चालू घडामोडी - ०६ मे २०१७

Date : 6 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ओबामाकेअर विधेयक अमेरिकी प्रतिनिधिगृहात नामंजूर :
  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अखेर ओबामाकेअर योजना रद्द करून त्या जागी नवीन तरतुदी असलेले विधेयक प्रतिनिधिगृहाने मंजूर केले आहे.

  • दी अमेरिकन हेल्थ केअर अ‍ॅक्ट विधेयकाने ओबामाकेअर योजनेतील बहुतेक तरतुदी रद्द झाल्या आहेत, त्यात विमा संरक्षणासाठी लोकांना अनुदाने, मेडिकेडचा विस्तार, लोकांना विम्यासाठी कर लागू करणे या तरतुदींचा समावेश होता. ओबामाकेअर विधेयकावर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी २३ मार्च २०१० रोजी स्वाक्षरी केली होती.

  • ओबामाकेअर रद्द करताना आता दी अमेरिकन हेल्थ केअर अ‍ॅक्ट हे नवीन विधेयक २१७ विरुद्ध २१३ मतांनी मंजूर करण्यात आले.

  • ट्रम्प यांनी आधीचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ओबामाकेअर योजनेला कडाडून विरोध केला होता व सत्ता मिळाल्यास ही योजना रद्द करण्याचे जाहीर केले होते.

  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या एकाही सदस्याने नवीन विधेयकास पाठिंबा दिला नसून काही रिपब्लिकन सदस्यांनीही या विधेयकाला विरोध केला आहे. 

भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले : 
  • न्यूझीलंडकडून डोमेनिक न्यूमेनने ३० व्या मिनिटाला, तर ५८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर रसेलने गोल केला.

  • मलेशियाने सुमार कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी संघावर १-० गोलने विजय मिळवला असून पराभवामुळे भारतीय हॉकी संघ सलग दुसऱ्या वर्षी सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला.

  • आॅस्ट्रेलियाने ९ वेळा सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे, तर ग्रेट ब्रिटन तब्बल २३ वर्षांनंतर अंतिम फेरीत खेळणार आहे. याआधी ब्रिटनने १९९४ मध्ये एकदा विजेतेपद पटकावले होते.

  • अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला मलेशियावर २ गोल फरकाने विजय मिळवणे आवश्यक होते. त्याआधी सकाळी ग्रेट ब्रिटनने न्यूझीलंडचा ३-२ गोलने पराभव केला; परंतु भारतीय संघ अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही आणि पराभूत झाला.

  • तत्पूर्वी, ब्रिटनने त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात केली. ब्रिटनकडून सॅम वाडने नवव्या मिनिटाला, फिल रोपरने ३९ व्या मिनिटाला आणि मार्क ग्लेनहोर्गने ४९ व्या मिनिटाला गोल केले.

फेसबुकवर 'त्या' पोस्ट टाकताय... सावधान!
  • फेसबुकवरील गैरप्रकार रोखण्यासाठी ०३ हजार लोकांचा सेन्सॉर बोर्ड नेमल्याचं खुद्द सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने सांगितलं असून गैरप्रकार टाळण्यासाठी आता फेसबुकनेही सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आहे.

  • अनेक नेटीझन्स फेसबुकवर भावना भडकवणारे पोस्ट, अश्लील व्हिडीओ पोस्ट करतात. याशिवाय नुकत्याच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेलं आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह, या सर्व घटनांचा धसका घेऊन फेसबुकने तब्बल ३००० जणांचा सेन्सॉर बोर्ड बनवला आहे.

  • ११ महिन्याच्या मुलीला गळफास, लाईव्ह पाहून फेसबुकही हादरलं “त्यामुळे यापुढे जर आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा पोस्ट फेसबुकवर टाकल्या तर त्याचं अलर्ट सेन्सॉर बोर्डाला मिळेल. जर ती पोस्ट किंवा व्हिडीओ आक्षेपार्ह असेल तर अशा पोस्ट फेसबुकवर अपलोडच होणार नाहीत,” असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं.

  • सामूहिक बलात्काराचं फेसबुक लाईव्ह, तिघांना अटक जगभरातील लोक एकमेकांशी जोडले जावेत, मतांची, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जगभरातील घडामोडींची माहिती मिळावी, यासाठी फेसबुकची निर्मिती झाली होती. धार्मिक विधानं करुन भावना भडकावतात. 

स्थानिक निवडणुकीत हुजूर पक्षाची आघाडी : 
  • इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये सत्तारूढ हुजूर पक्षाने ४० वर्षांत प्रथमच आघाडी घेतली. हुजूर पक्षाने ५०० पेक्षा जास्त जागा जिंकून ११ नगर परिषदांवर सत्ता काबीज केली.

  • या निवडणुकांमध्ये मजूर पक्षाचा मोठा पराभव झाला असून, हुजूर पक्षाला ३८, मजूर पक्षाला १८ टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

  • इग्लंडच्या पंतप्रधान थॅरेसा मे यांनी जूनमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत हुजूर पक्षाच्या विजयासाठी लढत राहाणार असल्याचे म्हटले आहे.

श्रीहरीकोटातून इस्रोच्या ‘नॉटी बॉय’ रॉकेट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण :
  • जीसॅट-०९ च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे. उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’च्या या कामगिरीचे कौतुक केलं.

  • श्रीहरीकोटातून इस्रोच्या ‘जीसॅट-9’चं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. हे रॉकेट सार्क देशांचा खास उपग्रह घेऊन अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं असून नॉटी बॉय नावानंही हे रॉकेट ओळखलं जातं.

  • भारताकडून आपल्याला कोणतीही ‘भेट’ घेण्याची इच्छा नाही, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. या उपग्रहामुळे दूरसंचार आणि प्रसारणाशी संबंधित सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनास सहकार्य शक्य होईल.

  • सार्क देशांसाठी उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. सार्क देशांतील आठपैकी सात सदस्य या प्रकल्पाचा भाग आहेत. पाकिस्तानने त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

दिनविशेष : 

जन्म, वाढदिवस

  • १८६१ मोतीलाल नेहरु : 

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन  

  • १९२२छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे राजर्षी : 

  • १९५२मारिया मॉंटेसरी, पूर्व-प्राथमिक शिक्षणपध्दतीसाठी प्रयत्न करणाऱ्या इटालियन शिक्षणतज्ज्ञ : 

ठळक घटना 

  • --

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.