चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जून २०१९

Date : 7 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चीनची ‘५जी’ उडी :
  • चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर तणावपूर्ण संबंध आहेत. या पाश्र्वभूमीवर जगात अतिवेगवान वायरविहिन जाळे तयार करण्यात आघाडी घेण्याची चीनची महत्त्वाकांक्षा दिसून येत आहे.

  • चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमआयआयटी) चीन टेलिकॉम, चीन मोबाइल, चीन युनिकॉम आणि चीन रेडिओ आणि टेलिव्हिजन या कंपन्यांना ‘५जी’चे व्यापारी परवाने दिले आहेत.

  • ५जी हे अत्यंत प्रगत दूरसंपर्क तंत्रज्ञान आहे. सध्याच्या ४जी एलटीई तंत्रज्ञानापेक्षा त्याचा डाऊनलोडचा वेग हा १० ते १०० पट असल्याचे सांगितले जाते. डाऊनलोड-अपलोडच्या या वेगासोबतच अधिक व्यापक क्षेत्रात पोहोच आणि अधिक स्थिर जोडणी, ही या तंत्राची वैशिष्टय़े आहेत.

  • चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘५जी’ जाळ्याच्या सर्वागीण वापराने औद्योगिक उत्पादन, इंटरनेटने जोडलेल्या कार, आरोग्यसेवा, स्मार्ट शहरांचे व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या विकासाला मदत होणार आहे.

  • चीनचे उद्योक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री मियाओ वी यांनी सांगितले की, ५जी तंत्रज्ञानामुळे वेगवान मोबाइल सेवा, सुरक्षित आणि व्यापक अशी प्रगत माहिती सुविधा निर्माण होईल.

दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही - SSC Result
  • मुंबई : 'दहावीचा निकाल आज जाहीर होणार' असा मेसेज रोजच सोशल मीडियावर वाचायला मिळत असल्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. आधीच गॅसवर असलेले विद्यार्थी दररोज उठणाऱ्या अफवांमुळे बुचकळ्यात बडलेले आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात एसएससी बोर्डाकडून निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

  • बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावी एसएससी बोर्डाचा निकाल सात जूनला जाहीर होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वायरल झाल्या आहेत, मात्र दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

  • सोशल मीडियावर जुन्या लिंक पाठवून अफवा पसरवल्या जात आहेत. निकालाच्या तारखेबाबत गेल्या वर्षीच्या 'एबीपी माझा'च्या बातम्यांचे व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवले जात आहेत. मात्र त्यामध्ये तथ्य नसून व्हिडिओची तारीख तपासून मगच त्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन 'माझा'तर्फे करण्यात येत आहे.

  • दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. बोर्डाच्या वेबसाईटवर यासंदर्भात अधिकृत माहिती आणि तारीख उपलब्ध होईल.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडग्यासाठी दिल्लीवारीत मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न :
  • नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.

  • डॉ. हर्ष वर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने एक विनंतीपत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी सादर केलं. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या 813 जागा, तर पदवी शाखांमध्ये 1740 जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्याचं आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलं.

  • दुष्काळी उपाययोजनांची दिली माहिती - भाजपाध्यक्ष अमित शाह यांचीही देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी त्यांना दिली.

विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी निवृत्त होणार :
  • नवी दिल्ली : देशातल्या सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी 30 जूलै रोजी निवृत्ती घेणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा मुलगा रिशद हा विप्रोची कमान सांभाळणार आहे. वयाच्या 21 व्या वर्षी या कंपनीची जबाबदारी अझीम यांच्या खांद्यावर पडली होती. गेल्या 53 वर्षात प्रेमजी यांनी विप्रोचा व्यवसाय 7 कोटींवरुन 83 हजार कोटी रुपयांवर नेला आहे.

  • कधी काळी वणस्पती तेल आणि साबणांची निर्मिती करणारी विप्रो ही कंपनी आज आयटी, एफएमसीजी क्षेत्रातली दिग्गज कंपनी मानली जाते. 1970 साली प्रेमजी यांनी साबण आणि तेल सोडून सॉफ्टवेअरकडे स्वतःचे लक्ष वळवले. त्यानंतर त्यांनी परत कधीच मागे वळून पाहीलेच नही.

  • विप्रोने गुरुवारी जाहीर केले की, प्रेमजी 30 जूलै रोजी कार्यकारी संचालक पदावरुन निवृत्ती घेणार आहेत. दरम्यान, 31 जुलैपासून पुढील पाच वर्षांसाठी ते कंपनीमध्ये गैर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील.

  • 1966 मध्ये प्रेमजी यांच्या वडिलांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यावेळी 21 वर्षांचे प्रेमजी स्टेनफोर्ड विद्यापीठामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग करत होते. परंतु वडिलांच्या मृत्यूमुळे प्रेमजी शिक्षण अर्थवट सोडून भारतात आले. सुरुवातीला त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी वडिलांचा व्यवसाय बंद करुन घर सांभाळण्यासाठी नोकरी करण्याचा सल्ला दिला. परंतु प्रेमजी यांनी सर्वांना चुकीचे सिद्ध केले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने बनवले सहा विक्रम :
  • लंडन : टीम इंडियाने बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल. रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे (4/51) भारताने विश्वचषकात दमदार सुरुवात केली. रोहितच्या शतकामुळे भारताने आफ्रिकेचे 228 धावांचे लक्ष्य पार केले.

  • काल झालेल्या सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतले 23 वे शतक ठोकले. रोहितने 144 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 122 धावा चोपल्या. या सामन्यात रोहितने तब्बल सहा विक्रम स्वतःच्या नावावर केले.

  • १. भारतातर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहितने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 22 शतकांचा विक्रम रोहितने काल मोडला. सचित तेंडुलकर (49 शतके) आणि कर्णधार विराट कोहली (41 शतके) या दोघांनंतर रोहितचा तिसरा क्रमांक आहे.

  • २. रोहितने 128 चेंडूत शतक पूर्ण केले. 'हिटमॅन' रोहित वेगवान धावा करणारा फलंदाज आहे. परंतु कालच्या सामन्यातले शतक हे रोहितच्या कारकिर्दीतले सर्वात धिम्या गतीने केलेले शतक ठरले आहे.

  • ३. रोहितचे शतक हे विश्वचषक स्पर्धेतले भारतीय खेळाडूने केलेले 26 वे शतक ठरले आहे. या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 26 शतकांशी बरोबरी केली आहे.

  • ४. 12 हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा 9 भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत अनुक्रमे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, एमएस धोनी, विरेंद्र सहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनील गावस्कर यांचा समावेश आहे.

  • ५. विराटची 122 ही धावसंख्या विश्वचषक स्पर्धेतली कोणत्याही भारतीय खेळाडूची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरने 127 धावा केल्या होत्या.

  • ६. विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना रोहितने केलेले हे शतक भारतीय फलंदाजांने केलेले चौथे शतक ठरले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

  • १९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.

  • १९६५: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.

  • १९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.

  • १९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.

  • १९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.

  • १९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

  • १९९१: फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.

  • १९९४:आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

  • २००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.

  • २००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

जन्म 

  • १८३७: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

  • १९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)

  • १९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन१९८७)

  • १९१७: अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)

  • १९४२: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)

  • १९७४: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२१: रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन.

  • १९५४: ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन. (जन्म: २३ जुन १९१२)

  • १९७०: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

  • १९७८: नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.

  • १९९२: मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)

  • १९९२: नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)

  • २०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)

  • २००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.