चालू घडामोडी - ०५ नोव्हेंबर २०१७

Date : 5 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रशियाचे शक्तिशाली अध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडल्ट स्टार देणार आव्हान
  • मॉस्को - रशियामध्ये पुढच्यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आतापासून चर्चा सुरु झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीत काही नवीन चेहरे व्लादिमीर पुतीन यांना आव्हान देऊ शकतात.

  • ज्यामुळे पुतिन यांचा विजयाचा मार्ग अधिक खडतर बनेल. या सर्व संभावनांच्या पार्श्वभूमीवर रशियातील एक फेमस अॅडल्ट स्टार ऐलेना बर्कोवाने पुतिन यांच्याविरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 

  • मुर्मान्स्क शहरात राहणा-या ऐलेना बर्कोवाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. ऐलेनाने याआधी सोची शहरातून महापौरपदाची निवडणूकही लढवली होती.

  • 32 वर्षाच्या ऐलेनाचे इंस्ट्राग्रामवर 6.5 लाख फॉलोअर्स आहेत. त्यावरुन तिच्या लोकप्रियतेची कल्पना येते. 

एसबीआयचं ग्राहकांना गिफ्ट, होम-ऑटो लोन झालं स्वस्त
  • नवी दिल्ली - पब्लिक सेक्टरमधील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे.

  • एसबीआयने होम लोन आणि ऑटो लोनवरील व्याजदरात 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे.

  • त्यामुळे गृह कर्जाचे व्याजदर आता 8.35 टक्क्यांवरून 8.30 टक्के झाले आहे. तर वाहन कर्जाचे व्याजदर 8.75 वरून घटून 8.70 टक्के इतके झाले आहे. नवीन व्याजदर हे 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. 

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
  • जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी यमसदनास धाडले.

  • ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दलाकडून अजूनही दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

  • सविस्तर वृत्त अद्याप आलेले नाही.

दिनविशेष 

महत्वाच्या घटना 

१८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.

१८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

१८४३: विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.

१८७२: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

१८९५: जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.

१९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.

१९४५: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

२००६: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२००७: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.

२०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.

जन्म 

१८९२: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९६४)

१९०५: भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७३)

१९०८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)

१९१७: स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट२००७)

१९२१: ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

१९२९: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)

१९३०: भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०११)

१९५२: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.

१९८८: क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.

मृत्यू 

१८७९: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन. (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.)

१९१५: राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)

१९५०: चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.

१९९१: कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.

२०११: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.