चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ जून २०१९

Date : 6 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात आणखी एक लाख ‘डिजीटल व्हिलेज’ तयार होणार - संजय धोत्रे :
  • संपूर्ण देशात सव्वा लाख ‘डिजीटल व्हिलेज’ करण्यात आले आहेत. आगामी पाच वर्षांमध्ये आणखी एक लाख ‘डिजीटल व्हिलेज’ तयार करण्याचे मोदी सरकारचे नियोजन असल्याची माहिती मानवसंसाधन विकास, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

  • केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संजय धोत्रे यांचे प्रथमच अकोल्यात आगमन झाले. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. तंत्रज्ञान अंत्यत प्रगत झाले. त्याचा उपयोग करून घेण्यावर अधिक भर आहे. या माध्यमातून तळागाळात सोयीसुविधा पुरवून विकास केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये आणखी एक लाख ‘डिजीटल व्हिलेज’ तयार करण्यात येतील.

  • लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार मोठय़ा प्रमाणात ‘रालोआ’सोबत राहिला. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. आधीच्या सरकारपेक्षा सरस कामगिरी करून प्रत्येकासाठी कार्य केल्याने ऐवढा मोठा विजय प्राप्त झाला. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपला मोठय़ा प्रमाणात जागा मिळत असतात. यावेळेस बंगालमधील यश उल्लेखनीय असल्याचे संजय धोत्रे म्हणाले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाने अत्यंत तीन महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. त्या खात्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. अकोल्याचा विचार केल्यास केंद्रीय विद्यालय, विद्यापीठाचे उपकेंद्र आदींसाठी प्रयत्न राहील, असेही संजय धोत्रे यांनी सांगितले. यावेळी आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, डॉ.संजय कुटे, रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया, अ‍ॅड. आकाश फुंडकर आदी उपस्थित होते.

रोजगारवाढीसाठी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली दोन कॅबिनेट समित्यांची स्थापना :
  • मोदी सरकारच्या द्वितीय कार्यकाळास सुरूवात झाल्यानंतर काही दिवसाताच बेरोजगारीची समोर आलेली आकडेवारी पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली देशाच्या अर्थव्यवस्थेतील मंदी व वाढत्या बेरोजगारीशी सामना करण्यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्या तयार करण्यात आल्या आहेत.

  • पंतप्रधान मोदींनी बुधवारी आर्थिक विकास व गुंतवणुक तथा रोजगार वाढवण्याच्यादृष्टीने या नव्या समित्यांची स्थापना केली आहे. गुंतवणुक व विकासावर आधारित समितीत गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचा समावेश आहे.

  • याशिवाय रोजगार आणि कौशल्य विकासावर आधारीत आणखी एक समिती स्थापन्यात आली आहे. ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, रेल्वे मंत्री पियूष गोयल, कृषि व पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य व उद्योजिकता विकास मंत्री महेंद्र पांडे, राज्य मंत्री संतोष कुमार गंगवार आणि हरदीप सिंह पुरी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

  • एनएसएसच्या आकडेवारीनुसार २०१८ -१९ च्या शेवटच्या तिमाहीत जीडीपी दर घसरल्याने नव्या सरकार समोर अर्थव्यवस्थेच्या रूपाने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मागिल आर्थिक वर्षातील जीडीपीचा अंदाज ७.२ टक्क्यांच्या तुलनेत ६.८ टक्के आला आहे. तर अधिकृत आकडेवारीवरून असे उघड झाले आहे की, भारतात बेरोजगारीचा दर २०१७-१८ मध्ये ४५ वर्षातील उच्च स्थानावर ६.१० टक्क्यांवर पोहचला आहे.

गुंतवणूक आणि रोजगार वाढीसाठी केंद्राची पावले :
  • मंदावलेला आर्थिक विकासाचा वेग आणि वाढती बेरोजगारी या दोन प्रमुख समस्या केंद्र सरकारला भेडसावत असून त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुंतवणूकवाढ आणि रोजगार निर्मितीतील वाढ या मुद्दय़ांवर या समित्या नेमण्यात येत आहेत.

  • आर्थिक विकास गतिमान करण्यासाठी सार्वजनिक तसेच खासगी गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे. विशेषत: पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांत गुंतवणूक वाढवली तर रोजगारनिर्मितीही शक्य होणार आहे. त्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे केंद्र सरकारने ठरवले असून त्यासाठी या मंत्री समित्या उपाय सुचवतील. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर विकासदर आणि रोजगारविषयक आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. केंद्राच्या सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विकासदर ५.५ टक्क्यांइतका खाली आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत विकासदर ६.६ टक्के होता.

  • भारत हा सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला देश असल्याचा दावा केंद्र सरकारकडून सातत्याने केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष आकडेवारीमुळे विकासदराबाबत नेमके उलटे चित्र समोर आले आहे. सलग १७ तिमाहीमध्ये विकासाचा दर कमी होत गेल्याचे सांख्यिकी विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर भारताचा आर्थिक विकासाचा दर चीनपेक्षा खूपच कमी असल्याची बाबही अधोरेखित झाली आहे. सध्या चीनचा विकासदर ६.४ टक्के असून त्या तुलनेत ५.५ टक्के विकासदर असलेला भारत मागे पडल्याचे दिसत आहे. दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताचा विकासदर चीनच्या तुलनेत घसरल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

मानवी शरीरात वर्षभरात हजारो प्लास्टिक कणांचा प्रवेश :
  • जगभरात दिवसेंदिवस प्लास्टिकचा वाढता वापर हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. प्लास्टिकच्या अतिवापरातून  हजारो सूक्ष्मकण श्वासावाटे आणि तोंडावाटे माणसाच्या शरीरात जात असल्याचे एका संशोधनाच्या आधारे स्पष्ट झाले आहे.

  • जागतिक पर्यावरणदिनी बुधवारी ‘एन्व्हार्न्मेंट सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या नियतकालिकातील संशोधनपर लेखात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. या वर्षी संयुक्त राष्ट्रांनीही पर्यावरण दिनासाठी ‘हवेतील प्रदूषण’ हा विषय निवडला आहे. कॅनडातील संशोधकांनी या संदर्भात अमेरिकन लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास करून त्याद्वारे प्लाटिक प्रदूषणाचा अभ्यास केला आहे.

  • मायक्रोप्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकचे सूक्ष्म कण. पूर्वी केलेल्या संशोधनात मानवी शरीरात प्लास्टिकचे कण हे अन्नपदार्थामधून मोठय़ा प्रमाणात जात असल्याचे आढळले होते. बाटलीबंद पाण्याच्या सर्वच उत्पादनांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्मकण मोठय़ा प्रमाणात आढळले होते. आता हे कण मानवीनिर्मित उत्पादने जसे कृत्रिम कपडे, कारचे टायर किंवा कॉन्टॅक्ट लेन्स आदींमधून पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणात पसरले जात आहेत.

  • त्यातूनच जवळपास ५२ हजार प्लास्टिकचे कण मनुष्य वर्षभरात सेवन करत असल्याचे  संशोधकांना आढळले आहे. तर १ लाख २१ हजार कण श्वासांवाटे मनुष्याच्या शरीरात जातात. म्हणजेच दिवसाला ३२० कण. शिवाय ९० हजार कण हे फक्त बाटलीबंद पाण्याच्या सेवनातून पोटात जात असतात.

नीट परीक्षेत राजस्थानच्या नलीनची बाजी, महाराष्ट्रातून सार्थक भट अव्वल :
  • मुंबई : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा (NTA NEET 2019) निकाल जाहीर झाला आहे. राजस्थानच्या नलिन खंडेलवालने 720 पैकी 701 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तर महाराष्ट्रातून सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते, दिशा अग्रवाल अव्वल आले आहेत.

  • राजस्थानच्या नलीन खंडेलवाल याने 701 गुण मिळवत देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर तेलंगणाची माधुरी रेड्डी (देशात सातवी) ही मुलींमध्ये पहिली आली. नाशिकचा सार्थक भट हा विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिला (देशात सहावा) आला. तर अकोल्याची दिशा अग्रवाल राज्यात मुलींमध्ये अव्वल (देशात 52 वी) ठरली.

  • सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते या महाराष्ट्रातील तिघांचा देशातल्या टॉप 50 मध्ये नंबर लागतो. नाशिकच्या सार्थक भटला 720 पैकी 695 गुण मिळाले आहेत. पुढे सार्थकला मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असून कार्डिअॅक सर्जन होण्याची इच्छा आहे. सार्थकला आपण टॉप 50 मध्ये येऊ असा विश्वास आधीपासून होता.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६७४: रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

  • १८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

  • १९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.

  • १९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.

  • १९४४: ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.

  • १९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.

  • १९७१: सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.

  • १९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

  • १९८२: इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.

  • १९९३: मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

  • २००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.

जन्म 

  • १८५०: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९१८)

  • १९०३: भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म.

  • १९०९: अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे यांचा जन्म.

  • १९१९: गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म.

  • १९४०: भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य यांचा जन्म.

  • १९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ इक्बाल यांचा जन्म.

  • १९५५: भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक सुरेश भारद्वाज यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०)

  • १८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५)

  • १९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर१८७८)

  • १९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६)

  • १९६१: स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ जुंग यांचे निधन.

  • १९७६: अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८९२)

  • २००२: मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.