चालू घडामोडी - ०७ मे २०१७

Date : 7 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताला कांस्यपदक : न्यूझीलंडवर ४-० असा दणदणीत विजय : 
  • न्यूझीलंडवर ४-० असा दणदणीत विजय; रुपिंदर पालचे दोन, तर सुनील व तलविंदर यांचा प्रत्येकी एक गोल.

  • मलेशियाकडून पराभूत झाल्यानंतर जेतेपदाच्या शर्यतीतून बाद झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठीच्या लढतीत न्यूझीलंडचा ४-० असा धुव्वा उडवून कांस्यपदकाची कमाई केली. रुपिंदर पाल सिंगने (१७व्या व २७व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले, तर एस. व्ही. सुनील (४८ मि.) आणि तलविंदर सिंग (६० मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून चांगली साथ दिली.

  • पहिल्याच मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु हरमनप्रीत सिंगने टोलवलेला चेंडू न्यूझीलंडच्या खेळाडूच्या पायावर आदळला आणि भारताला आणखी एक संधी मिळाली.

  • भारताला आघाडी घेण्यात अपयश आले असून पुढच्याच क्षणी मनदीप सिंगने चपळ खेळ करत प्रतिस्पर्धीच्या वर्तुळावर आक्रमण केले. मात्र न्यूझीलंडच्या रिचर्ड जॉयसने त्याला गोल करण्यापासून रोखले.

मराठी मुलगी आइन्स्टाइनहून प्रज्ञावान : राजगौरी पवार
  • इंग्लंडमध्ये राहणाऱ्या राजगौरी पवार या १२ वर्षांच्या मराठी मुलीने अलिकडेच झालेल्या ‘ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्ट’मध्ये ज्यांना ‘जिनियस’ म्हणून ओळखले जाते त्या अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टिफन हॉकिंग या दोन थोर वैज्ञानिकांहूनही दोन अधिक अंक मिळविले असून याबद्दल तिला ‘मेन्सा’ या प्रतिष्ठित सोसायटीचे सदस्यत्व देऊ करण्यात आले आहे.

  • राजगौरीला मिळालेले १६२ अंक हे आइन्स्टाईन व स्टिफन हॉंिकंग यांच्या ‘आयक्यू’हून दोनने जास्त आहेत.

  • गेल्या महिन्यात मॅन्चेस्टर येथे झालेल्या ‘ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्ट’मध्ये राजगौरीने १८ वर्षांखालील स्पर्धकासाठी मिळू शकणारे कमाल १६२ अंक मिळविले. राजगौरी चेशायर कौंटीची रहिवासी आहे.

  • राजगौरी चेशायरमधील अर्ल्टिंन्चॅम गर्ल्स ग्रामर स्कूलमध्ये शिकत असून तिचे  वडील सुरजकुमार पवार व्यवसायाने डॉक्टर आहेत.- राजगौरी पवार

  • शिक्षकांचे प्रयत्न आणि शाळेत तिला दररोज मिळणाऱ्या पाठिंब्यामुळेच राजगौरी हे यश मिळवू शकली. -डॉ. सुरजकुमार पवार, राजगौरीचे वडील

  • आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. राजगौरी सर्वांचीच लाडकी आहे व तिच्याकडून आणखीही महान गोष्टींची अपेक्षा आहे. -अ‍ॅन्ड्रयू बॅरी, राजगौरीचे गणित शिक्षक

मोदीच काश्मीरचे तारणहार : 
  • जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड जनादेश मिळाला असल्यामुळे केवळ तेच काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, असे सांगून जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांना काश्मीर खोऱ्याला दलदलीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले.

  • आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या राजवटीदरम्यान पूर्वीच्या रालोआ सरकारने जम्मू-काश्मीरसाठी आखलेले धोरण कायम ठेवण्यात यूपीए सरकार अपयशी ठरल्याने लोकांच्या मनात जो संताप साठलेला होता,

  • जम्मू-काश्मीरच्या समस्येवर जर कुणी तोडगा शोधू शकणार असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत.

  • २५ डिसेंबर २०१५ रोजी लाहोरला स्वत:हून भेट देण्याचा मोदी यांचा निर्णय कमकुवतपणाचा नव्हे, तर ताकदीचा निदर्शक होता असे सांगून त्यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाची प्रशंसा केली.

  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात पाकिस्तानला भेट देण्याचे धैर्य नव्हते, असा टोलाही त्यांनी हाणला.

'बाहुबली'ने अमेरिकेत रचला नवा रेकॉर्ड : 

  • 'बाहुबली 2' या सिनेमाची जादू केवळ भारतातच नाही तर सात समुद्रापारही पाहायला मिळत असून एकट्या अमेरिकेत १०० कोटींची कमाई करणारा बाहुबली हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला आहे.

  • 'बाहुबली 2' हा बहुप्रतिक्षित सिनेमा २८ एप्रिलला प्रदर्शित झाला. अखेर दोन वर्षांनंतर प्रेक्षकांना बाहुबलीने कटप्पाला का मारलं याचं उत्तर मिळत आहे. बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

  • बाहुबली चित्रपटामुळे निर्मात्यांना प्रचंड फायदा झाला असून छोट्या मोठ्या उद्योजकांसाठीही बाहुबली चित्रपट फायद्याचा ठरला आहे.

  • बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत रोज यशाचे नवे शिखर गाठणारा हा चित्रपट १००० कोटींहून जास्त कमाई करेल असा अंदाज समीक्षकांनी लावला आहे. एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या भव्यदिव्य चित्रपटाच प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती, तमन्न, सत्यराज यांनी मुख्य भूमिका निभावल्या आहेत. 

  • 'बाहुबली' मधील कलाकारांचं मानधन किती ? घ्या जाणून-

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपिस्ट खंडणी प्रकरणी अटकेत :
  • पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या महेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे. वाळू ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्याचा सावंत यांच्यावर आरोप आहे.

  • विशेष म्हणजे रामदास कदम यांनीच महेश सावंत यांना मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात दिले असून गुरुवारी महेश सावंतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

  • महेश सावंत यांनी दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन विदर्भातील एका व्यावसायिकाला कारवाई टाळण्यासाठी खंडणी देण्याची मागणी सावंतांनी केल्याचं म्हटलं जातं.

  • सावंत यांनी खंडणी मागितल्याची माहिती शिवसेना विभाग प्रमुखांनी कदम यांना दिली होती. त्यानंतर फोन टॅप करुन कदम यांनी याविषयी माहिती मिळवली. मलबार हिल पोलिसांना बोलावून सावंतांविरोधात पुरावे देण्यात आले. त्यानंतर महेश सावंतांना पोलिसांनी अटक केली.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • रेडियो दिन : रशिया

जन्म, वाढदिवस

  • कविसम्राट रवींद्रनाथ टागोर : ०७ मे १८६१

  • डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक; भारतरत्‍न : ०७ मे १८८०

  • आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक : ०७ मे १९२३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या : ०७ मे २००२

ठळक घटना

  • मुंबईमध्ये विजेच्या शक्तीवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु झाली : ०७ मे १९०७

  • पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन म्हणजे आताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले : ०७ मे १८७८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.