चालू घडामोडी - ०४ डिसेंबर २०१८

Date : 4 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत प्रथमच उत्सुक :
  • भारतात २०३२ मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुक असलेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) पहिल्यांदाच रस दाखविला असून त्यासाठी आयओएने आता मदतीसाठी सरकारशी संपर्क साधण्याचे ठरवले आहे.

  • आयओएचे अध्यक्ष नरेंदर बात्रा यांनी या वर्षी भारत दौऱ्यावर आलेले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्याशी बोलणी करून २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचा विचार करण्यात यावा, असे सांगितले होते. बाख यांनी भारताच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. आयओएने २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी याआधीच आपली उत्सुकता असलेले पत्र आयओसीकडे सादर केले आहे.

  • आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी या महिन्यात टोकियो येथे जॅकलिन बॅरेट यांच्या अध्यक्षतेखालील आयओसीच्या निविदा सादर करणाऱ्या तीनसदस्यीय समितीची भेट घेतली होती. ‘‘२०३२ साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही गंभीर आहोत. याआधीच आम्ही उत्सुकतेचे पत्र आयओसीकडे सादर केले आहे. त्याचबरोबर मी आयओसीच्या निविदा समितीची भेट घेतली आहे. त्यांनी आयोजनासाठी स्वागत केले असून लवकरच भारत ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करू शकेल, अशी ग्वाही दिली आहे,’’ असे मेहता यांनी सांगितले.

  • आयओएच्या वरिष्ठ  पदाधिकाऱ्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी नवी दिल्ली आणि मुंबई या दोन ठिकाणांचा विचार केला आहे. मात्र अन्य शहरांचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. आयओएने पहिल्यांदाच आयओसीकडे ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी रस दाखवला आहे. २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठीच्या निविदा प्रक्रियेला २०२२ सालापासून सुरुवात होणार असून २०२५ मध्ये विजेत्या शहराची निवड केली जाईल. भारतापाठोपाठ इंडोनेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण कोरिया, जर्मनी हे देश ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुक आहेत.

बाबरी मशीद पाडल्याच्या दिवशी विहिंप साजरा करणार शौर्य दिवस :
  • तीन दिवसात बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला २६ वर्षे पूर्ण होतील. एकीकडे देशात राम मंदिर कधी बांधले जाणार त्यासाठी अध्यादेश काढा अशी चर्चा आहे आणि आता विहिंप ज्या दिवशी बाबरी पाडली गेली म्हणजेच ६ डिसेंबरला देशभरात शौर्य दिवस साजरा करणार असल्याचे समजते आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती केली जावी म्हणून धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. आता शौर्य दिवस साजरा केला जाणार आहे तर १८ डिसेंबरला गीता जयंती उत्सव साजरा केला जाईल असेही समजते आहे.

  • पारंपरिक पद्धतीने शौर्य दिवस साजरा केला जाई अशी माहिती विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी दिली आहे. अयोध्येत होम-हवन केले जाईल अशी शक्यता आहे. तसेच या दिवशी पुन्हा एकदा राम मंदिर बांधण्याची मागणी करण्यात येईल असेही कळते आहे. ६ डिसेंबर २०१८ ला बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला २६ वर्षे पूर्ण होतील.

  • शौर्य दिवस साजरा करतानाच आम्ही सरस्वती पूजन करणार आहोत. राम मंदिराच्या निर्मितीतली सगळी विघ्नं दूर झाली पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वबाधा मुक्ती हवन केले जाणार आहे. तसेच ज्या कारसेवकांचा ६ डिसेंबर १९९२ ला गोळीबारात मृत्यू झाला त्या सगळ्यांना श्रद्धांजलीही वाहिली जाणार आहे. दिल्लीत ९ डिसेंबरला आम्ही धर्मसभेचेही आयोजन केले आहे असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. या धर्मसभेत पाच लाखापेक्षा जास्त लोकांचा सहभाग असणार आहे असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

  • ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दरम्यान प्रयागराज या ठिकाणी धर्म परिषद भरवणार आहोत. या धर्म परिषदेसाठी ५ हजारांपेक्षा जास्त साधू संत येतील. दक्षिण भारत आणि पूर्व भागातूनही साधू संत येतील असेही शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या धर्म परिषदेत राम मंदिराची निर्मिती, गोरक्षा, गंगा नदीची स्वच्छता यावर विचार विनिमय केला जाणार आहे. 

माजी सरन्यायाधीश मिश्रा यांच्यावर ‘रिमोट कंट्रोल’ :
  • माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर कुठल्या तरी बाह्य़ सूत्राचा ‘रिमोट कंट्रोल’ चालत होता आणि त्यामुळे न्यायदानावर परिणाम होत होता, असा खळबळजनक दावा नुकतेच निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सोमवारी केला. मात्र, हे ‘बाह्य़ सूत्र’ कोण होते आणि कोणत्या प्रकरणांबाबत पक्षपात करण्यात आला हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

  • तथापि, चार न्यायमूर्तीच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेनंतर न्या. मिश्रा यांच्या सरन्यायाधीशपदाच्या नंतरच्या कारकीर्दीत परिस्थितीत चांगला बदल होण्यास सुरुवात झाली, असेही न्या. जोसेफ यांनी लगेच स्पष्ट केले.

  • तत्कालीन सरन्यायाधीश कुठल्या तरी बाह्य़ सूत्राच्या प्रभावाखाली काम करत होते. या सूत्राचा त्यांच्यावर ‘रिमोट कंट्रोल’  चालत होता. कुठल्या तरी बाह्य़ सूत्राच्या प्रभावामुळे न्यायदानावर परिणाम होत होता, असे २९ नोव्हेंबरला निवृत्त झालेले जोसेफ यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

  • सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांचे ‘मर्जीनुसार’ वाटप केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी ज्या चार न्यायमूर्तीनी १२ जानेवारीला ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली होती, त्यात जोसेफ यांचा समावेश होता. त्यानंतर निवृत्त झालेले जे. चेलमेश्वर, विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि मदन लोकुर हे इतर न्यायाधीश होते.

भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणं अशक्य – इम्रान खान :
  • गेल्या अनेक काळापासून काश्मीर मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. काश्मीर मुद्द्यावरुन दोन्ही देशांनी एकमेकांवर अनेकदा टीका केली असून संघर्ष टोकाला गेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर बोलताना युद्ध हा यावर उपाय नसल्याचं म्हटलं आहे. काश्मीरचा मुद्दा युद्धाने नाही तर चर्चेच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे असं मत इम्रान खान यांनी व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे मत मांडलं आहे.

  • जोपर्यंत चर्चा सुरु होत नाही, तोपर्यंत काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर चर्चा केली जाऊ शकत नाही. हा मुद्दा सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्यूला वापरण्यात यावा असं विचारलं असता इम्रान खान यांनी सांगितलं की, यावर दोन ते तीन पर्याय आहेत, ज्यावर चर्चा केली गेली आहे. मात्र यावर अधिक बोलण्यास किंवा माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. यावर आता बोलणं घाईचं ठरेल असं ते म्हणाले आहेत.

  • पुढे बोलताना त्यांनी भारतासोबत युद्दाची कोणतीही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. भारतासोबत युद्ध छेडलं जाण्याची कोणतीही शक्यता नाही. दोन्ही देशांकडे अणुबॉम्ब असून, युद्ध करु शकत नाही. तसं झाल्यास त्याचे परिणाम खूप वाईट होतील. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गांभीर्याने वाटचाल करत आहे. पाकिस्तानी सरकार आणि लष्कराची देखील हीच इच्छा आहे असंही ते म्हणाले आहेत.

म्हणून या देशाच्या राष्ट्रपती सांगावे लागले, 'अभी हम जिंदा है!' :
  • अबुजा (नायजेरिया) - ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती घेण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण नारजेरियाच्या राष्ट्रपतींच्या हयात असण्यावरून घडलेल्या प्रसंगाबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही.  

  • नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी पोलंडच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. तेथे नायजेरियन समुहाला संबोधित करताना ते खरे बुहारी आहेत की त्यांचा डुप्लिकेट आहेत, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनाचा आपण जिवंत आहोत, असे स्पष्टीकरण द्यावे लागले.

  • दरम्यान, नायजेरियाच्या राष्ट्रपतींनी या अफवेचे खंडन केले. तसेच अफवा पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले. ''पोलंडमध्ये नायजेरियन नागरिकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मी खरा आहे की क्लोन असा प्रश्न विचारण्यात आला. ही अफवा माझ्यासाठी धक्कादायक नव्हती. कारण गतवर्षी मी प्रकृतीच्या कारणांमुळे सुट्टी घेटतल्यावर अनेक जणांनी माझा मृत्यू झाल्याचे मानले होते." असे ट्विट त्यांनी केले. 

  • ''मी जिवंत आहे, याचा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. आता मी लवकरच माझा 76 वा वाढदिवस साजरा करणार आहे."असे त्यांनी सांगितले. नायजेरियाचे राष्ट्रपती बुहारी यांच्या मृत्यूचे वृत्त ट्विटर, फेसबूक आणि यूट्यूबवरून पसरले होते. तसेच त्यांच्या जागी सत्तेवर बसलेली व्यक्ती ही त्यांचा डुप्लिकेट असल्याचा दावा करण्यात येत होता.

रोनाल्डो, मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिले नाहीत, 'या' खेळाडूने पटकावला मान :
  • माद्रिद : जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलला दिला जाणाऱ्या बॅलोन डी ओर पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली. गेली दहा वर्षे रोनाल्डो आणि मेस्सी यांनी आलटून पालटून हा पुरस्कार स्वतःकडे ठेवला होता.

  • मात्र, मंगळवारी या दोन्ही दिग्गज खेळाडूंना क्रोएशिया संघाचा कर्णधार ल्युका मॉड्रिचकडून धक्का बसला. 2018 चा बॅलोन डी ओर पुरस्कारावर मॉड्रिचच्या नावाची मोहोर उमटली. त्याने 277 गुणांच्या फरकाने हा पुरस्कार जिंकला आणि अशी कामगिरी करणारा तो क्रोएशियाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. ॲडा हिगेर्बर्ग हीच्या 

  • मॉड्रिचने 753 गुणांसह वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे रोनाल्डो ( 476) आणि ॲंटोइने ग्रिझमन (414) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदारांत आघाडीवर असलेल्या कायलिन मॅबाप्पेला 347 गुणांसह चौथ्या स्थानावर रहावे लागले.

  • मेस्सीला केवळ 280 गुण मिळाली. मॉड्रिचसाठी हे वर्ष अविस्मरणीय राहिले. त्याने विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल, युएफाचा सर्वोत्तम खेळाडू, फिफाचा सर्वोत्तम खेळाडू आणि आता बॅलोन डि ओर अशे पुरस्कार पटकावले. फुटबॉल इतिहासात एकाच वर्षात हे चारही पुरस्कार जिंकणारा मॉड्रिच पहिलाच खेळाडू ठरला. 

कसा लागू होणार सातवा वेतन आयोग :
  • मुंबई : राज्यात 1 जानेवारी 2019 पासून कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. परंतु त्यास खूप विलंब झालेला आहे. राज्य सरकारला त्याआधी 2016, 2017 आणि 2018 या तीन वर्षांची थकबाकी द्यायची आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे याबाबत म्हणाले की, "सरकारने सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच हप्त्यात दिली होती, आता आमची विनंती आहे की किमान तीन हप्त्यात द्यावी."

  • राज्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 19 लाख पदांपैकी 2 लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकूण 17 लाख अधिकारी, कर्मचारी आणि 7 लाख पेन्शनर्सना सातवा वेतन आयोगाचा लाभ होईल. सातव्या वेतनासाठी वार्षिक 15 हजार कोटी रुपयांचे तर घरभाडे आणि इतर भत्त्यांसाठी 6 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यामुळे राज्य शासनाला एकूण 21 हजार कोटी रुपयांचा वार्षिक खर्च येणार आहे

  • शिर्डी साई संस्थानाकडून 500 कोटी रुपयांचे कर्ज घेणाऱ्या सरकारने सातवा वेतन आयोग लागू करावा का? असा सवाल कुलथे यांनी उपस्थित केला आहे.

  • राज्यात दुष्काळ परिस्थिती आहे, सरकारने दुष्काळ जाहीरही केला आहे. भविष्यात दुष्काळाची भीषणता वाढू शकते. अशा परिस्थितीत सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येऊ शकतो. गेल्या दोन वर्षात राज्यात दुष्काळ नव्हता, तेव्हा सातवा वेतन आयोग लागू करायला हवा होता, असे मत कुलथे यांनी मांडले.

दिनविशेष :
  • भारतीय नौसेना दिन

महत्वाच्या घटना 

  • १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.

  • १८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९२४:  गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

  • १९६७: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.

  • १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

  • १९७१: भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.

  • १९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.

  • १८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९२४:  गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

  • १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

  • १९७१: भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.

  • १९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

  • १९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

  • १९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

मृत्यू 

  • १८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म: २२ मे १७८३)

  • १९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१)

  • ११३१: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचे निधन. (जन्म: १८ मे १०४८)

  • १९७३: कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)

  • २०००: सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९३६)

  • २०१४: भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.