चालू घडामोडी - ०५ ऑक्टोबर २०१७

Date : 5 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हिंदुत्वाच्या प्रयोगशाळे’त राहुल यांचे मनाचे प्रयोग :
  • ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यानच्या आपल्या दुसऱ्या दौऱ्यातही ते चार प्रमुख मंदिरांमध्ये माथा टेकवणार आहेत. दिवाळीनंतरच्या तिसऱ्या दौऱ्यातही मंदिर दर्शनाचा त्यांचा सपाटा चालूच राहील.

  • एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रतिमेला छेद देऊन ‘सिधी सय्यद की जाली’ या अहमदाबादमधील मशिदीला मध्यंतरी भेट दिली असताना दुसरीकडे ‘हिंदुत्वाची मूळ प्रयोगशाळा’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मवाळ हिंदुत्वाचा छोटेखानी नवा प्रयोग करू पाहत असल्याचे चित्र उभे राहत आहे. 

  • ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान राहुल हे मध्य गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी, पाटीदार (पटेल) समाज, व्यापारी आणि उद्योजक हे त्यांच्या दौऱ्याचे मुख्य केंद्रबिंदू राहतीलच; पण त्याचबरोबर गुजरातींच्या धार्मिक, आध्यात्मिक भावविश्वावर मनोराज्य असणाऱ्या चार प्रमुख मंदिरांतही ते जात आहेत.

  • त्यामध्ये नाडियादमधील संतराम मंदिर, फगवेलमधील भातीजी महाराज मंदिर, बडोद्याजवळच्या पावागडचे कालीमाता मंदिर आणि डकोरमधील वैष्णवांच्या रणछोडजी मंदिराचा समावेश आहे.

नोटाबंदी व जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला फटका : पी. चिदम्बरम यांची टीका
  • ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिटय़ूटमध्ये त्यांनी ‘अ‍ॅन इमर्जिग पॉवर एंगेजेस द वर्ल्ड – इंडिया अँड ऑस्ट्रेलिया’ या विषयावर बोलताना सांगितले, की सध्याचे आर्थिक वातावरण हे १९९१ किंवा २००४ प्रमाणे सुधारणा राबवण्यास अनुकूल नाही व सरकारने यात फार निराशा केली आहे.

  • भारताच्या आर्थिक वाढीला भाजप सरकारने अनुकूल वातावरण निर्माण केलेले नसून नोटाबंदी व जीएसटी यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदम्बरम यांनी येथे केली.

  • काही बाबतीत सरकारने भलत्याच मुद्दय़ांवर भर देऊन लक्ष विचलित केले असून तर दुसरीकडे जे आर्थिक निर्णय घेतले गेले त्यांचे भयनाक परिणाम दिसू लागले असून यातील काही बाबी कायद्यातील त्रुटींच्या असून या सगळ्या प्रकारास भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे.

  • प्रश्नचिन्हांकित कृती व शब्द, घातक मौन यातून आंतरधर्मीय विवाह, मांस विक्री व सेवन, पोशाखाबाबतचे सांस्कृतिक निकष, हिंदी भाषेचे अवडंबर, राष्ट्रवाद, मातृभूमीच्या  प्रेमाखातर घोषणाबाजी, समान नागरी कायदा व काश्मीरला स्वतंत्र दर्जा हे विषय आणखी चिघळवले गेले आहेत.

तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर :
  • पदार्थांच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी या तिघांनी जे योगदान दिले त्याचमुळे हे नोबेल त्यांना दिले जात असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

  • जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही यंदा रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.

  • जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून नोबेल या पुरस्काराची ओळख असून ३ ऑक्टोबर रोजी पदार्थ विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाले, त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी रसायन शास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले.

  • 'हिंदुस्थान टाइम्स'ने या संदर्भातले वृत्त दिले असून डबोके, फ्रँक आणि हेंडरसन या तिघांनी पदार्थाच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीश कुमार :
  • देशातील सर्वात मोठ्या बँकेला नवा अध्यक्ष मिळाला असून केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली.

  • अपॉईंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेटकडून (एसीसी) तीन वर्षांसाठी रजनीश कुमार यांना या पदावर नियुक्त केले जाणार असून ०७ ऑक्टोबर रोजी ते आपला पदभार स्वीकारतील.

  • रजनीश कुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत, सन १९८० मध्ये ते स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी बँकेत विविध पदांवर काम केले.

  • सन २०१५ मध्ये नॅशनल बँकींग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बनण्यापूर्वी ते व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्टेट बँकेची मर्चंट शाखा आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सचे काम सांभाळत होते.

  • सध्या अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँकेच्या अध्यक्षा आहेत. त्यांचा कार्यकाळ ६ ऑक्टोबर रोजी संपणार असून त्यांना सरकारकडून या पदावर राहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. भट्टाचार्य यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये या पदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्याच वर्षी सरकारने त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ दिली होती.

२०१९ मध्ये जागतिक मंदी - अमेरिकेत वर्तवली गेली शक्यता :
  • २००८ नंतर आता पुन्हा एकदा आर्थिक मंदीची चाहूल लागली असून २०१९ मध्ये जागतिक मंदी येणार असल्याचे भाकित अमेरिकेत वर्तवलं असून मॅरेथॉन अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे मालक ब्रुस रिचर्ड्स यांनी ही शक्यता वर्तवली आहे. 

  • २०१८ च्या मध्यंतरापर्यंत यावर ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले असून गेल्या आठवड्यात अ‍ॅमस्टरडॅममध्ये 'लेजेण्स्ड फोर लेजेण्स्ड' कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे.

  • ब्रुस रिचर्ड्स म्हणाले की, जागतिक मंदीमध्ये अमेरिकेची काय स्थिती असणार, आर्थिक स्थिती कुमकुवत होणार का, यावर आताच भाष्य करणे योग्य नाही पण पुढे ठाकलेल्या या समस्याला सामोर जाण्याची तयारी सुरु करावी.

  • २०१८ च्या सुरुवातीला किंवा कदाचित २०१९ मध्ये जागतिक मंदी येऊ शकते, क्रेडिट हेज-फंड फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी संधीचा लाभ घेण्यासाठी नवीन संकटग्रस्त निधीची योजना आखत आहेत.

  • यावेळी रिचर्ड्स म्हणाले २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीतून सावरायला अमेरिकेला काही वर्ष लागली असून २००८ मध्ये अमेरिकेमध्ये येणाऱ्या मंदीचा आणि त्याचा जगावर होणाऱ्या आर्थिक संकटचा परिणामाचा अंदाज जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीनं लावला होता.

  • अमेरिका, जपान, चीन आणि जर्मनी यासारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेतवर काय परिणाम होणार हे त्यांनी स्पष्ट केलं होतं, जागतिक मंदी मात करण्यासाठी जून २०१८ पर्यंत भांडवल उभे करू शकतात.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • प्रजासत्ताक दिन : पोर्तुगाल.

जन्म /वाढदिवस

  • किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक : ०५ ऑक्टोबर १८९०

  • तेरेसा हाइन्झ केरी, अमेरिकन उद्योगपती : ०५ ऑक्टोबर १९३८

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक : ०५ ऑक्टोबर १९९१

  • परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी : ०५ ऑक्टोबर १९९२

  • स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्स चे सहसंस्थापक : ०५ ऑक्टोबर २०११

ठळक घटना

  • पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले : ०५ ऑक्टोबर १९१०

  • अश्गाबादमध्ये भूकंप. १,००,००० मृत्युमुखी : ०५ ऑक्टोबर १९४८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.