चालू घडामोडी - ०४ सप्टेंबर २०१७

Date : 4 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
 एम. एस धोनीनं केला वर्ल्ड रेकॉर्ड असा करणारा एकमेव खेळाडू :
  • माजी कर्णधार एम. एस धोनीनं आज एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली असून असा विक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० फलंदाजांना यष्टिचीत करण्याचा विक्रम धोनीनं आपल्या नावावर केला आहे.

  • संगाकाराचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला एका फलंदाजांना यष्टिचीत करायचे होते, श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पाचव्या सामन्यात धोनीनं श्रीलंकेच्या धनंजयाची विकेट घेत १०० यष्टिचीत पूर्ण केल्या.

  • धोनीने भारतीय संघाकडून खेळताना ९७ तर आशिया इलेव्हनकडून खेळताना तीन फलंदाजांना यष्टिचीत केले असून यष्टीमागे सर्वाधिक बळी टिपणाऱ्या यष्टिरक्षकांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानी आहे.

  • ३०१ एकदिवसीय सामना खेळत असलेल्या धोनीच्या खात्यात ३८१ बळींची नोंद असून कुमार संगकाराने ४०४ सामन्यांत सर्वाधिक ४८२ जणांना शिकार बनवले असून त्यात ३८३ झेल आणि ९९ यष्टिचीत आहेत.

  • त्यानंतर २७८ सामन्यांत ४७२ बळी टिपणारा ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक मार्क बाउचर तिसऱ्या स्थानी असून त्याने २९५ सामन्यांत ४२४ जणांना यष्टिमागे बाद केले आहे.

उद्योजिका शिल्पा अग्रवाल 'मिसेस युनिव्हर्स लव्हली २०१७' च्या मानकरी :
  • दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या. जगभरातून आलेल्या 184 महिला स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी हा किताब पटकाविला.

  • 'महिला सक्षमीकरणातून परिवर्तनाचा उदय' अशी या स्पर्धेची थीम होती. स्पर्धेत २१ ते ४५ वर्षे वयोगटातील १८४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या एकमात्र नागपूरकर आहेत.

  • अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या स्पर्धेत शिल्पा अग्रवाल यांनी विविध फेऱ्यांमध्ये स्वत:च्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला असून तसेच त्या 'मिसेस युनिव्हर्स लव्हली' किताब पटकाविणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या महिला आहेत.

मोदींच्या एण्ट्रीलाच चीनमध्ये 'भारत माता की जय'च्या घोषणा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनमध्ये दाखल झाले असून चीनमधील शियामेन शहरात मोदींचं जंगी स्वागत झालं आहे काल रात्री त्यांनी तिथल्या भारतीयांशी संवादही साधला.

  • महत्त्वाचं म्हणजे मोदी येताच चीनमध्येही ‘भारत माता की जय’च्या घोषणा ऐकायला मिळाल्या.

  • चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज मोदींचं शियामेन शहरात स्वागत केलं इथेच ब्रिक्स परिषद होते आहे ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान मोदी चीनमध्ये असतील.

  • डोकलाममधल्या सीमेवरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाल्यानं दोन्ही देशांसाठी ही परिषद अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

  • दहशतवादाच्या मुद्यावरून भारतानं पाकिस्तानला लक्ष्य करू नये असा इशारा चीनच्या शी जीनपिंग यांनी भारताला ब्रिक्स परिषदेपूर्वी दिला असून दहशतवाद जन्माला घालणाऱ्या पाकिस्तानला भारत खडेबोल सुनावणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजतंय.

इंदिरा गांधी यांच्यानंतर निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री :
  • निर्मला सीतारामन यांची भारताच्या संरक्षणमंत्रीपदी निवड झाल्याने त्यांचा आता जगभरातील महिला संरक्षणमंत्र्यांच्या छोट्या गटामध्ये समावेश झाला आहे मात्र, त्याचबरोबर देशातील पुरुष संरक्षणमंत्र्यांचा क्लबही त्यांनी मोडून काढला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष असते. त्यामुळेच त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांकडे नवी आणि महत्वाची खाती सोपवली आहेत. असे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर प्रतिक्रिया देताना अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

  • केंद्रीय मंत्रिमंडळाचा ३ सप्टेंबर रोजी विस्तार झाला. यामध्ये खासदार निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली असून यामुळे देशाला आता पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे.

  • ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ मध्ये पहिल्यांदाच संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी एका महिलेकडे सोपण्यात आली आहे. इतरही काही देशांच्या संरक्षणमंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी महिलांवर असून भारताबरोबर सध्या जर्मनी, नॉर्वे आणि नेदरलँड या देशांच्या संरक्षणमंत्रीपदी महिला कार्यरत आहेत.

सत्यपाल सिंह राज्यमंत्री सरकारी थकबाकीदार :
  • आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करत सत्यपाल सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.

  • लोकसभा निवडणूक लढविताना सरकारी थकबाकीची माहिती लपविणारे भाजपचे खासदार आणि माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांस मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनविले आहे.

  • केंद्र सरकारने कोणताही निर्णय न घेता सत्यपाल सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने सिंह यांच्या विरोधात पुन्हा तक्रार करणार असल्याचे गलगली यांनी कळवले आहे.

  • पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देत सत्यपाल सिंह यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेश येथील बागपत मतदारसंघातून लढविली होती.

  • निवडणूक आयोगाने २७ मार्च २००३ रोजीच्या हॅंण्ड बुकमध्ये उमेदवारासाठी ज्या पाच बाबी जाहीर करण्याचे आदेशित केले होते, त्यात दाखल गुन्हे, प्रलंबित गुन्हे, मालमत्ता, थकबाकी दायित्व आणि शैक्षणिक पात्रता याचा समावेश आहे. यातील नियम क्रमांक ३ मधील ४ मध्ये सरकारी वित्तीय संस्था आणि सरकारी थकबाकी या दायित्वाचा तपशील आहे.

  • तसेच याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दोन मे २००२ रोजी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या जनहित याचिकेवर आदेश जारी केले होते.

विदर्भातील सर्वात उंच तिरंग्याच्या प्रस्तावाला नगरपरिषदेची मंजुरी :
  • लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून हा राष्ट्रध्वज लावला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी खासदार निधीतून ५२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

  • शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (२०६ फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

  • प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाली असून सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी हा विषय पटलावर आणला. त्याला सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवून ठराव मंजूर केला.

  • देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपरिषदेने स्वीकारली आहे, त्यात पालिका होमगार्ड, एनसीसी बटालियनची मदत घेऊ शकते.

दिनविशेष :

जन्म /वाढदिवस

  • भारताचे पितामह दादाभाई नौरोजी जन्मदिन : ०४ सप्टेंबर १८२५

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • सुश्मिता बॅनर्जी, भारतीय लेखिका : ०४ सप्टेंबर २०१३

  • हिंदी लेखक, पत्रकार धर्मवीर भारती : ०४ सप्टेंबर १९९७

ठळक घटना

  • मोघल आणि छत्रपती शिवराय यांच्या मध्ये पुरंदराचा तह : ०४ सप्टेंबर १६६५

  • चवथ्या महिला आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ : ०४ सप्टेंबर १९९५

  • लॉर्ड बेडेल पॉवेल यांनी सुरु केलेल्या बालवीर चळवळीचा पहिला मेळावा भरविला गेला : ०४ सप्टेंबर १९०९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.