चालू घडामोडी - ०४ नोव्हेंबर २०१७

Date : 4 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
 उत्तर कोरियात बोगद्यामधील अणूचाचणीत 200 जणांचा बळी
  • याँगयांग (उ. कोरिया) : उत्तर कोरियात घेण्यात आलेल्या अणूचाचणीत अंदाजे 200 जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोगद्यामध्ये अणूचाचणी घेताना हा अपघात घडल्याची माहिती एका जपानी वृत्तवाहिनीने दिली आहे.

  • 3 सप्टेंबर रोजी उत्तर कोरियात सहावी आणि सर्वात मोठी भुयारी अणूचाचणी झाली होती. त्यानंतर काहीच दिवसात चाचणी झाली त्या ठिकाणापासून जवळ असलेल्या पुंगे-री या भागात बोगदा कोसळला होता.

  • यावेळी जवळपास 100 कामगारांनी प्राण गमावल्याचं आसाही टीव्हीने सांगितलं. बचावकार्य सुरु असताना पुन्हा दुर्घटना होऊन 200 जणांचा बळी गेल्याचा दावा, या चॅनेलने केला आहे. अणूचाचणी आणि बोगदा अपघात यांचा परस्पर संबंध असल्याचा दावा आसाही टीव्हीने केला आहे.(src:abp)

मराठी विद्यार्थ्यांना आर्थिक फटका, रहिवासी भागांत क्लासेसना बंदी, दिल्ली महापालिकेचा निर्णय
  • नवी दिल्ली : रहिवासी क्षेत्रात व्यवसाय करणा-या ३२ स्पर्धा परीक्षा क्लासेसना दिल्ली महापालिकेने टाळे ठोकल्याने येथील असंख्य मराठी विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

  • स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या मराठी विद्यार्थ्यांना या कारवाईमुळे क्लास व घरभाड्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मते ही रक्कम वर्षाला दुप्पट होईल.

  • नव्या जागेत क्लासेस सुरू होईपर्यंत या विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागेल. दिल्लीत दरवर्षी ४ ते ५ हजार मराठी मुले-मुली स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात.

  • क्लासेसचे शुल्क, घरभाडे यावर वर्षाला दोन लाख रुपये खर्च होतात. नव्या नियमानुसार व्यावसायिक जागेतच क्लास सुरू करता येईल. त्यासाठी जागेचे भाडे, पाणी, वीज व्यावसायिक दराने घ्यावे लागेल.(src:lokmat)

वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन
  • नवी दिल्ली : वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. अन्न प्रक्रिया उद्योगात नवनवीन संधी शोधली जात आहे.

  • महाराष्ट्रात या क्षेत्रात अग्रेसर असून याचे प्रतिबिंब या महाराष्ट्र दालनात उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फुंडकर यांनी सांगितले.

  • वर्ल्ड फूड इंडिया 2017चे आयोजन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने इंडिया गेट येथे करण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र दालन उभारण्यात आलेले आहे.

  • यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, कृषी, फलोत्पादन पणन मंत्री राज्यमंत्री सदाशिव खोत, कृषी विभागाचे सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त डॉ. सचेंद्रप्रताप सिंग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्रा यासह कृषी, पणन, विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध दालनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.(src:lokmat)

कोरियन द्विपकल्पात अमेरिकेच्या शक्तीशाली B-1B बॉम्बर विमानांचा जोरदार युद्ध सराव
  • सेऊल -  उत्तर कोरियाबरोबरचा तणाव वाढलेला असताना अमेरिकेच्या शक्तीशाली सुपरसॉनिक B-1B बॉम्बर विमानांनी दक्षिण कोरियाच्या आकाशात उड्डाण केले.

  • यावेळी जपान आणि दक्षिण कोरियाची फायटर विमानेही युद्ध सरावात सहभागी झाली होती. अमेरिकेच्या गुआममधल्या अँडरसन एअर फोर्स तळावरुन गुरुवारी दोन B-1B बॉम्बर विमानांनी आकाशात झेप घेतली.

  • या दोन्ही फायटर विमानांनी दक्षिण कोरिया आणि पश्चिम जपानच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्या देशांची फायटर विमाने सरावामध्ये सहभागी झाली असे अमेरिकेच्या पॅसिफिक एअर फोर्सने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (src:lokmat)

मुदतीनंतरही बाद नोटा जवळ बाळगलेल्यांवर कारवाई होणार नाही
  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या लोकांनी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या नाहीत. त्यांनी नोटाबंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

  • त्यांच्याविरोधात केंद्र सरकार फौजदारी कारवाई करणार नाही, असे सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

  • केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, १००० आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांविरोधात कारवाई होणार नाही.

  • मात्र, याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकांमध्ये जेवढ्या रकमेचा उल्लेख केला आहे. तेवढ्या रकमेसाठीच त्यांच्यावर कारवाई होणार नाही. अधिकच्या रकमेसाठी कारवाई होऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.(src:loksatta)

दिनविशेष 

महत्वाच्या घटना 

१८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.

१९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.

१९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.

१९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.

१९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

१९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

२०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.

२००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

जन्म :

१६१८: मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०७)

१८४५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)

१८७१: मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.

१८८४: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)

१८८४: ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९६०)

१९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर२०१५)

१९३४: दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.

१९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.

१९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

१९७१: अभिनेत्री तब्बू यांचा जन्म.

मृत्यू :

१९७०: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.

१९९१: प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन. (जन्म: १२ जून १८९४)

१९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)

१९९५: इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९२२)

१९९८: हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.

२०११: नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.