चालू घडामोडी - ०५ ऑगस्ट २०१७

Date : 5 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘ग्रो इन इंडिया’ मोहीम राबविणे :
  • ‘ग्रो इन इंडिया’साठी सेंटेग्रोचे केंद्राला आवाहन सेंटर फॉर इन्व्हायर्नमेंट अँड अ‍ॅग्रीकल्चर (सेंटेग्रो) या स्वयंसेवी संस्थेने आपल्या अहवालातून केंद्र सरकारला केले.

  • ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘ग्रो इन इंडिया’ मोहीम राबविणे आवश्यक आहे, असे आवाहन सेंटर फॉर इन्व्हायर्नमेंट अँड अ‍ॅग्रीकल्चर (सेंटेग्रो) या स्वयंसेवी संस्थेने आपल्या अहवालातून केंद्र सरकारला केले, तसेच कृषी उत्पन्न आयात-निर्यातीवर देखरेख ठेवण्यास स्वतंत्र प्राधिकरण असावे.

  • या संस्थेने भारतातील शेती व शेतकरी यांच्या स्थितीचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला असून, त्याचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

  • सेंटेग्रो व क्रॉप केअर फडरेशन इंडियाचे अध्यक्ष राजू श्रॉफ यांनी शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यासाठी मुळात देशाबाहेरील व देशांतर्गत कृषी मालाची मागणी वाढवणे गरजेचे आहे.

देशाचा नवा उपराष्ट्रपती आज निवडला जाणार : नायडूंचा विजय जवळपास निश्चित
  • एनडीएकडून व्यंकय्या नायडू तर यूपीएकडून महात्मा गांधींचे नातू गोपाळकृष्ण गांधी अशी ही लढत आहे.

  • संसदेच्या प्रांगणात आज दोन्ही सदनातले खासदार मतदान करतील, सकाळी १० ते ५ अशी मतदानाची वेळ असून मतमोजणी लगेचच संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल, त्यामुळे आजच निकालाचं चित्रही स्पष्ट होईल.

  • दोन्ही सभागृहातले मिळून ७९० खासदार आहेत, मात्र सध्या लोकसभेच्या दोन तर राज्यसभेची एक जागा रिक्त आहे, शिवाय भाजपचे लोकसभा खासदार छेदी पासवान यांना एका न्यायालयाच्या निकालामुळे मतदान करता येणार नाही.

  • लोकसभेच्या ५४५ जागांपैकी भाजपकडे २८१ तर एनडीएकडे ३३८ इतकं संख्याबळ आहे, राज्यसभेतही भाजप ५८ जागांसह सगळ्यात मोठा पक्ष बनलाय असून एनडीएत नसलेले तेलंगणा राष्ट्र समिती, एआयडीएमके, वायएसआर काँग्रेस हे तीन पक्ष राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत एनडीएलाच मतदान करणार आहेत.

अमेरिकी थिंक टँक सुरू केलं भाजपाचं सुवर्ण युग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
  • २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्यासाठी प्रयत्नशील असून भारतातील शक्तिशाली राज्यांत स्वतःची पकड मजबूत करण्याच्या दिशेनं जबरदस्त गतीनं पुढे जातोय.

  • भारतीय वंशाच्या अमेरिकी थिंक टँकनं भाजपाच्या कामाचं कौतुक केलंय, बिहारच्या राजकारणात भाजपानं ज्या प्रकारे पुन्हा सत्ता मिळवून त्यावर स्वतःची मजबूत पकड मिळवली. 

  • कार्नेगी एंडॉन्मेंट फॉर इंटरनॅशनल पीसमधले दक्षिण आशियाच्या कार्यक्रमाचे संचालक मिलन वैष्णव यांनी एका संपादकीयमधून मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

  • नेहरू-गांधी कुटुंबीयांनी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलेल्या देशात आता भाजपा राजकारणाचा नवा केंद्रबिंदू झाला आहे, भाजपा सरकार दिवसेंदिवस स्थिरता आणि मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. वैष्णव यांच्या मते, भाजपाची व्यापार अनुकूल नीती, राष्ट्रवादी भाषणबाजी आणि युवापिढीला केलेलं अपील या माध्यमातून मोदींनी अनेक राज्यांत सत्ता मिळवली आहे.

  • तीन दशकांत बहुमत सिद्ध करणारा पहिला पक्ष बनलेल्या भाजपाचा मोदींनी सुवर्ण काळाचा प्रारंभ केला आहे. बिहारमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर राज्यसभेत भाजपा लवकरच बहुमत सिद्ध करणार आहे, हे काम २०१८ पर्यंत पूर्ण होणार असून भाजपा दिवसेंदिवस प्रगतिपथावर जात आहे. 

अभिनेता अक्षय कुमार उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत :
  • अभिनेता अक्षय कुमारची 'टॉयलेट एक प्रेम कहाणी' या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनापूर्वीच सुरू झाली आहे, हा चित्रपटाची कथा स्वच्छतेवर विशेषतः घरात शौचालय असण्यावर आधारित आहे.

  • उघड्यावर शौचाला जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत, यासाठी त्यांनी अक्षय कुमारची 'ब्रॅंड ऍबेसिडर' म्हणून नियुक्ती केली आहे.

  • लखनौ येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीच याबाबत घोषणा केली. यावेळी 'टॉयलेट'ची नायिका भूमी पेडणेकरही त्यांच्यासोबत होती.

  • लखनौमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यासह योगी आदित्यनाथ तो पाहणार असल्याचेही सांगण्यात आले.

तीन भारतीय-अमेरिकींची डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात नियुक्ती : सिनेटन
  • अमेरिकन सरकारच्या तीन महत्वाच्या जागांवर तीन भारतीय-अमेरिकनांना नियुक्त करण्याचा सिनेटने एकमुखाने निर्णय घेतला, यातील एक नियुक्ती ही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील बौद्धीक संपदेवर आहे.

  • ट्रम्प प्रशासनात नील चॅटर्जी हे फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमीशनचे सदस्य बनले असून विशाल अमीन हे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एन्फोरसमेंट कोआॅर्डिनेटर झाले आहेत.

  • १९८६ पासून विदेश सेवेत अधिकारी असून निक्की हॅलेनंतर ते राजदूतपदाची संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत, हॅले या साऊथ कॅरोलिनामध्ये दोन वेळा गव्हर्नर होत्या व सध्या त्या संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेच्या राजदूत आहेत.

  • अमेरिका आणि भारत यांच्यात बौद्धीक संपदेवरून तीव्र स्वरुपाचे मतभेद असून कृष्णा अर्स यांना पेरुच्या राजदुताची जबाबदारी दिली गेली आहे. 

'मिशन वन मिलियन' मोहिमेची सुरुवात :
  • फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त 'महाराष्ट्र मिशन वन मिलियन' फुटबॉल क्रांती निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत तावडे यांनी माहिती दिली.

  • ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारत सज्ज असून, या स्पर्धेनिमित्त ८ सप्टेंबरला महाराष्ट्रात सुमारे १० लाख शालेय विद्यार्थी फुटबॉल खेळतील.

  • या वेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) उपाध्यक्ष विश्वजीत कदम, विफाचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे भोसले यांचीही उपस्थिती होती.

  • 'मोहीम 'महाराष्ट्र मिशन वन मिलियन' अंतर्गत राज्यातील ३० हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे १ लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहे, तसेच शालेय-महाविद्यालयीन स्तरीय, विद्यापीठस्तरीय विशेष फुटबॉल स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

भारतातील तब्बल ४०० भाषा नष्ट होण्याची भीती : इंग्रजीचा धोका मात्र नाही
  • भारतातील ७८० भाषांपैकी ४०० येत्या ५० वर्षांत नामशेष होण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ भाषाअभ्यासक गणेश एन. देवी यांनी म्हटले.

  • इंग्रजी भाषेमुळे भारतातील हिंदी, मराठी, बांगला आणि तेलगू या मुख्य भाषांना धोका नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले असून पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे आॅफ इंडियाच्या (पीएसएआय) ११ खंडांच्या गुरुवारी येथे झालेल्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

  • जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा येत्या ५० वर्षांत नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत, या चार हजार भाषांपैकी ४०० भारतातील आहेत. 

  • इंग्रजीचे प्रभुत्व हिंदी, बांगला, मराठी, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती व पंजाबी या मोठ्या भाषांना नष्ट करून टाकेल, हा समज निराधार आहे, कारण जगातील पहिल्या तीस भाषांमध्ये त्या आहेत, भारतातील ७८० भाषांपैकी ४०० येत्या ५० वर्षांत नामशेष होण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ भाषाअभ्यासक गणेश एन. देवी यांनी म्हटले.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : बर्किना फासो.

  • बाल दिन : चिली.

जन्म, वाढदिवस

  • दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक : ०५ ऑगस्ट १८९०

  • एडवर्ड जॉन आयर, इंग्लिश शोधक : ०५ ऑगस्ट १८१५

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • मॉरिस टर्नबुल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू : ०५ ऑगस्ट १९४४

ठळक घटना

  • मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला : ०५ ऑगस्ट २००६

  • जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला : ०५ ऑगस्ट १९१४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.