चालू घडामोडी - ०४ सप्टेंबर २०१८

Updated On : Sep 04, 2018 | Category : Current Affairs‘दलित’ शब्द वापरू नका, केंद्र सरकारची सूचना :
 • ‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये अशी सूचना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ही सूचना देण्यात आली आहे.

 • दलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा शब्दप्रयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचं पत्र सात ऑगस्ट रोजी सर्व खासगी वाहिन्यांना पाठवण्यात आलं आहे. पंकज मेश्राम यांच्या याचिकेवर जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला होता. दलित शब्दाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला जावा आणि याबाबतचे निर्देश सर्व वाहिन्यांना देण्याबाबत विचार केला जावा असं खंडपीठाने म्हटलं होतं. त्यानुसार सात ऑगस्ट रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना ‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये अशा आशयाचं पत्र पाठवलं.

 • मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही 15 जानेवारी रोजी एका निकालात अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या व्यक्तींसाठी दलित शब्द वापरता येणार नसल्याचे म्हटले होते.

पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणा- पी चिदंबरम :
 • पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे अशी मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत, ते नियंत्रणात आणण्यासाठी जीएसटीच्या कक्षेत आणावेत असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. यासंदर्भातले ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

 • पेट्रोल आणि डिझेल यांचे दर त्यावर असलेल्या करांमुळे वाढत आहेत. आत्ता असणारे कर कमी करून त्यावर जर जीएसटी लावण्यात आला तर दर नक्कीच कमी होतील आणि सामान्य जनतेला दिलासा मिळेल. त्यामुळे काँग्रेसची ही आग्रही मागणी आहे की केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल हे तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणावे.

 • पेट्रोल किंवा डिझेल यांचे दर का वाढले? असा प्रश्न विचारण्यात आला की केंद्र सरकार राज्यांकडे बोट दाखवते मात्र त्याला काहीही अर्थ नाही. देशात १९ राज्यांमध्ये भाजपाचेच सरकार आहे मग त्या राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का भडकल्या आहेत असाही प्रश्न पी चिदंबरम यांनी उपस्थित केला. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून त्यावर पर्याय काढला पाहिजे असेही त्यांनी सुचवले आहे.

 • डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत घसरली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमती वाढल्याने महागाई वाढणार हे उघड आहे. त्याचमुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानी कायम :
 • मुंबई : टीम इंडियाला साऊदम्प्टन कसोटीत इंग्लंडकडून हार स्वीकारावी लागली, मात्र कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या अव्वल कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट यावेळीही पहिल्या क्रमांकावर आहे.

 • विराटने साऊदम्प्टन कसोटीत 46 आणि 58 धावांच्या खेळी केल्या. या कामगिरीनंतर त्याच्या खात्यात आता 937 रेटिंग गुण झाले आहेत. कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत विराटची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. विराटने इंग्लंड दौऱ्यातल्या आठ कसोटी डावांमध्ये 544 धावांचा रतीब घातला.

 • भारताचा चेतेश्वर पुजारा आयसीसीच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर दाखल झाला आहे. मोहम्मद शमीनेही 19 वं स्थान मिळवलं आहे. जसप्रीत बुमराहने 37 वं स्थान राखलं आहे.

फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमान भारतात :
 • नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानाच्या राजकीय वादानंतर फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमाने भारतीय वायूसेनेच्या ग्वाल्हेरमधील एअरबेसवर दाखल झाली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या ‘पिच ब्लॅक’ युद्ध सरावातील ही विमानं आहेत, ज्यात भारतीय वायूसेनेनेही सहभाग घेतला होता.

 • मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या तीन लढाऊ विमानांसह एक अॅटलास-400 एम मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एक सी-135 रिफ्यूलर विमान आणि एक एअरबस कार्गो विमानाने ऑस्ट्रेलियाहून ग्वाल्हेरच्या हवाई दलाच्या तळावर दाखल झाली.

 • यावेळी दोन्ही देशाची हवाई सेना एकत्र उड्डाण घेणार असल्याचीही शक्यता आहे. ग्वाल्हेर एअरबेसवर भारताच्या मिराज-2000 एच लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात आहे.

 •  

 • ऑस्ट्रेलियात झालेल्या पिच ब्लॅक युद्ध सरावात भारतीय वायूसेनेच्या वैमानिकांनी राफेल लढाऊ विमानातून उड्डाण घेतलं होतं, ज्याचे फोटो ऑस्ट्रेलियाच्या वायूसेनेने जारी केले होते. फ्रान्सचा हा ताफा पिच ब्लॅक युद्ध सरावासोबतच आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील पिगेस नावाच्या युद्ध सरावात सहभाग घेणार आहे.

नेट, जेईईच्या परीक्षा फीमध्ये केली २0 ते ५0 टक्के कपात; ८ सप्टेंबरला होणार कॉम्प्यूटरबेस्ड मोफत टेस्ट :
 • नवी दिल्ली : मेडिकल, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्थापन करण्यात आलेल्या टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नेट, जेईई परीक्षा देणाऱ्यांसाठी दुहेरी भेट दिली आहे. ही परीक्षा पूर्वीच्या तुलनेत तीनपट अधिक शहरात आयोजित करण्यात आली आहे.

 • तर, फीमध्ये २० ते ५० टक्के कपात करण्यात आली आहे. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ही परीक्षा कॉम्युटरवर होणार आहे. त्यामुळे कागदाचा उपयोग शून्यावर आला आहे. याचा लाभ परीक्षार्थींना दिला जाणार आहे. पूर्वी यूजीसी नेट परीक्षा ९१ शहरांत होत होती. आता ही परीक्षा २७३ शहरात होणार आहे.

 • एनटीएचे महासंचालक जोशी यांनी सांगितले की, या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन मोफत टेस्ट सीरिजचे आयोजन ८ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. यासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे टेस्ट घेण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्युटर बेस्ड परीक्षेचा अनुभवही येईल. याशिवाय ७ सप्टेंबर रोजी एनटीएच्या वेबसाईटवर आॅनलाइन टेस्ट सीरिज अपलोड करण्यात येईल. विद्यार्थी घरी बसूनही कॉम्युटरवरील परिक्षेचा अभ्यास करु शकतील. यूजीसी नेट परीक्षेची फी सामान्य श्रेणीसाठी १००० रुपयांवरुन कमी करुन ८०० रुपये करण्यात आली आहे.

 • नॉन क्रिमिलेअर, ओबीसीसाठी ४०० रुपये, एससी, एसटी, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी २०० रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, जेईई मुख्य परीक्षा जवळपास ८० टक्के परीक्षार्थी पेन पेपरने देत होते. याचे परीक्षा शुल्क १००० रुपये होते. कॉम्युटर बेस्ड परीक्षेचे शुल्क सामान्य आणि ओबीसी श्रेणीच्या विद्यार्थ्यांसाठी एका पेपरसाठी ५०० आणि दोन पेपरसाठी ९०० निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थीनींसाठी एका पेपरचे शुल्क २५० आणि दोन्ही पेपरचे शुल्क ४५० ठेवण्यात आले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

 • १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

 • १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

 • १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.

 • १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.

 • १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

 • १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.

 • २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

 • २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.

जन्म

 • १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती याचं निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

 • २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री याचं निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२२)

 • २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)

 • २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५२)

 • २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९२७)

मृत्यू

 • १८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)

 • १९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५)

 • १९०५: मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २००३)

 • १९१३: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)

 • १९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००३)

 • १९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म.

 • १९४१: केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.

 • १९५२: अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म.

 • १९६२: यष्टीरक्षक किरण मोरे यांचा जन्म.

 • १९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०१५)

 • १९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर यांचा जन्म.

टिप्पणी करा (Comment Below)