चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ मे २०१९

Date : 5 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बारावीचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून बदलणार :
  • पुणे : अकरावी अभ्यासक्रमापाठोपाठ बारावीचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) तो लागू केला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तज्ज्ञ, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून १० मे २०१९ पर्यंत आॅनलाइन सूचना, शिफारशी मागविण्यात आल्या आहेत. ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर त्या नोंदविता येतील.

  • महाराष्टÑ राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाची पुनर्रचना व त्यास अनुसरून नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. संचालक डॉ. सुनील मगर यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

  • उच्च माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या अभ्यासक्रमाची मांडणी ही नव्याने क्षमता विधानांच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे. अकरावीचा विचार करता विषयाचे प्राथमिक ज्ञान अपेक्षित आहे. बारावीसाठी विषयाचे उपयोजनात्मक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व त्याचा अवलंब करावा हा विचार ठेवण्यात आलेला आहे.

  • अभ्यासक्रमाची मांडणी ही क्षमता विधानांच्या स्वरूपात निश्चित करण्यात आली असल्याचे बालभारतीने म्हटले आहे. फक्त विषयज्ञानात भर घालण्यापेक्षा त्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने होणाऱ्या क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमांबाबत शिफारशी, सूचना पाठविण्याचे आवाहन बालभारतीकडून करण्यात आले आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेला १० मेपर्यंत मुदतवाढ :
  • पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झालेल्या पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिकच्या शिक्षण संचालकांकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

  • शाळांच्या अडवणुकीमुळे अनेक पालकांना प्रवेश घेता आला नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचालक कार्यालयाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी ४ मेपर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र या कालावधीमध्येही अनेकांना प्रवेश

  • मिळाला नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचालकांकडे करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • राज्यभरातील १० हजार शाळांमधील १ लाख १६ हजार ७७९ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी राज्यभरातून २ लाख ४४ हजार ९३३ अर्ज आले. त्यातून पहिल्या फेरीत ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. 

तब्बल १२६ तास केले नृत्य...नेपाळच्या तरुणीचा विश्वविक्रम :
  • काठमांडू : आजच्या जगात काय अशक्य आहे? तंत्रज्ञानामुळे सारे काही शक्य झाले आहे. शेजारच्या नेपाळमधील एका तरुणीने जगाला आश्चर्याने बोटे तोंडात घालायची वेळ आणली आहे. या तरुणीने तब्बल 126 तास न थकता न थांबता नृत्य करत वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. याचबरोबर हा विक्रम करणारी ही जगातील पहिली तरुणी बनली आहे. याआधी हे रेकॉर्ड एका भारतीयाच्या नावे होते. 

  • तसे नृत्य करणे हे थकविणारेच. फारतर तास-दीड तास नाच करू शकतो. मात्र, नेपाळच्या तरुणीने 126 तास नृत्य केले आहे. वंदना नेपाल असे या तरुणीचे नाव असून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी शनिवारी वंदनाचा सत्कार केला. वंदनाचे वय अवघे 18 वर्षे आहे. 

  • वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना वंदनाने सांगितले की शुक्रवारी गिनिज बुककडून याबाबत सांगण्यात आले. वंदना ही नेपाळच्या धनकुटा जिल्ह्यातील राहणारी आहे. वंदनाने भाकताच्या कलामंडलम हेमलता यांनी स्थापित केलेले रेकॉर्ड तोडले आहे. हेमलता यांनी 2011 मध्ये 123 तास आणि 15 मिनिटे सलग नृत्य करत वर्ल्ड रेकॉर्ड केले होते.

फनी चक्रीवादळच्या तडाख्यामुळे ओदिशामधील NEET परीक्षा पुढे ढकलली :
  • नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची 'NEET' ही प्रवेश परीक्षा 'फनी' चक्रीवादळामुळे ओदिशा राज्यात पुढे ढकलली आहे. मात्र उर्वरित सर्व राज्यांमध्ये नीट परीक्षा आज (रविवार, 05 मे ) ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.

  • सर्व राज्यांप्रमाणे आज ओदिशा राज्यातील 7 केंद्रावर नीट परीक्षा होणार होती. परंतु परीक्षा पुढे ठकलल्याने पुढील सुधारित वेळापत्रक लवकरच NTA कडून जाहीर केले जाणार आहे. इतर राज्यात NEET परीक्षा आज दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे.

  • फनी वादळाच्या तडाख्यानंतर रेल्वे, विमान आणि वाहतुकीच्या इतर सेवा खंडीत झाल्याने नीट परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप होऊ शकतो, यामुळे NSUI व इतर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता ही परीक्षा फक्त ओदिशा राज्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

  • महाराष्ट्रात ही परीक्षा एकूण 18 जिल्ह्यांमधील विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी नीट परीक्षेच्या काही राज्यातील केंद्रामध्ये बदल झाल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) कडून परीक्षार्थीना कळविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी पुन्हा एकदा आपले हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे सांगण्यात आले होते.

फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण :
  • पुणे : फनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या भागात अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही जीवितहानीची घटना घडली नाही. इतकेच नव्हे तर वादळ संपल्यावर अवघ्या दोन तासात या जिल्ह्यातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. यामागे नियोजन होते महाराष्ट्रातील अहमदनगरचे सुपुत्र असलेल्या जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांचे. 

  • बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी हे चक्रीवादळ शुक्रवारी (दि. ३) रोजी ओडिशा किनारपट्टीला धडकले. यावेळी ओडिशा प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. त्यांच्या या नियोजन आणि तात्काळ अंमलबजावणी प्रक्रियेची आखणी अत्यंत काळजीपूर्वक केली गेली. गंजाम जिल्ह्यात ५ तालुके वादळामुळे प्रभावित झाले होते. फनीबाबत हवामानखात्याने पाच दिवस आधी प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार गंजाममधून नियोजन करून शेवटच्या दीड दिवसात तीन लाख नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले गेले. यातही प्राधान्याने गरोदर महिला,अपंग, वयोवृद्ध यांना हलविण्यात आले. यावेळी ५४० गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यातील १५३ महिलांची तीन तारखेला प्रसूतीही झाली. प्रत्येक स्थलांतर स्थळी अन्न, पाणी, जनरेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवली होती. त्याकरिता 

  • आधीच स्थानिक भागातील केटरर्स सेवा देणाऱ्या व्यक्तींशी संपर्क करून ठेवण्यात आला होता. अनेक नागरिक सोबत आपली जनावरे किंवा पाळीव प्राणी घेऊन येत असल्याने त्यांनाही दाखल करून घेण्यात आले. या काळात सर्व माध्यमांचा आधार घेऊन कच्चा घरातून बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय प्रत्यक्ष वादळाला सुरुवात झाल्यावर कोणीही बाहेर पडू नये असाही प्रचार करण्यात आला. अर्थात याचा फायदा लोकांकडून मिळणाऱ्या सहकार्यात झाल्याचे प्रशासनाने नमूद केले. 

दिनविशेष :
  • युरोप दिन

महत्वाच्या घटना 

  • १२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.

  • १९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

  • १९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.

  • १९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.

  • १९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.

  • १९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

जन्म 

  • १४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)

  • १८१८: कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १८८३)

  • १८६४: निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.

  • १९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)

  • १९१६: ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)

  • १९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)

  • १९४३: गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)

  • १९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.

  • १९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)

  • २००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.

  • २००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)

  • २००८: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१७)

  • २०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९३७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.