चालू घडामोडी - ०६ मार्च २०१८

Date : 6 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विश्वनाथन आनंदला जेतेपद :
  • मॉस्को - विश्व रॅपिड विजेता भारताच्या विश्वनाथन आनंदने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफ्रेडविरुद्ध बरोबरी राखले आणि या जोरावर ताल स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

  • स्पर्धेत आनंदने एकूण नऊ फेºयांमध्ये सहा गुण संपादन केले. त्याने चार डावांमध्ये विजय, तर ४ डाव बरोबरीत सोडविले. आनंद तिसºया फेरीत अझरबैजानच्या शखरियार मामेदयारोव्हकडून पराभूत झाला होता. आनंदने इयान नेपोमनियाच्ची, अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक, रशियाच्या हॉनिल दुबोल व अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा यांना नमविले.

  • ग्रिसचुकविरुद्धची लढत आनंदसाठी महत्त्वपूर्ण ठरली. या विजयामुळे त्याचे जेतेपद निश्चित झाले. अव्वल दहा बुद्धिबळपटूंच्या राऊंड रॉबिन स्पर्धेत मामेदयारोव्ह, रशियाचा सरगेई कारजाकिन व नाकामुरा हे पाच गुणांसह संयुक्तपणे दुसºया क्रमांकावर राहिले.

  • दुबोव्ह आणि रशियाचा ब्लादिमीर क्रॅमनिक यांनी प्रत्येकी चार गुण संपादन केले. रशियाचा पिटर स्विडलर आणि नेपोमनियाच्ची ही जोडी नवव्या क्रमांकावर राहिली. आनंदने दोन महिन्यांपूर्वी रियाधमध्ये जागतिक जलद विजेतेपद संपादन केले होते. विश्वनाथन आनंद आता ब्लिट्झ स्पर्धेत जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने सहभागी होईल.

जगातील टॉप 5 सैन्यात इंडियन आर्मी, पाकिस्तान आसपासही नाही :
  • नवी दिल्ली - जगातील विविध देशांच्या सैन्य क्षमतेचे सर्वेक्षण करुन, कुठल्या देशाच्या सैन्याचा कितवा क्रमांक लागतो त्याची एक जागतिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 133 देशांच्या सैन्य दलांमध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे अमेरिका, रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. भारताचा शेजारी पाकिस्तान या ग्लोबल फायरपावरच्या यादीत 13 व्या स्थानावर आहे. 

  • भारताने या यादीत पहिल्या पाचमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मागच्याचवर्षी पाकिस्तानने या लिस्टमध्ये पहिल्या 15 मध्ये प्रवेश केला होता. फ्रान्स, यूके, जापान, टर्की आणि जर्मनी हे देश सुद्धा पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत. चीनने रशियाला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे. चीनकडे आजच्या घडीला रशियापेक्षा जास्त फायटर विमाने आणि जहाजे आहेत. एकूण 50 निकषांचा अभ्यास करुन हे क्रमांक देण्यात आले आहेत. 

  • लष्करी,नैसर्गिक स्त्रोत, भौगोलिक वैशिष्ट्य, संरक्षण उद्योग आणि सैनिक संख्या यांचा आढावा घेण्यात आला आहे. जीएफपीच्या सर्वेक्षणानुसार भारताकडे 42 लाख 7 हजार 240 सशस्त्र सैनिक आहेत. तेच चीनकडे 37 लाख 12 हजार 500 सशस्त्र सैनिक आहेत. पण चीनचे 22 लाख 60 हजार सैन्य सक्रिय आहे तर भारताकडे 13 लाख 62 हजार 500 सैनिक सक्रिय आहेत. 

  • कोणाकडे किती अणवस्त्रे आहेत त्याची माहिती घेतलेली नाही. पण अणवस्त्र क्षमतेला काही गुण दिले आहेत. अर्थसंकल्पामध्ये भारताच्या तुलनेत चीनची संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद तीनपट जास्त आहे. तेच पाकिस्तानशी तुलना करता काही अपवाद वगळता भारत सर्वच आघाडयांवर सरस आहे. 

मेघालय : कॉनरॅड संगमा यांच्यापुढे आघाडी सांभाळण्याचेच आव्हान :
  • शिलाँग -  मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची संधी गेली आणि आता दुस-या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री होत आहेत.

  • त्यांच्या पक्षाचे १९ जण विजयी झाले आहेत. या निवडणुकीत मेघालयात कोणालाच बहुमत नसल्याने कानरॅड संगमा यांचा एनपीपी, भाजपा, यूडीपी, पीडीएफ, हिल्स स्टेट पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी व एक अपक्ष अशा आघाडीचे सरकार बनणार आहे.

  • ही मोट बांधण्याचे काम भाजपानेच केले. कॉनरॅड संगमा यांना ३४ आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र ही आघाडी सांभाळणे सोपे नाही, याची कल्पना कॉनरॅड यांनाही आहे. त्यांनी ते बोलूनही दाखवले आहे.

चीनची दादागिरी रोखण्यासाठी हे दोन 'कट्टर शत्रू' आले एकत्र :
  • दानांग - दक्षिण चीन समुद्रातील चीनचा विस्तार आणि दादागिरी रोखण्यासाठी अमेरिका आणि व्हीएतनाम हे दोन देश जुनं शत्रूत्व विसरुन जवळ येत चालले आहेत. अमेरिकेची कार्ल व्हिन्सन ही विमानवाहू युद्धनौका सोमवारी व्हिएतनामच्या दानांग शहरातील बंदरात येणार आहे. व्हिएतनाम युद्धाच्या समाप्तीनंतर प्रथमच अमेरिकन युद्धजहाज व्हिएतनामला येत आहे. 

  • अमेरिकेचे जवळपास 5 हजार नौसैनिक व्हिएतनामला येत आहे. या युद्धजहाजासोबत क्रुझर आणि डिस्ट्रॉयरही येणार आहे. 1975 साली व्हिएतनाम युद्धाची समाप्ती झाली. दक्षिण चीन सागरासंबंधी आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय मान्य करायला चीन तयार नसून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला हक्क सांगत आहे. या समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे चीनला या भागात जास्त रस आहे. 

  • इथे चीनने अनेक कृत्रिम बेटे उभारली आहेत. त्यामुळे व्हिएतनामच्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण झाला आहे. चीन एकप्रकारे  पश्चिम पॅसिफिक सागरातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. त्यामुळे अमेरिकेने या भागातील सक्रियता वाढवली आहे.

  • अमेरिकेच्या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट ही या दोन देशातील वैरत्वाची भावना संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. चीनचा धोका ओळखून दोन्ही देशांनी संरक्षण संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. 

ऑस्करचा 'चौकार' मारणाऱ्या 'शेप ऑफ वॉटर'ची आगळीवेगळी कथा :
  • कॅलिफोर्निया: जगभरातील चित्रपटप्रेमींना उत्सुकता लागून राहिलेला 90 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी कॅलिफोर्नियात पार पडला. या सोहळ्यात बहुचर्चित 'शेप ऑफ वॉटर'ने यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर आणि प्रॉडक्शन डिझाईन या विभागांमध्येही 'शेप वॉटरला ऑस्कर'ने गौरवण्यात आले. 

  • शेप ऑफ वॉटरला ऑस्करच्या एकूण 13 विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती.यापूर्वी  'ऑल अबाउट इव', 'टायटॅनिक' आणि 'ला ला लँड' या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली होती.  

  • 'शेप ऑफ वॉटर'ने हे विक्रम मोडीत काढल्यामुळे या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली होती. मेक्सिकन दिग्दर्शक गिलिआर्मो डेल टोरो यांनी 'शेप ऑफ वॉटर'चे दिग्दर्शन केले आहे.

  •  एका अमेरिकन प्रयोगशाळेत काम करणारी कर्मचारी आणि अमेझॉनच्या जंगलातून पकडण्यात आलेला विचित्र प्राणी या दोन मुख्य पात्रांभोवती चित्रपटाचे कथानक फिरते. अमेझॉनच्या जंगलातून पकडण्यात आलेला हा प्राणी माणसासारखाच चालू शकतो.

  • तेव्हा एलिसा आपल्या मित्राच्या मदतीने त्याला घरी पळवून आणते आणि त्यानंतरच्या एकंदरीत घटनाक्रमाचे चित्रीकरण 'शेप ऑफ वॉटर'मध्ये करण्यात आले आहे. वेगळी मांडणी आणि दिग्दर्शन यामुळे हा फॅण्टसीपट यंदा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

  • ऑस्कर नामांकनांची यादी जाहीर झाल्यानंतर या चित्रपटावर कथाचोरीचे आरोप झाले होते. परंतु, या सगळ्यावर मात करत 'शेप ऑफ वॉटर'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला.

आकाश अंबानीचं ठरलं! 'ही' होणार देशातील सर्वात श्रीमंत घराण्याची सून :
  • मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यावर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हीरा व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्र्लोका हिच्यासोबत त्याचं वर्षअखेरीस लग्न होणार आहे. डिसेंबम महिन्यात दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. श्र्लोका ही रसेल मेहता यांची सर्वात छोटी मुलगी आहे.

  • मात्र, अंबानी आणि मेहता या दोन्ही कुटुंबियांकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, येत्या काही आठवड्यांमध्ये दोघांच्या साखरपुड्याची घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • अंबानी आणि मेहता कुटुंब एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात. आकाश आणि श्र्लोका या दोघांचं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र झालं आहे. रसेल मेहता हे रोसी ब्लू डायमंडचे प्रमुख आहेत. 

  • आकाश आणि श्र्लोका यांच्या लग्नाबाबत माहिती घेण्यासाठी मीडियाकडून अंबानी कुटुंब आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या प्रवक्त्यांना इ-मेल पाठवण्यात आला पण त्यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही. अंबानी कुटुंबाच्या जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजूनपर्यंत आकाशच्या लग्नाची किंवा साखरपुड्याची तारीख निश्चीत झालेली नाही. मेहता यांच्या रोसी ब्लू डायमंड कंपनीलाही यासंबंधी मेल पाठवण्यात आला पण त्यांच्याकडूनही उत्तर आलेलं नाही. 

दिनविशेष : 

महत्वाच्या घटना

  • १९०२: रेआल माद्रिद  फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.

  • १९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

  • १९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

  • १९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

  • १९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

  • १९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

  • १९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

  • १९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.

  • १९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द  खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.

  • २०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.

  • २००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.

जन्म

  • १८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

  • १९३७: पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.

  • १९४९:  पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.

  • १९५७: भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.

  • १९६५: भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

मृत्यू

  • १९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

  • १९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे  यांचे निधन.

  • १९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

  • १९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून१८९२)

  • १९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे  यांचे निधन.

  • १९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.

  • १९८२: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)

  • १९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२८)

  • १९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.

  • २०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.