चालू घडामोडी - ०५ मे २०१७

Date : 5 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जीसॅट-९ उपग्रहाचे आज प्रक्षेपण : 
  • इस्रोचा अग्निबाण जीएसएलव्ही-एफ०९ ने या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाईल. याला २३५ कोटी रुपये खर्च आला असून, तो शेजारच्या देशांना १२ केयू बँड ट्रान्सपाँडर्समार्फत सेवा देईल.  या उपग्रहाचे आयुष्य १२ वर्षांचे आहे. 

  • दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाच्या उड्डाणाची नियोजनाप्रमाणे व्यवस्थित तयारी सुरू असून, या उपग्रहामुळे दक्षिण आशियायी देशांच्या परस्परांतील संपर्काला उत्तेजन मिळेल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी गुरुवारी येथे सांगितले. या उपग्रहाचे प्रक्षेपण ५ मे रोजी केले जाणार आहे.

  • या भूस्थिर दूरसंचार उपग्रहाची बांधणी इस्रोने केली असून, येथून सुमारे १०० किलोमीटरवरील श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून त्याला शुक्रवारी सायंकाळी ४.५७ मिनिटांनी आकाशात सोडले जाईल.

  • ३० एप्रिल रोजी मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात दक्षिण आशिया उपग्रह हा शेजारच्या देशांना भारताकडून अमूल्य भेट असेल, असे जाहीर केले होते. 

उत्तर प्रदेशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिकवणार - मुख्यमंत्री योगींची घोषणा
  • महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशामध्ये दीर्घकालीन सांस्कृतिक संबंधांचा उलगडा करताना नाईक यांनी रामायण, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक आदींसंदर्भातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय घटनांचा हवाला दिला होता.

  • महाराष्ट्र दिनापासून प्रेरणा घेऊन उत्तर प्रदेश दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सहकार्य करारही करण्याची घोषणाही केली. परप्रांतीयांबाबतच्या वादांच्या पाश्र्वभूमीवर योगींच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

  • उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या पुढाकाराने लखनौतील राजभवनामध्ये महाराष्ट्र दिनाचा सोहळा नुकताच रंगला. त्यासाठी योगी, त्यांचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, आवर्जून निमंत्रित केलेले सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील आदी उपस्थित होते.

भारताचे नेतृत्व राणीकडे - न्यूझीलंडविरुद्ध हॉकी मालिकेसाठी संघ जाहीर
  • ‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यात भारतीय संघ उत्तम कामगिरी करून जूनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या स्पध्रेत आत्मविश्वासाने उतरेल,’’ असा विश्वास  मुख्य प्रशिक्षक हॉलंडचे शोर्ड मारिजने यांनी व्यक्त केला.

  • मिडलँड्स येथे १४ मेपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी २० सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व आघाडीपटू राणीकडे सोपवण्यात आले असून दुखापतीमुळे आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या बचावपटू सुशिला चानूकडे उपकर्णधारपद दिले आहे.

  • यंदाच्या हंगामाचा भारताच्या वरिष्ठ हॉकी संघाने दिमाखदार प्रारंभ केला आहे. बेलारूसविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने आरामात जिंकली होती. 

भारतीय संघ -

  • गोलरक्षक : रजनी ईटीमार्पू, सविता. बचावपटू : दीप ग्रेस एक्का, उदिता, सुनीता लाक्रा, गुरजीत कौर, सुशिला चानू पुखरमबाम (उपकर्णधार), नमिता टोप्पो. मध्यरक्षक : रितू राणी, लिमिमा मिन्झ, नवज्योत कौर, मोनिका, रेणुका यादव, निक्की प्रधान, रीना खोकर. आघाडीपटू : राणी (कर्णधार), वंदना कटारिया, प्रीती दुबे, सोनिका, अनुपा बार्ला.

शाही जबाबदारीतून फिलिप यांची निवृत्ती : 
  • राजे फिलिप सुमारे ७८० विविध संस्थांशी आश्रयदाते तसेच अध्यक्ष वा पदाधिकारी नात्याने संबंधित असून, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती आहेत.

  • ब्रिटनचे राजकुमार व ड्यूक आॅफ एडिन्बर्ग प्रिन्स फिलिप यांनी शाही जबाबदारीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. ९५ वर्षांचे फिलिप येत्या आॅगस्टनंतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमात शाही घराण्याचे सदस्य म्हणून हजर राहणार नाहीत, असे बकिंगहॅम राजप्रासादाने जाहीर केले.

  • ड्यूक आॅफ एडिन्बर्ग यांनी यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णयाला महाराणी एलिझाबेथ यांचा पाठिंबा आहे.

  • प्रिन्स फिलिप यांनी महाराणींसोबत सर्व महत्त्वपूर्ण परदेश दौरे केले असून यात भारताच्या तीन दौऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी १९६१ मध्ये भारताचा पहिला दौरा केला होता. त्यानंतर १९८३ आणि १९९७ मध्ये त्यांनी भारताचे आणखी दोन राजकीय दौरे केले होते.

पतंजलीची वर्षभरात १० हजार कोटींची उलाढाल - रामदेव बाबा
  • योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनांनी भारतीय बाजारपेठेला अक्षरश व्यापून टाकलं आहे. गेल्या वर्षी पतंजलीला १० हजार ५६१ कोटींची उलाढाल झाल्याची  माहिती खुद्द रामदेव बाबा यांनी दिली.

  • देशभरात पतंजलीचे तब्बल ६ हजार वितरक असून त्याची संख्या १२ हजारापर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट पतंजलीसमोर आहे.

  • हरिद्वारसोबतच जम्मूमध्येही नवा प्लान्ट उभारणार असल्याचं रामदेव बाबांनी सांगितलं. पुढील दोन वर्षात देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनण्याचं लक्ष्य असल्याचं रामदेव बाबा म्हणाले.

  • यावेळी बाबा रामदेव यांनी सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. चीन हा पैसा पाकिस्तानला दहशतवादी कारवाई करण्यासाठी पुरवतो, असा दावा रामदेव बाबांनी केला.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • भारतीय आगमन दिन : गुयाना, १८३८ पासून.

  • बाल दिन : जपान, दक्षिण कोरिया.

  • सिंको दे मायो : मेक्सिको, अमेरिका.

जन्म, वाढदिवस

  • कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञानी : ०५ मे १८१८

  • ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती : ०५ मे १९१६

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन  

  • नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट : ०५ मे १८२१

  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ ‘बालकवी’, मराठीतील प्रसिध्द कवी : ०५ मे १९१८

ठळक घटना 

  • विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली : ०५ मे १९०१

  • महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका : ०५ मे १९४४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.