चालू घडामोडी - ०३ नोव्हेंबर २०१८

Date : 3 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यात ४ हजार ७३८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार :
  • मुंबई : राज्यातील 4 हजार 738 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारतर्फे ही भरती केली जाणार असून, आता महाविद्यालयांना सदरील जागा भरण्याची अनुमती मिळणार आहे.

  • तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचंही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलं. विनोद तावडेंनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली.

  • राज्यातील विद्यापीठं आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं. या पार्श्वभूमीवर केवळ तासिका तत्त्वावर अध्यापक भरती न करता आता थेट अध्यापक भरती करण्यात येणार आहे.

  • अध्यापकांच्या 3580 जागा, शारीरिक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4738 पदे येत्या काळात भरण्यात येणार आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही भव्य पुतळा उभारण्याची मागणी :
  • स्वातंत्र्य सैनिक आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा उभारा अशी मागणी आता त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. ३१ ऑक्टोबरला स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण करण्यात आले. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा आहे. हा पुतळा जगातल्या उंच पुतळ्यांपैकी सर्वात उंच पुतळा आहे. यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला जावा अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दिल्लीतील इंडिया गेट या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला जावा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच २३ जानेवारी या पुतळ्याची आणि त्यांच्या स्मारकाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांनी या संदर्भातली मागणी केली आहे. चंद्रकुमार बोस यांनी या संदर्भातले ट्विट करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे. दिल्लीतील इंडिया गेट या ठिकाणी हा पुतळा उभारला जावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

  • ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुँगा’ असा नारा देत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान खूप मोठे आहे. त्यांचा याच योगदानाचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भातली घोषणा करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे.

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिल्लीत उभारला जावा ही मागणी अनेक दिवसांपासून होते आहे. आझाद हिंद सेनेच्या माजी सैनिकांचीही ही इच्छा आहे. आता आम्ही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी २३ जानेवारीला या पुतळ्यासंदर्भातली घोषणा करावी अशीही मागणी आम्ही केली आहे, असेही चंद्रकुमार बोस यांनी स्पष्ट केले.

अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची योगी आदित्यनाथ यांची योजना :
  • राम मंदिरावरून देशात विविध चर्चा सुरु आहेत. राम मंदिर प्रश्नी सुप्रीम कोर्ट काय फैसला देणार ते जानेवारीत स्पष्ट होऊ शकते. अशात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत श्रीरामाचा १०० मीटर उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याची योजना पुढे आणली आहे.

  • या पुतळ्यात श्रीरामाचे रुप हे राजाच्या स्वरूपात दिसणार आहे. हा पुतळा धनुर्धारी असेल असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा उभारण्याची मागणी होते आहे. त्यापाठोपाठ अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्यात येईल अशी योजना योगी आदित्यनाथ घेऊन आले आहेत.

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेल यांचा पुतळा निर्माण करणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनाच रामाच्या पुतळ्याचे काम देण्यात आले येईल अशीही माहिती समोर आली.

  • एवढंच नाही तर रामाच्या पुतळ्याचे एक मॉडेल (छोटी प्रतिकृती) हे योगी आदित्यनाथ यांना राम सुतार यांनी दाखवले असून ते त्यांना पसंत पडले आहे असेही समजते आहे. दिवाळीच्या तोंडावरच ही योजना योगी आदित्यनाथ यांनी आणली आहे. टाइम्स नाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

रशियन तंत्रज्ञानाच्या एअरबोटची नागपुरात निर्मिती :
  • नागपूर : रशियातील एअरबोट आता भारतात पाहायला मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरवासियांना अत्याधुनिक दिवाळी भेट आणली आहे. नागपुरातल्या कोराडीत एअरबोटची निर्मिती होणार आहे.

  • रशियन सरकारच्या मदतीने ही टेक्नॉलाजी भारतात येणार आहे. सध्या रशियात वास्तव्यास असलेले लाल बहादूर शास्त्री यांचे पणतू सुकृत शरण या प्रकल्पाचे प्रमुख असणार आहेत. या अत्याधुनिक एअरबोटची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

कशी असेल एअरबोट ?

  • रशियन सरकारच्या मदतीने जगातील एकमेव हायब्रीड एअरोबोट टेक्निक

  • बोटसाठी कारचे इंजिन, विमानाचे पंखे असणार, मात्र चालणार पाण्यावर

  • पाणी, बर्फ, वाळू अशा कोणत्याही ठिकाणी चालण्यास सक्षम

  • साधारण स्पीड बोट 20 किमी प्रतितास वेगाने जाते, तर एअर बोट ताशी 80 किमी वेगाने धावेल

  •  नागपुरातल्या कोराडीत पाच एकर जागेत निर्मिती होणार

  • इंधनासाठी इथेनॉलचा वापर केल्याने टॅक्सीपेक्षाही कमी दरात प्रवास शक्य होईल.

भारतात जलवाहतुकीकडे प्रचंड दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे नद्यांचा वापर प्रवासासाठी करायचा असेल, तर असं तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.

५९ मिनिटात एक कोटीचं कर्ज, लघुउद्योजकांसाठी मोदींची खुशखबर :

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना एक कोटी रुपयांपर्यंत तात्काळ कर्ज मिळण्याची तरतूद केली आहे. अवघ्या 59 मिनिटात म्हणजेच एका तासाच्या आत एक कोटीचं कर्ज उपलब्ध होणार आहे.

सध्या 59 मिनिटांत एक कोटीचं कर्ज मिळण्याची सोय वर्तमान व्यावसायिकांसाठीच आहे. नव्या व्यावसायिकांनाही लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल. कर्ज मंजूर होताच एका आठवड्यात रक्कम बँक खात्यात जमा होईल. कर्जासाठी https://psbloansin59minutes.com/signup या लिंकवर अर्ज करायचा आहे.

कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील माहिती तयार ठेवायची

  • ·जीएसटी आयडेंटिफिकेशन क्रमांक, जीएसटी युजर आयडी, पासवर्ड
  • ·आयकर ई-फायलिंग पासवर्ड, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा बर्थ किंवा मागच्या तीन वर्षांचे आयटीआर एक्सएमएल फॉर्मॅटमध्ये
  • ·करंट अकाऊंट – नेटबँकिंग युजरनेम, पासवर्ड, किंवा मागच्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट पीडीएफ
  • ·डायरेक्टर/ पार्टनर/ प्रोपरायटर माहिती: बेसिक, पर्सनल, केवायसी, शैक्षणिक माहिती, फर्मच्या मालकीची माहिती
  • अर्ज मंजूर झाल्यावर प्रक्रिया शुल्क एक हजार रुपये + जीएसटी भरावा लागेल. या कर्जाच्या व्याजावर दोन टक्क्यांची अनुदानातून सूट देण्यात येईल.
  •  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.

  • १८३८: टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन.

  • १९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.

  • १९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.

  • १९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला.

  • १९१८: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.

  • १९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.

  • १९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.

  • १९५७: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.

  • १९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.

  • २०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.

जन्म 

  • १६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)

  • १९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)

  • १९०१: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७२)

  • १९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)

  • १९२१: अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)

  • १९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.

  • १९३३: नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.

  • १९३७: चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९९८)

मृत्यू 

  • १८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८११)

  • १९७५: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९२५)

  • १९९०: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)

  • १९९२: हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)

  • १९९८: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२०)

  • १९९८: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)

  • २०००: चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.

  • २०१२: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.