चालू घडामोडी - ०४ ऑगस्ट २०१७

Date : 4 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यसभेत काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष ठरला : भाजप
  • नरेंद्र मोदी सरकार मे २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून राज्यसभेत सर्वाधिक भाजपचे खासदार असण्याची ही पहिलीच वेळ परंतु, भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) या वरिष्ठ सभागृहात निर्णायक बहुमत नाही.

  • ज्येष्ठांच्या या सभागृहात आता भाजपचे ५८ खासदार तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही ५७ इतकी झाली आहे.

  • मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत भाजपचे नूतन खासदार संपतिया उइके यांनी गुरूवारी शपथ घेतली. केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती.

  • पण संयूक्त जनता दल (जेडीयू) बरोबर आल्याने त्यांची ताकद मात्र वाढली आहे. पुढील वर्षीपर्यंत म्हणजे २०१८ पर्यंत राज्यसभेत काँग्रेस पक्षच सर्वांत मोठा पक्ष राहिला असता.

जागतिक योगा स्पर्धेत श्रेया कंधारेला सुवर्णपदक :
  • सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोंढवळे (ता. मुळशी) येथील श्रेया कंधारे हिने १६ वर्ष वयोगटात दोन सुवर्णपदके पटकावित भारताचा तिरंगा जगात उंचावला आहे.

  • आठ देशांतील दोनशेपेक्षा जास्त योगापटूंना नमवत श्रेयाने ही जिगरबाज कामगिरी केली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • श्रेया ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेत शिकते. तालुकापातळीवर अव्वल यश मिळवित श्रेया थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोचली.

  • तसेच ५ वर्षांत तिने महाराष्ट्राला ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदके मिळवून दिली, याचबरोबर मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत तिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.

सुरपसॉनिक हायपरलूप ट्रेनमुळे ३ तासाचा प्रवास फक्त ३० मिनिटात :
  • हायपरलूप म्हणजे सुपरसॉनिक स्पीडने धावणारी रेल्वे सुपरसॉनिक स्पीडने धावणा-या रेल्वेचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होऊ शकते.

  • लास वेगासमध्ये खासगी जागेत संपूर्ण हायपूरलूप सिस्टिमची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून अशा प्रकारची रेल्वे तयार करण्याच्या मार्गातील एक एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे हायपरलूप वनकडून बुधवारी सांगण्यात आले.

  • त्यामुळे सुपरसॉनिक स्पीडने धावणा-या रेल्वेचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होऊ शकते, इलेक्ट्रिक कार मेकर टेस्ला आणि रॉकेट कंपनी स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांची हायपरलूप वन कंपनी हायपरलूप सिस्टिमची उभारणी करणार आहे. 

  • २०१३ मध्ये मस्क यांनी लॉस एंजल्स ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ६४० किलोमीटरचे हायपरलूप नेटवर्क उभारण्यासाठी ६ अब्ज डॉलरपेक्षा कमी खर्च येईल तसेच हा मार्ग उभारणीसाठी सात ते दहावर्ष लागतील असे सांगितले होते. 

कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व :
  • राज्यसभेवर नियुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी संबंधित खासदारांना आपला पक्ष किंवा अपक्ष राहणार असेल तर तसे स्पष्ट करावे लागते.

  • कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे स्पष्ट झाले, मी भाजपमध्ये गेलो नाही तर सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

  • या सन्मानाच्या पदावर दिलेली संधी, महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची मिळणारी संधी, मराठा आरक्षणापासून अनेक प्रश्नांबाबत लागणारे पाठबळ याचा विचार करून मी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे.

जगातील उंच रहिवाशी इमारतींपैकी ७९ मजली 'द टॉर्च'ला आग : दुबई
  • जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी एक असलेल्या दुबईतील ‘टॉर्च टॉवर’ला आग लागली होती, सुदैवाने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग विझवण्यात यश आलं आहे.

  • इमारतीच्या एका बाजुला आगीच्या ज्वाळा लागल्या होत्या, रात्री एकच्या सुमारास ६७ व्या मजल्यावर ही आग

  • लागल्याची माहिती आहे, आग विझवून कूलिंग ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत पहाटेचे चार वाजले.

  • ७९ मजल्याची दुबईतील ‘टॉर्च टॉवर’ ही इमारत १ हजार १०५ फुट (३३७ मीटर) उंच असून दुबईतील मरिना भागात असलेला हा टॉवर जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी ही एक आहे.

राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अजय तापडिया यांनी ३ ऑगस्ट रोजी दिला राजीनामा :
  • राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अजय तापडिया यांनी ३ ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.

  • पक्षानेही हा राजीनामा तातडीने मंजूर केला असून, महानगर जिल्हाध्यक्ष पदाचाप्रभार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलचंदानी यांच्याकडे दिला आहे.

  • महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या तिकिट वाटपातील आरोप-प्रत्यारोपाला कंटाळून तापडिया यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षबांधणीसाठी ऑगस्टमध्ये अकोला दौर्‍यावर येत आहेत, त्यानिमित्ताने पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • क्रांती दिन : बर्किना फासो.

  • संविधान दिन : कूक द्वीपसमूह.

जन्म, वाढदिवस

  • ना. सी. फडके, प्रसिद्ध कथा-कादंबरीकार : ०४ ऑगस्ट १८९४

  • किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक : ०४ ऑगस्ट १९२९

  • बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी : ०४ ऑगस्ट १९६१

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू : ०४ ऑगस्ट १९६७

ठळक घटना

  • नागपूर विद्यापीठाची स्थापना : ०४ ऑगस्ट १९२३

  • जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना : ०४ ऑगस्ट १९४७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.