चालू घडामोडी - ०५ नोव्हेंबर २०१८

Date : 5 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ :
  • मुंबई : राज्यातील दुष्काळी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं याबाबतचं परिपत्रक काढलं आहे. या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही उच्च शिक्षण संचालनालयाला देण्यात आल्या आहेत.

  • राज्य सरकारनं 31 ऑक्टोबरला राज्यातल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीची जाणीव ठेवत विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं क्षुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

  • राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

८१ हजार फेसबुक अकाउंट हॅक, डेटा चोरीला :
  • नवी दिल्ली: फेसबुकवरील 81 हजार अकाउंट हॅक करुन त्यातील डेटा चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार युझर्सची पर्सनल डिटेल्स 10 सेंट (6.50 रुपए) विकली जात असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

  • डेटा कोणी चोरला याची माहिती जरी मिळाली नसली तरी युझर्सचा डेटा विकण्यासाठी ज्या वेबसाईटवर जाहिरात देण्यात आली होती त्याचा डोमेन पीटर्सबर्ग येथील आहे. यूक्रेन, रशिया, ब्रिटन, अमेरिका आणि ब्राझील या देशासह अन्य देशातील फेसबुक युझर्सची माहिती हॅकर्स विकत आहे.

  • दरम्यान सप्टेंबर महिन्यात FBsellar या नावाच्या युझरने त्याच्याकडे 12 कोटी युझर्सच्या अकाउंटची माहिती असून, तो ते विकणार असल्याची माहिती त्याने बीबीसीला दिली होती. त्यानंतर सायबर सिक्युरिटी फर्म डिजीटल शॅडोने याचा तपास केल्यास, तो खरच 81 हजार लोकांची माहिती मॅसेजसहित विकत असल्याच समोर आलं. शिवाय हॅकरकडे 1 लाख 76 हजार युझर्सचे ई-मेल एड्रेस आणि फोन नंबर ही आहेत.

  • फेसबुकचे व्हाइस प्रेसीडेंट गाय रोजेन यांनी यासंबधी स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, "आम्ही या संदर्भात ब्राउझर मेकर्सशी चर्चा करत आहोत, त्यांना सांगण्यात आलं आहे की ज्या एक्सटेंशनने युझर्सचा डेटा चोरण्यात आला आहे, तो त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात यावा. त्यासोबतच ज्या वेबसाईटवर डेटा विकण्याची जाहिरात देण्यात आली होती ती वेबसाईट ब्लॉक करण्याच प्रयत्न सुरू आहे.

इराणवरील तेलनिर्यात निर्बंध आजपासून :
  • अमेरिकेने इराणवर लादलेले तेलनिर्यात निर्बंध आजपासून (सोमवार, दि. ५ नोव्हेंबर, ४ नोव्हेंबरची मध्यरात्र) लागू होत असून त्यातून भारतासह ८ देशांना सहा महिन्यासांठी सवलत मिळाली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिवाळीच्या तोंडावर बसणारा धक्का तूर्तास टळला आहे. दरम्यान, इराणकडून मिळणाऱ्या खनिज तेलाचे पैसे भागवण्यासाठी नवी यंत्रणा तयार करण्यावर सध्या भारताचा भर आहे.

  •  

  • अमेरिकेने युरोपीय देशांच्या मदतीने २०१५ साली इराणबरोबर अणुकरार केला होता. त्यात इराणने अण्वस्त्रनिर्मिती थांबवण्याचे मान्य केले आणि अमेरिकेने इराणच्या व्यापाराचे दरवाजे खुले केले. मात्र इराण या कराराच्या अटी पाळत नसल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली. तसेच इराणवर नव्याने निर्बंध लादले.

  • त्यानुसार इराणकडून खनिज तेल विकत घेणाऱ्या देशांवरही अमेरिकेने निर्बंध लादण्याचा इशारा दिला. तेलनिर्यातीतून मिळालेल्या पैशाचा इराणने अण्वस्त्रनिर्मितीसाठी वापर करू नये हा अमेरिकेचा उद्देश आहे. मात्र त्याबरोबर मित्र देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसू नये, याकडेही लक्ष दिले आहे. इराणकडून खनिज तेल आयात करण्यावरील निर्बंध ५ नोव्हेंबरपासून लागू होत आहेत.

  • त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असता, कारण इराण हा भारताचा मोठा तेलपुरवठादार देश आहे. त्यामुळे भारतासह अन्य काही देशांनी अमेरिकेशी चर्चा करून या र्निबधांतून सवलत मिळवली. त्यानुसार भारत, जपान, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान आदी देशांना पुढील १८० दिवसांपर्यंत इराणकडून तेल आयात करण्यास सवलत मिळाली आहे. मात्र इराणकडून तेलआयात टप्प्याटप्प्याने कमी करण्याची अट कायम आहे.

  • इराणकडून तेल आयात करताना भारताला रुपयांत आणि काही दिवसांच्या अंतराने पैसे भरण्याची सोय उपलब्ध होती. आता नव्या परिस्थितीत इराणच्या तेलाचे पैसे भागवण्यासाठी नवी यंत्रणा उभी करण्यावर भारताचा भर आहे.

भारतीय युवतींची विजेतेपदावर मोहोर :
  • अंतिम सामन्यात कझाकस्तानवर ६८-४५ अशी मात : यजमान भारताने अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे कझाकस्तानला ६८-४५ अशी धूळ चारून बेंगळूरु येथे झालेल्या २४व्या आशियाई मुलींच्या (१८ वर्षांखालील) बास्केटबॉल स्पर्धेतील ‘ब’ विभागाचे अजिंक्यपद मिळवले. त्याशिवाय त्यांनी पुढील स्पर्धेत ‘अ’ विभागात स्थान मिळवले. गतवर्षी याच कोर्टवर यजमानांच्या महिला आणि १६ वर्षांखालील मुलींच्या संघाने ‘ब’ विभागाचे अजिंक्यपद पटकावले होते आणि आजच्या यशाने भारताने विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

  • भारताच्या हर्षिता आणि पुष्पाने सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारून प्रतिस्पध्र्याच्या संरक्षित क्षेत्रात मुसंडी मारत गुण नोंदवण्याचा सपाटा लावला होता. कझाकस्तानच्या खेळाडूंना चेंडूवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येत नाही हे बरोबर हेरून, यजमानांनी ‘मॅन टू मॅन’ तंत्राचा अवलंब करून त्यांना पूर्ण जेरीस आणले.

  • सुरुवातीच्या १६-९ अशा आघाडीनंतर पुष्पाने आक्रमणाची सूत्रे आपल्या हाती घेत गुणफलक हालता ठेवला. त्याशिवाय बचावात प्रतिस्पध्र्याची अनेक आक्रमणे फोल ठरवली. मध्यंतराच्या ३२-१६ अशा मोठय़ा आघाडीनंतर हर्षिताने आपल्या उंचीचा फायदा घेत कझाकस्तानचा बचाव मोडून काढला आणि सामन्याचा निकाल स्पष्ट केला.

  • शेवटच्या सत्रात, पायास झालेल्या दुखापतीमुळे पुष्पाला काही काळ मैदान सोडावे लागले. या संधीचा फायदा घेऊन कझाकस्तानने लागोपाठ ८ गुण नोंदवून पिछाडी थोडीफार भरून काढली. परंतु पुष्पाच्या पुनरागमनानंतर यजमानांनी सामन्यावर नियंत्रण मिळवून विजय साजरा केला. बास्केटबॉल महासंघाचे अध्यक्ष गोविंदराज यांनी विजेत्या संघाचे १० लाख रुपये देऊन कौतुक केले.

  • ‘अ’ गटात चीन विजयी : ‘अ’ विभागाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या चीनने जपानचा ८९-७६ असा पाडाव करून सलग पाचवे तर स्पर्धेच्या इतिहासातील १६वे अजिंक्यपद पटकावले. तसेच या स्पर्धेच्या साखळी सामन्यात जपानकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली. युआन ली आणि झुओ फँग यांनी चीनच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

रिझर्व्ह बँक, भारत सरकारच्या वादावर नाणेनिधीची नजर :
  • वॉशिंग्टन : भारतसरकार आणि रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया यांच्यात सुरू असलेल्या वादविवादाकडे आमचे बारकाईने लक्ष असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. जगातील कुठल्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोड करण्याच्या हालचालींना आपला विरोध असल्याचेही नाणेनिधीने म्हटले आहे.

  • केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेवर टीका केली होती. २00८ ते २0१४ या काळातील बेछूट कर्ज वाटपावर नियंत्रण ठेवण्यास रिझर्व्ह बँक अपयशी ठरली असून, त्याचा परिणाम म्हणून देशातील आजची अनुत्पादक भांडवलाचे संकट निर्माण झाले आहे, असे जेटली यांनी म्हटले होते. रिझर्व्ह बँकेवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.

  • या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे दळवळण संचालक गेरी राइस यांनी सांगितले की, आम्ही स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत. पुढेही आमची नजर राहीलच. आम्ही याबाबत आमची भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की, केंद्रीय बँक आणि वित्तीय देखरेख संस्थेच्या (रिझर्व्ह बँक) स्वातंत्र्याबाबत तडजोड होईल, अशा पद्धतीचा हस्तक्षेप सरकार अथवा उद्योगाकडून होता कामा नये. हे आम्ही स्वीकारलेले सामान्य तत्त्व आहे. हीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील रूढ पद्धतीही आहे. केंद्रीय बँक आणि वित्तीय निगराणी संस्थेचे महत्त्व सर्वोच्च आहे. हे सर्वच देशांच्या बाबतीत सत्य आहे.

  • ट्रम्प यांनाही हे लागू - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अलीकडे तेथील केंद्रीय बँकेच्या कारभारावर प्रचंड टीका केली होती. त्याचे अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले होते. त्याविषयीच्या प्रश्नावर राइस यांनी म्हटले की, आम्ही याला महत्त्व देतो. अनेक देशांच्या संदर्भात आमचे हे निवेदन आहे.

मलेशियन मोटोजीपीमध्ये मारक्केजला जेतेपद :
  • क्वालालम्पूर : विश्व चॅम्पियन मार्क मारक्केजने चमकदार कामगिरी कायम राखताना रविवारी मलेशियन मोटोजीपीमध्ये जेतेपद पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे नववे विजेतेपद आहे.

  • मारक्केजचे कारकिर्दीतील हे ७० वे विजेतेपद आहे. मारक्केजने सातव्या स्थानापासून सुरुवात केली आणि त्याने झटपट दुसरे स्थान गाठले. दरम्यान वेलेंटिनो रोसीने आघाडी कायम राखली होती. शर्यतीचे चार लॅप्स शिल्लक असताना रोसीला १६ व्या लॅपच्या पहिल्या वळणावर नियंत्रण राखता आले नाही. त्यामुळे मारक्केजला आघाडी घेण्याची संधी मिळाली. त्याने ४०.३२.३७२ मिनिट वेळेसह शर्यत जिंकली. मारक्केजने यापूर्वी आॅक्टोबरमध्ये जपानमध्ये विश्वविजेतेपद पटकावले होते. होंडाचा त्याचा संघ सहकारी दानी पेडरोसा पाचव्या स्थानी राहिला. त्यामुळे होंडा संघ जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.

  • जेतेपद पटकावल्यानंतर प्रतिक्रिया देताना मारक्केज म्हणाला,‘मी सातव्या स्थानापासून सुरुवात करणार असल्यामुळे ही कठीण शर्यत होती. मला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या लॅपमध्ये माझी कामगिरी चांगली झाली, पण सर्वोत्तम नव्हती. क्रमाक्रमाने मी एका-एका रायडरला पिछाडीवर सोडत दुसरे स्थान गाठले. वेलेंटिनोला गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गाडीचा टायर हिट झाला. त्यामुळे नियंत्रण राखणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यानंतर काही लॅप मी केवळ नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला.

  • दरम्यान, वेलेंटिनो आणि माझ्यादरम्यान असलेले अंतर कमी झाले आणि त्यामुळे मला अतिरिक्त प्रेरणा मिळाली. दरम्यान, वेलेंटिनोने एका वळणावर छोटी चूक केली. त्यानंतर मी संयम राखत शर्यत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरलो. मी जॉर्ज मार्टिन व पेक्को या सहकाऱ्यांचाही आभारी आहे. त्यामुळे चॅम्पियनशिप मिळवता आली.’

  • पाचव्या स्थानी असलेला डॅनी पेड्रोसा म्हणाला,‘मी आज सुरुवातीवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. कारण ग्रीडमध्ये मी फार पिछाडीवर होतो. सुरुवात चांगली झाली नाही, पण त्यानंतर मी पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो.

दिनविशेष :
  • महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.

  • १८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

  • १८४३: विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.

  • १८७२: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

  • १८९५: जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.

  • १९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.

  • १९४०: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.

  • १९४५: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९५१: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.

  • २००६: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

  • २००७: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.

  • २०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.

  •  

  • जन्म 

  • १८७०: स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

  • १८८५: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)

  • १८९२: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर१९६४)

  • १९०५: भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७३)

  • १९०८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)

  • १९१३: ब्रिटिश अभिनेत्री विवियन लेह यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९६७)

  • १९१७: स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)

  • १९२१: ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

  • १९२९: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)

  • १९३०: भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०११)

  • १९३२: पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.

  • १९५२: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.

  • १९५५: पत्रकार करन थापर यांचा जन्म.

  • १९८८: क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७९: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन. (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.)

  • १९१५: राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट१८४५)

  • १९५०: चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.

  • १९९१: कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.

  • २०११: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.