चालू घडामोडी - ०५ मार्च २०१९

Date : 5 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुंबई विद्यापीठाचा ११ लाख पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी ऑनलाईन उपलब्ध :
  • मुंबई : मुंबई विद्यापीठाने 'नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी' (नॅड) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलवर गेल्या सहा वर्षांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशिल ऑनलाइन उपलब्ध करुन दिला आहे. नॅडच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर ही सेवा उपलब्ध होणार आहे.

  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशील याद्वारे तात्काळ उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी होणार आहे. तसंच बोगस प्रमाणपत्र प्रकरणांना आळा बसणार आहे.

  • या सेवेसाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अनुदान आयोग यांनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) या संस्थेची नियुक्ती केली.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठात नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यासाठी एनएसडीएलसोबत मुंबई विद्यापीठाने करार केला आहे. यानुसार विद्यापीठाने 2013 पासून 2019 पर्यंत सहा वर्षातील 11 लाख विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती 'नॅड'च्या ऑनलाईन पोर्टलवर आहे

  • या सुविधेचा उपयोग करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नॅडच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेत स्थळावर मुख्य पृष्ठावर स्क्रोलिंग मधले नॅड रजिस्ट्रेशन या सदराखाली एक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

एअर इंडियाच्या विमानातही घुमणार आता ‘जयहिंद’चा नारा :
  • एअर इंडियाच्या विमानातही आता जयहिंदचा नारा दिला जाणार आहे. कारण, तसा आदेशच कंपनीने काढला असून विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

  • एअर इंडियाच्या नव्या नियमावलीनुसार, प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना विमानातील प्रत्येक जाहीर निवेदनानंतर थोडसं थांबून उत्साहात जयहिंदचा नारा देणं बंधनकारक असणार आहे. सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियामध्ये सध्या ३५०० कॅबिन क्रू आणि १२०० कॉकपिट क्रू मेंबर्स आहेत. या सर्वांसाठी याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

  • अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यापूर्वी एअर इंडियात मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी असताना लोहानी यांनी २०१६ मध्येही असाच आदेश काढला होता.

एशियाड २०२२ मध्ये क्रिकेटचा पुन्हा समावेश, टी20 सामने रंगणार :
  • नवी दिल्ली : चीनच्या हांगझूमध्ये 2022 साली होणाऱ्या एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या बैठकीत 2022 सालच्या एशियाड खेळांच्या यादीत क्रिकेटला स्थान देण्यात आलं आहे. 2010 सालच्या ग्वांगझू आणि 2014 च्या इंचिऑन एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण गेल्या वर्षी (2018) जकार्ता एशियाडमधून क्रिकेटला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे 2014 नंतर पुन्हा एकदा एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे.

  • T20 फॉरमॅट क्रिकेटचा (महिला-पुरुष) 2022 च्या एशियाडमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता भारतीय ऑलिम्पिक संघ याबाबत बीसीसीआयला पत्र लिहिणार आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघ या खेळांमध्ये सहभाग घेणार की नाही, याबाबत बीसीसीआयकडून स्पष्टीकरण अजून आलेलं नाही. याआधी संघाच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत भारत एशियाडमधून बाहेर राहिला होता. 2010 आणि 2014 च्या एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता, पण त्यावेळी बीसीसीआयने बिझी शेड्यूल असल्याचं सांगत संघांना पाठवलं नव्हतं.

  • एशियाड खेळांच्या आयोजनासाठी आणखी बराच वेळ आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या प्रतिनिधित्वाबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयला बराच वेळ मिळेल. भारत वगळता श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या नियमित क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी एशियाडमध्ये सहभाग नोंदवला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानने 2014 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्ण पदक जिंकलं होतं, तर 2010 मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानने बाजी मारली होती.

९ मार्चला होईल निवडणुकांची घोषणा, ८ मार्चपूर्वीच उद्घाटनं करून घ्या :
  • नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच 8 मार्चपर्यंत सर्वच विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाची कामे पूर्ण करा, असे आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे समजते. 

  • आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ 8 मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही 8 मार्चच्या आधी करून टाकावीत, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व मंत्रालयांना दिले आहेत. कारण, लोकसभा निवडणुकांची घोषणा 9 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. स्वत: पंतप्रधान मोदी 8 मार्चपर्यंत देशातील विविध केंद्रीय प्रकल्पांची उद्घाटने व पायाभरणी समारंभ करण्यात गुंतलेले असतील. त्या निमित्ताने ते सरकारी व्यासपीठावरून विरोधकांवर राजकीय टीकाही करीत आहेत. आचारसंहितेनंतर मोदींना सरकारी व्यासपीठाचा अशा कारणासाठी वापर करता येणार नाही.

  • रस्ते वाहतूक, रेल्वे, कोळसा, ऊर्जा, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान, पेट्रोलियम, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलाद, खाण उद्योग, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, आरोग्य, तसेच संरक्षण विभागाशी संबंधित प्रकल्पांवर मोदी सरकारने भर दिला होता. त्याचा फायदा निवडणुकांत मिळावा, यासाठीच हे आदेश देण्यात आले आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल, आर. के. सिंह यांचे प्रकल्प प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित असल्याने त्यांवर भर देण्यात आला आहे.

  • आयोगाने निवडणुकांची घोषणा केली की, आचारसंहिता लगेच लागू होईल आणि मग प्रकल्पांची उद्घाटने वा पायाभरणी समारंभ करता येणार नाहीत. नव्या योजनांचीही घोषणा करता येणार नाही. त्यामुळे नव्या योजनांची घोषणाही लगेच करून टाका, असेही मंत्रालयांना सांगण्यात आले आहे. तर शेतकरी सन्मान योजनेतील दुसऱ्या हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताच ही घोषणा होऊ शकते. 

  • दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना नेते आणि कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागा, असे म्हटले होते. तसेच आगामी 4 ते 5 दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होईल, असेही पवार म्हणाले होते. त्यामुळे याच आठवड्यात निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. तर, राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. 

मंगळावर प्राचीन काळी पाणी असल्याचे भूगर्भशास्त्रीय पुरावे :
  • मंगळाच्या पृष्ठभागावर प्राचीन काळात एकमेकांशी जोडणारी पाण्याची तळी होती. त्यातील पाच तळ्यांमध्ये जीवसृष्टीस आवश्यक असलेली खनिजेही होती हे सिद्ध करणारे भूगर्भशास्त्रीय पुरावे मिळाले असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. नेदरलँडसमधील उत्रेख्त विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, आताच्या काळात मंगळाची पृष्ठभूमी कोरडी वाटत असली तरी तेथे पूर्वी पाणी होते याच्या खुणा सापडल्या आहेत.

  • गेल्या वर्षी युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स एक्स्प्रेस मोहिमेत मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा साठा सापडला होता. जर्नल ऑफ जिओफिजिकल रीसर्च- प्लॅनेटस या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार प्राचीन काळात मंगळावर आताच्या प्रारूपांनी अंदाज केल्यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी होते. 

  • त्याकाळात मंगळावर पाणी होते नंतर मंगळावरचे वातावरण बदलत गेले त्यामुळे पाणी पृष्ठभागाच्या तळाशी गेले असे उत्रेख्त विद्यापीठाचे फ्रान्सेस्को सॅलेस यांचे म्हणणे आहे. आमच्या अभ्यासात मंगळाच्या पृष्ठभागाखाली मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याचे भूगर्भशास्त्रीय पुरावे मिळाले आहेत.

मास्टर ब्लास्टरने अनुभवला ऑफ रोड ड्रायव्हिंगचा थरार :
  • पणजी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला मास्टर ब्लास्टर सध्या ऑफ रोड कार रेसिंगमध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे. गोव्यात रविवारी अपोलो टायर्स तर्फे आयोजित बॅड रोड बडीजच्या समारोप सोहळयाला सचिनने सहभाग घेतला. दक्षिण गोव्यातील केपे येथील पठारावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • सचिनने नुसतचं सहभाग न घेता मैदानात उतरून त्याने ऑफ रोड ड्रायव्हिंगचा थरार अनुभवला. आपण या खेळात देखील मास्टर ब्लास्टर होऊ शकतो हेही त्याने दाखवून दिले. यापूर्वी सचिनने आपली ऑफ रोड रेसिंगमध्ये कार चालवण्याची हौस विदेशात भागवली होती. सचिनचे गाडयांचे प्रेम सर्वश्रुत आहे. गोव्यात यापूर्वी कार्ट रेसिंग ट्रॅकवर सचिन चौफेर फटकेबाजी करताना दिसला होता.

  • सचिन देशात पहिल्यांदाच रविवारी गोव्यात ऑफ रोड रेसिंगसाठी मैदानात उतरला. दक्षिण गोव्यातील केपे येथील पठारावर नैसर्गिक ट्रैकवर सचिन कार घेऊन मैदानात उतरला आणि त्याने आपले लक्ष्य साध्य करत सगळ्यांना चकित केलं. त्यानंतर सहचालक बनून सचिनने आणखी एक थरार अनुभवला जो प्रशिक्षित ऑफ रोड रेसर्सस करतात. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खडयात कार उतरवून ती बाहेर काढण्याचा अनुभव ग्रेट होता असे सचिनने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.

  • १६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.

  • १८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.

  • १९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.

  • १९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.

  • १९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.

  • २०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

जन्म 

  • १५१२: नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)

  • १९१०: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.

  • १९१६: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९९७)

  • १९३४: इस्रायली-अमेरिकन नोबेल पुरस्कार विजेते मानसशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ डॅनियल काहंनमन यांचा जन्म.  

मृत्यू 

  • १९५३: सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८७८)

  • १९६६: साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन.

  • १९६८: समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन.

  • १९८५: महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.

  • १९८५: कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन.

  • १९८९: गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद यांचे निधन.

  • २०१३: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९५४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.