चालू घडामोडी - ०६ नोव्हेंबर २०१७

Date : 6 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगातील सगळ्यात मोठे विमानतळ बीजिंगमध्ये :
  • बीजिंग : जगातील सगळ्यात मोठे विमानतळ ‘बीजिंग न्यू एअरपोर्ट’ चीनमध्ये २०१९मध्ये वापरात येईल. या विमानतळाच्या बांधकामासाठी ८० अब्ज युआन (९.१ अब्ज पौंड) खर्च आला आहे. विमानतळाचा आकार अतिप्रचंड आकाराच्या फुलासारखा असून, ते दक्षिण डॅक्सिंग जिल्ह्यात आहे.

  • हे विमानतळ चायना सदर्न एअरलाइन्स आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या विमानांसाठी तळ म्हणून वापरले जाईल. या तळामुळे दोन उड्डाणांदरम्यान प्रवाशांना सहजपणे प्रवेश मिळेल. त्याची क्षमता जास्तीतजास्त १०० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची अपेक्षित आहे. तथापि, पहिल्या टप्प्यात दरवर्षी ७२ दशलक्ष प्रवाशांना तेथे सेवा मिळेल.

  • विमानतळाच्या इमारतीचा नकाशा दिवंगत झाहा हादीद यांनी तयार केला असून, विमानतळावर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणेही हाताळली जातील.

  • ५२ हजार टन पोलाद आणि सुमारे १.६ दशलक्ष क्युबिक मीटर्स काँक्रिट त्यासाठी वापरण्यात आले आहे. विमानतळाच्या सांगाड्याचा विस्तार ४७ चौरस किलोमीटर आहे. (source : lokmat)

केंद्र सरकारचे वार्ताकार दिनेश्वर शर्मा आजपासून जम्मू-काश्मीर दौ-यावर :
  • नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण प्रस्थापित व्हावे तसेच लोकभावना समजून निर्णय घेता यावेत, यासाठी केंद्र सरकारने नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा यांचा आजपासून जम्मू- काश्मीर दौरा सुरू झाला आहे. 

  • इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख असणारे दिनेश्वर शर्मा या दौ-यामध्ये विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना व तसेच इतर महत्त्वाच्या लोकांची भेट घेऊन राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतील. मात्र ते हुर्रियतशी चर्चा करणार का?, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

  • जाँईँट रेझिस्टन्स लिडरशिपचे सदस्य सय्यद अली गिलानी, मीरवाइज उमर फारुख आणि यासीन मलिक यांनी दिनेश शर्मा यांच्याशी चर्चा करण्याची करण्याची शक्यता फेटाळली आहे.

  • शर्मा यांनी मात्र आपला पहिला दौरा केवळ पुढील कामाचा आराखडा तयार करणे व राज्यातील वस्तुस्थिती जाणून घेणे यासाठीच असेल असे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. 'मला आधी लोकांना भेटू द्या, त्यांच्या भावना समजू द्या', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. (source :lokmat)

पॅराडाईज पेपर्स: अमिताभ बच्चन, जयंत सिन्हा, मान्यता दत्त अडचणीत :
  • ‘पनामा पेपर्स’मुळे जगभरातील श्रीमंतांची करचोरी आणि काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग उजेडात आल्यानंतर आता ‘पॅराडाईज पेपर्स’ प्रकरणामुळे जगभरात भूकंप झाला आहे.

  • यामधून भारतसह जगभरातील अनेक बडे नेते, उद्योगपती, कलाकारांची नावे पुढे आली आहेत. यामध्ये भारतातील ७१४ जणांचा समावेश आहे. भारतातील अनेक बड्या कंपन्या आणि श्रीमंती व्यक्ती यांची करचोरी ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आली आहे.

  • जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जगातील ९६ नामांकित माध्यमसमूहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. यामध्ये भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’चा समावेश होता.

  • कर बुडवेगिरी करुन तो पैसा देशाबाहेरील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणाऱ्या भारतीय व्यक्तींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम ‘इंडियन एक्स्प्रेस’ने पार पाडले. यासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीला १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला.

  • यातील सर्वाधिक कागदपत्रे ही अॅपलबाय या विधीविषयक संस्थेशी संबंधित आहेत. ११९ वर्षे जुनी असलेली ही कंपनी म्हणजे वकील, अकाऊंटंट्स, बँकर्स आणि अन्य लोकांचे एक मोठे नेटवर्क आहे. (source :loksatta)

गोवा : माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या टीकेनंतर भाजपामध्ये अस्वस्थता, कोअर टीमची लवकरच बैठक :
  • पणजी : भाजपाचे नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विद्यमान ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा या दोघांनीही जाहीरपणे टीकेचा सूर लावल्यानंतर गोवा भाजपामध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर याच आठवड्यात पक्षाच्या कोअर टीमची बैठक बोलवावी, असे ठरवण्यात आले आहे.

  • नोकर भरती रद्द करण्याच्या विषयावरून माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर नुकतीच जोरदार टीका केली. आपल्या सरकारच्या काळात जी नोकर भरती सुरू करण्यात आली होती, ती आता विद्यमान पर्रीकर सरकार रद्द करतेय, असा पार्सेकर यांचा समज झाला आणि पार्सेकर यांनी सरकारवर जाहीरपणे प्रथमच हल्ला चढवला. यामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे. 

  • जे गेल्यावर्षी मुख्यमंत्रीपदी होते, अशा ज्येष्ठ नेत्याने केलेला हल्ला हा गोव्यातील भाजपासाठी प्रथमच अनुभव होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वत: यामुळे अस्वस्थ झाले.

  • भाजपाच्या कोअर टीमचे पदाधिकारी दत्ता खोलकर याना पर्रीकर यांनी पार्सेकर यांच्याशी बोलण्यास सांगितले व त्यानुसार खोलकर हे पार्सेकर यांच्याशी बोलले पण त्यांची नाराजी खोलकर दूर करू शकलेले नाहीत.(source :lokmat)

लायकाच्या प्रवासाची 60 वर्षे; अंतराळात जाणारा पहिला प्राणी :
  • मॉस्को- अंतराळामध्ये जाणारा पहिला जिवंत प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायकाला अंतराळात पाठवून 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. अंतराळविज्ञानात वेगाने झेप घेणाऱ्या रशियामध्ये लायका या श्वानाला स्पुटनिक-2 या यानामधून पाठविण्यात आले होते.

  • 3 नोव्हेंबर 1957 रोजी लायकाला स्पुटनिकमधून पाठविण्यात आले होते. तिला यानामध्ये बसवून पाठविल्यानंतर काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला होता. रशियाचे तत्कालिन सर्वेसर्वा निकिटा ख्रुश्चेव्ह यांनी अंतराळविज्ञानाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले होते.

  • लायकाला शोधणाऱ्या आदिल्या कोतोवस्काया यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितले,  "अंतराळ मोहिमेत पाठविण्यासाठी रशियामधील रस्त्यांवर कुत्र्यांचा शोध घेण्यात आला होता. त्यामध्ये लायकाने सर्व निकष पूर्ण केले त्यामुळेच तिची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. फोटोजेनिक, विनम्र आणि युक्तीबाज अशा या श्वानाची तात्काळ निवड करण्यात आली.

  • " आपल्या मृत्यूची जाणिव झाल्यासारखी ती फोटोत गोंधळल्यासारखी दिसायची असे सांगत 90 वर्षिय आदिल्या म्हणाल्या," स्पुटनिकमध्ये बसवून पाठविण्यापुर्वी मी अत्यंत भावनिक झाले होते. मी तिला आम्हाला माफ कर असे सांगितले आणि रडले होते." 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

  • १८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.

  • १९१२: भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

  • १९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.

  • १९९६: अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

  • १९९९: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.

  • २००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • २०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

जन्म दिवस

  • १८३९: प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ भगवादास इंद्रजी यांचा जन्म.

  • १८६१: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९)

  • १८८०: निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७)

  • १८९०: कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्म.

  • १९०१: जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत श्री. के. क्षीरसागर यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

  • १९१५: चित्रपट कथाकार, दिगदर्शक दिनकर द. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २००५)

  • १९२६: पत्रकार,कथाकार,कादंबरीकार प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा मुंबई येथे जन्म.

  • १९६८: याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.

मृत्यू

  • १७६१: मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन.

  • १८३६: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १७५७)

  • १९८७: मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक, लेखक आणि पीडीए (प्रोग्रेसिव डॅूमॅटिक असोसिएशन) चे संस्थापक प्रा.भालबा केळकर यांचे पुणे इथे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९२०)

  • १९९२: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांचे पुणे इथे निधन. (जन्म: ६ डिसेंबर१९१६)

  • १९९८: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)

  • २००२: स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.

  • २०१०: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.