्हणाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.

  • १८०२: वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.

  • १९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.

  • १९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

  • १९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.

जन्म

  • १८९६: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७४)

  • १८९७: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९९४)

  • १८९८: शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म. (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)

  • १९५१: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म.

मृत्यू

  • १९६९: भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)

  • १९७१: प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९०१)

  • १९७७: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

  • १९७८: लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे पुणे येथे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८९५ – घोसपुरी, अहमदनगर)

  • १९८१: हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस यांचे निधन. (जन्म: १ जून १९२९)

  • २०००: जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०६)

  • २००६: भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९)

  • २००९: जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.