चालू घडामोडी - ०५ जुलै २०१७

Date : 5 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमरावतीच्या तरुणीला आयर्लंडमध्ये कल्पना चावला स्कॉलरशिप : सोनल बाबरवाल
  • सोनल बाबरवाल या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी)ची पहिली कल्पना चावला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. आयर्लंडमधील कॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ही घोषणा केली.

  • भारताची पहिली महिला अंतराळवीर डॉ. कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ ही स्कॉलरशिप प्रदान केली गेली असून फेब्रुवारी २००३ मध्ये कोलंबिया अंतराळयानाच्या अपघातात कल्पना चावला यांचा मृत्यू झाला होता.

  • बुद्धिमान भारतीय महिलांमधील तांत्रिक आणि अंतराळ विषयक संशोधन कौशल्य विकसित करणं हे यामागील उद्दिष्ट आहे.

  • अमरावतीच्या २१ वर्षीय तरुणीने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

  • विज्ञान, वैद्यकीय किंवा खगोलशास्त्राशी संबंधित क्षेत्रांतील भारतीय पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग करण्याचा कॉर्क इन्स्टिट्युटचा मानस आहे.

इंदिरा गांधी विद्यापीठात तृतीयपंथींना मोफत शिक्षण :
  • विद्यापीठात शिकविल्या जाणाऱ्या सुमारे २०० अभ्यासक्रमांचे शुल्क तृतीयपंथीसाठी पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) या देशातील सर्वांत मोठ्या मुक्त विद्यापीठाने तृतीयपंथींच्या मोफत शिक्षणासाठी मान्यता दिली आहे.

  • तसेच या प्रवेशांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नसले तरी प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांना तृतीयपंथी अशी ओळख सिद्ध करण्यासाठी तशी नोंद असलेले आधार कार्ड किंवा कोणत्याही सरकारी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र मात्र सादर करावे लागेल.

  • या सवलतीचा तृतीयपंथींखेरीज अन्य कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी ओळखपत्राची ही अट घालण्यात आली असून विद्यार्थी नोंदणी विभागाच्या निबंधकांनी यासंबंधीची अधिसूचना २९ जून रोजी जारी केली.

गो रक्षा हा गो सेवेचा भागच, विश्व हिंदू परिषदेचा मोदींवर पलटवार :
  • गोरक्षेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) समोरासमोर उभे ठाकले आहेत. गायीचे रक्षण करणे हा गोसेवेचा महत्वाचा भाग असून त्याचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्हीएचपीने स्पष्ट केले आहे.

  • साबरमती आश्रमात मोदींनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत व्हीएचपीने आपले मांडले आहे. व्हीएचपीकडून सरचिटणीस सुरेंद्र जैन म्हणाले, गो पालन, गो संरक्षण, गो संवर्धन आणि गो रक्षण हे सर्व गो सेवेचा हिस्सा आहे.

  • मागील आठवड्यात मोदी यांनी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात गो रक्षेच्या नावावर होत असलेल्या हिंसेचा आपल्या भाषणात उल्लेख केला होता.

  • या घटनांचा उल्लेख करत त्यांनी लोकांना इशारा दिला होता. गो भक्तीच्या नावावर लोकांची हत्या स्वीकारली जाणार नाही. आज जर महात्मा गांधी असते, तर ते याच्या विरोधात असते, असे त्यांनी म्हटले होते.

भारतीय मुलींचा युवा रग्बी संघ सज्ज :
  • पॅरिस येथे ०७ जुलैपासून सुरु होत असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या रग्बी संघाची घोषणा करण्यात आली.

  • ओडिशाच्या सुमित्रा नायक हिच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून या संघात गार्गी वालेकर ही एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू आहे.

  • आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत दुसऱ्यांदा भारताचा हा युवा संघ सहभागी होत आहे. याआधी यूएईमध्ये झालेल्या पहिल्या १८ वर्षांखालील रग्बी सेवेंस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या या युवा संघाने कांस्य पदकाला गवसणी घातली होती.

  • जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज असलेल्या भारताच्या युवा रग्बी संघात ओडिशा व पश्चिम बंगालचे वर्चस्व असून त्यांचे प्रत्येकी ५ खेळाडू संघात आहेत.

ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आर्यानला सुवर्णपदक :
  • भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात जलतरण तलाव सुरू असलेल्या या स्पर्धेत ४०० मी फ्रीस्टाइल प्रकारात मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्राच्या रेना सलढाणाने ४.४५२ सेकंद वेळ नोंदवीत सुवर्णपदक संपादन केले तर तमिळनाडूच्या अभिशिक्ता पी.एम. व दिल्लीच्या प्राची टोकस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.

  • महाराष्ट्राचा आर्यन भोसले, कर्नाटकच्या श्रीहरी नटराज व पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडल यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत नवीन विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक पटकावित ४४ व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा गाजविली.

  • तसेच दुसरीकडे महाराष्ट्राच्या रेना सलढाणा, त्रिशा कारखानीस, आर्यन भोसले, केनिशा गुप्ता, नील रॉय यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.

अमेरिकेतल्या ५३ विमानतळांवर भारतीयांना आता तपासणीशिवाय प्रवेश :
  • मोदी यांच्या अमेरिका भेटीत एच १ बी व्हिसावर काही तरी तोडगा निघेल अशी आशा होती.

  • मात्र या भेटीतून भारतीयांच्या हाती म्हणावं तितकं काही लागलं नाही, तरीही भारतीयांचा अमेरिकेतील प्रवेश आधीच्या तुलनेत सोपा होण्याची चिन्हे आहेत.

  • अमेरिकेत भारतीय लोकांना जागतिक प्रवेश कार्यक्रमांतर्गत प्रवेश दिला जाणार असून, अमेरिकेत कमी धोकादायक प्रवाशांच्या यादीत त्यांना स्थान मिळणार आहे.

  • अमेरिकेतल्या ५३ विमानतळांवर भारतीयांना प्रवेश मिळणार असून या ५३ विमानतळांवर भारतीयांची कस्टमच्या चौकशीतून सुटका होणार आहे. मात्र भारतीय प्रवाशांना हातांचे ठसे, पासपोर्ट आणि अन्य काही कागदपत्रं द्यावी लागणार आहेत. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.

जन्म, वाढदिवस

  • राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री : ०५ जुलै १९४६

  • आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये : ०५ जुलै १९१६

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४ वा पंतप्रधान : ०५ जुलै १९४५

ठळक घटना

  • आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाला मान्यता : ०५ जुलै १९५४

  • सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले : ०५ जुलै १६८७

  • जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले : ०५ जुलै १९९८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.