चालू घडामोडी - ०५ सप्टेंबर २०१७

Date : 5 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरकारी व्यवहार रोख रकमेने बंद होणार यापुढे :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केल्यानंतर, सर्वांनाच डिजिटल पेमेंटकडे वळण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी अनेक सरकारी व खासगी अ‍ॅपही आता उपलब्ध आहेत, ते तुम्ही अद्याप डाउनलोड केले नसतील, हे बहुधा लगेचच करून घ्यावे लागतील.

  • तुम्ही आतापर्यंत कधीही डिजिटल पेमेंट केले नसेल वा ते कसे करायचे, हे तुम्हाला माहीत नसेल, तर यापुढे ते शिकून घ्यावेच लागेल. याचे कारण म्हणजे रेल्वेच्या तिकिटापासून एसटीच्या तिकिटापर्यंत तुम्हाला डिजिटल पेमेंट करण्याची सक्ती होण्याची शक्यता आहे.

  • अगदी सरकारी पर्यटन महामंडळाच्या बसेस वा हॉटेल, रिसॉर्ट्स येथेही डिजिटल पेमेंट हाच एकमेव पर्याय तुमच्यापुढे असू शकेल.

  • सरकारी सेवांसाठी भीम अ‍ॅप व भारत क्यूआर कोडबरोबरच आणखी काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे.

  • सरकारी सेवेसाठी रोख रकमेचा वापर होऊ नये आणि सारे सरकारी आर्थिक व्यवहार डिजिटलच असावेत, असे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहे. हे सरकारला आॅक्टोबर, महात्मा गांधी जयंती दिनी जाहीर करायचे असून, त्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी इच्छा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात ‘तेल’चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यावर तसेच अफगाणिस्तानच्या सुरक्षा स्थितीवरही चर्चा केली.

  • दक्षिण पूर्व चीन शहरात आयोजित ब्रिक्स संमेलनादरम्यान या नेत्यात चर्चा झाली असून तेल व नैसर्गिक गॅसच्या क्षेत्रात सहकार्याचा मुद्दाही या वेळी चर्चिला गेला.

  • पंतप्रधान मोदी हे मंगळवारी म्यानमारला रवाना होणार आहेत, तत्पूर्वी ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार असून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार

  • रवीश कुमार यांनी सांगितले की, या वर्षी रशियात आयोजित करण्यात आलेल्या ‘फेस्टिव्हल आॅफ इंडिया’चा पुतीन यांनी उल्लेख केला.

  • दोन्ही देशांत पर्यटनाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांच्या आदान-प्रदानावर चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी ब्राझिलचे राष्ट्रपती माइकल टेमर यांच्याशी चर्चा केली. 

  • पुतीन यांनी मोदी यांच्या रशिया दौऱ्यांच्या आठवणींना उजाळा दिला ‘इस्टर्न इकॉनॉमिक फोरम’मध्ये भारताने केलेल्या भागीदारीबद्दल त्यांनी मोदी यांचे आभार मानले.

  • अफगाणसह क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. पण, याची विस्तृत माहिती देण्यास रवीश कुमार यांनी नकार दिला.

काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी ८ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर :
  • सकाळी ९.३० वाजता राहुल गांधी हे नांदेडमध्ये दाखल होतील, काँग्रेस मेळाव्यानंतर त्यांचा ताफा मोटारीने परभणीकडे रवाना होणार असून वाटेत शेतकºयांनाही ते भेटण्याची शक्यता आहे.

  • काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी ८ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून ८ सप्टेंबर रोजी ते नांदेड येथे काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याला मार्गदर्शन करतील.

  • त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते परभणी येथे शेतकरी संघर्ष सभेला संबोधित करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.

प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दणका :
  • बेहिशेबी अमाप मालमत्ता जमा केल्याचे आरोप करून त्याच्या चौकशीसाठी केलेली जनहित याचिका फेटाळून लावावी, ही मागणी अमान्य करून उच्च न्यायालयाने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सोमवारी दणका दिला.

  • सार्वजनिक पदावरील व्यक्तीविरुद्धच्या अशा आरोपांची शहानिशा करणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने खडसे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर, काय पावले उचलली? अशी विचारणा करत, राज्य सरकारला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

  • खडसे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे अमाप संपत्ती असून, ती कशा प्रकारे जमा केली, याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी दमानिया यांनी याचिकेद्वारे केली.

  • खडसे यांनी ती रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली असून दोन्ही याचिकांवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.

  • अंजली दमानिया यांनी केलेली याचिका रद्द करण्यात यावी, यासाठी एकनाथ खडसे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दमानिया यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही.

टीम इंडियाच्या शिलेदारांचे रिपोर्ट कार्ड :
  • कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश देत टीम इंडियाने आपला एकहाती दबदबा राखला संपुर्ण मालिकेत लंकेने क्वचितंच भारतीय संघापुढे आव्हान उभे केले.

  •  भारताने आपल्या मजबूत फलंदाजीसह गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही वर्चस्व राखताना श्रीलंकेला पुनरागमनाची एकही संधी दिली नसून एकदिवसीय मालिकेबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी आपआपल्या परीने संघाच्या विजयामध्ये योगदान दिले.

  • कर्णधार विराट कोहलीपासून नवख्या शार्दुल ठाकूर पर्यंत सर्वांनीच मिळालेल्या संधीचे सोने करताना आपली छाप पाडली, आपल्या कामगिरीत सुधारणा करताना आयसीसी क्रमवारीतही भारतीय खेळाडूंनी मोठी झेप घेतली.

  • ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड अशा प्रमुख परदेशी दौऱ्यासाठी संघातील खेळाडूंना आजमावून घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्नही श्रीलंका दौºयातून यशस्वी ठरला.

  • जेष्ठ क्रिकेटतज्ज्ञ आणि ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांनी टीम इंडियातील सर्व शिलेदारांचे दहापैकी गुण देऊन विशेष विश्लेषण केले आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • शिक्षक दिन - भारत

जन्म /वाढदिवस

  • सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्रपती : ०५ सप्टेंबर १८८८

  • फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू : ०५ सप्टेंबर १९१०

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • मदर तेरेसा, समाजसेविका : ०५ सप्टेंबर १९९७

ठळक घटना

  • व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण : ०५ सप्टेंबर १९७७

  • एस.टी.एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली : ०५ सप्टेंबर १९८४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.