चालू घडामोडी - ०४ मे २०१७

Date : 4 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चार बॉक्सिंगपटू जागतिक स्पर्धेसाठी पात्र :
  • शिवा थापा, सुमीत संगवान, अमित फंगाल यांनी ताश्कंद येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदक निश्चित करतानाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला.

  • ९१ किलो वजनी गटातून खेळणाऱ्या सुमीतने तृतीय मानांकित फेंगकाईवर ४-१ असा विजय मिळवला असून उपांत्य फेरीत सुमीतसमोर ताजिकिस्तानच्या जाखोन कुबरेनोव्हचे आव्हान असणार आहे. कुबरेनोव्हने पाकिस्तानच्या मेहमूद सनाउल्लाचा धुव्वा उडवला.

  • ४९ किलो वजनी गटातून खेळणाऱ्या अमितने चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या कॉर्नेलिस क्वांगू लांगूला ४-१ असे नमवले. उपांत्य फेरीत अमितसमोर उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या हसनबॉय दसमॅटोव्हचे खडतर आव्हान आहे.

  • तिसऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे पदक पक्के करताना शिवाने तैपेईच्या च्यु इन लाइवर मात केली. शिवाने २०१३ आणि २०१५ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदकाची कमाई केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रऋषी : बाबा रामदेव
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं असून मी अस्वच्छता करणार नाही, असा संकल्प देशवासियांनी करण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रऋषी आहेत, अशा शब्दात योगगुरु बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. तर अशा सन्मानांमुळं जबाबदाऱ्यांमध्ये आणखी वाढ होत असल्याचं मोदींनी म्हटलं.

  • केदारनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिद्वार येथील पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन केलं.

  • याप्रसंगी मोदींच्या सत्कारार्थ केलेल्या भाषणात बाबा रामदेव यांनी मोदींची तोंडभरुन स्तुती केली.

संरक्षणमंत्री पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध :
  • सीमेपलीकडून सातत्याने निर्माण होत असलेल्या धोक्याचा विचार करून देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री द्यावा, यासाठी विरोधी पक्षांचा दबाव वाढत असला तरी अरुण जेटली यांना अतिरिक्त पदभारातून मुक्त करून नवीन संरक्षणमंत्री शोधणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठीण होत आहे.

  • मनोहर पर्रीकर यांना अचानक मुख्यमंत्री म्हणून गोव्यात पाठविण्यात आले, हेच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नियुक्त न करण्यामागचे कारण होय.

  • पंतप्रधान, भाजप अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, राजानाथसिंह, नितीन गडकरी आणि एम. व्यंकय्या नायडू यांचा समावेश असलेल्या भाजपच्या उच्चाधिकार गाभा समितीच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. 

  • रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांना संरक्षणमंत्री करून नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेचा अतिरिक्त पदभार द्यावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे; परंतु एकाकडील दुहेरी पदभार दुसऱ्या मंत्र्याकडे सोपविण्यातून मूळ हेतू साध्य होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.

पुतिन - ट्रम्प यांची दूरध्वनी चर्चा : सीरियातील चिघळलेला संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी त्यांचे अमेरिकी समपदस्थ डोनाल्ड ट्रम्प यांची दूरध्वनीवर चर्चा झाली असून, त्यात सीरियातील युद्ध संपवण्याच्या दिशेने आशादायक पावले पडू लागली आहेत.

  • अमेरिकेने सीरियातील हवाईतळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर रशियाने संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.

  • दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पहिल्यांदाच संभाषण झाले असून मध्य पूर्वेतील दहशतवाद नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची चर्चा झाली व उत्तर कोरियातील घातक परिस्थिती सुधारण्यावरही त्यांनी भर दिला.

  • अध्यक्ष ट्रम्प व अध्यक्ष पुतिन यांनी सीरियातील संघर्ष खूपच ताणला गेल्याचे मान्य केले व सर्व संबंधितांनी हिंसाचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे ठरवले. संभाषण चांगले झाले व त्यात सीरियातील सुरक्षिततेवर चर्चा झाली.

... आणि व्हॉट्सअॅप झाले बंद, जगभरात उडाला गोंधळ :
  • "व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, आज जगभरातील काही भागांमध्ये व्हॉटअॅप सुरू करण्यात अनेक जणांना अडचणी येत असून ही समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

  • अगदी साध्या चॅटिंगपासून ते तातडीने महत्त्वाचा मेसेज देण्यापर्यत व्हॉट्सअॅप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात व्हॉट्सअॅपविना मिनिटभर राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण आज रात्री अचानक व्हॉट्स अॅप बंद झाले.

  • संदेशवहनाचे महत्त्वाचे साधन बनलेले व्हॉटस अॅप  जगभरात गोंधळ उडाला. दरम्यान, पहाटे ४ वाजल्यानंतर हळुहळू व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाले.   

  • रात्री २ ते ३.३० च्या सुमारास  व्हॉट्स अॅपवर मेसेज येणे बंद झाले. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • कोळसा कामगार दिन

  • युवा दिन : चीन.

  • स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया.

जन्म, वाढदिवस

  • श्रीनृसिंह जयंती : ०४ मे 

  • महात्मा बसवेश्वर : ०४ मे ११३४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन 

  • टिपू सुलतान, म्हैसुरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी श्रीरंगपट्टणम येथे  इंग्रजांशी लढताना मारला गेला : ०४ मे १७९९

  • प्रा. अनंत काणेकर, मराठीतील विख्यात साहित्यिक : ०४ मे १९८०

ठळक घटना 

  • अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले : ०४ मे १९०४

  • ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले : ०४ मे १९३०

  • ‘बॉम्बे’ ऎवजी ‘मुंबई’ हेच मूळ नाव अधिकृत राहील, असा शिवसेना-भाजप युती यांच्या  राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : ०४ मे १९९५

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.