चालू घडामोडी - ०७ मे २०१८

Date : 7 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
यूपीएससी टॉपरला अवघे ५५ टक्के मार्क्स :
  • नवी दिल्ली : यंदाच्या भारतीय संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या हैदराबादच्या डुरीशेट्टी अनुदीप या टॉपरला अवघे ५५.६ टक्के मार्क मिळाले आहेत.

  • यूपीएससीची मुख्य परीक्षा १७५0 मार्कांची आहे तर मुलाखतीसाठी २७५ पैकी गुण दिले जातात. अनुदीपला २0२५ पैकी ११२६ म्हणजे ५५.६ टक्के प्राप्त झाले आहेत. त्याची विभागणी मेन्समध्ये ९५0 व मुलाखतीत १७६ मार्क्स अशी आहे. दुसºया क्रमांकावरील अनुकुमारीला अनुदीपपेक्षा अवघे २ मार्क कमी म्हणजे ११२४ मार्क्स तर तिस-या क्रमांकावरील सचिन गुप्ताला ११२२ मार्क मिळाले आहेत.

  • विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या टॉपरला ११२0 माकर््स होते. सर्वसाधारण व राखीव कोट्यातल्या मार्कांचे अंतरही यंदा कमी झाले. सर्वसाधारण वर्गाचे कट आॅफ मार्क्स १00६, ओबीसीचे ९६८ तर एसीएसटीचे ९४४ होते. विशेष म्हणजे, पहिल्या २0 क्रमांकांमध्ये केवळ एक दिल्ली महानगरातला आहे, बाकी सारे छोट्या शहरातले आहेत.

नीट परीक्षेआधी विद्यार्थ्यांनी दिली सेक्युरिटी टेस्ट :
  • कोणत्याही प्रकारची स्टेशनरी सोबत न्यायची नाही. स्वत:चा पेन नाही. प्लास्टिक पाऊच नाही. कोणते कपडे घालून यायचे याचाही नियम. वॉलेट, गॉगल एवढेच काय पँटला बेल्टही लावून जायचा नाही... या नियमांच्या कसोटीचा सामना करत जवळपास १३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आज नीट परीक्षेआधी ‘सेक्युरिटी टेस्ट’चा सामना करावा लागला.

  • विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहे का? कानात किंवा केसांमागे ब्लू टूथ आहे का? कोणते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सोबत आहे का? अशा प्रकारच्या तपासण्यांचा सामना विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच करावा लागला.

  • विद्यार्थ्याच्या वडिलांचा मृत्यू - केरळमध्ये नीट परीक्षेसाठी आलेल्या तामिळनाडूच्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा परीक्षा केंद्राबाहेर मृत्यू झाला. मुलगा आत पेपर सोडवत असताना बाहेर बसलेल्या वडिलांना हार्ट अटॅक आला. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मुलाला ३ लाखांची मदत जाहीर केली.

सलमान खान जोधपूरमध्ये, काळवीट शिकारप्रकरणी आज सुनावणी :
  • जयपूर: काळवीट शिकारप्रकरणी दोषी सलमान खानला सुनावण्यात आलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेविरोधात, आज जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यासाठी अभिनेता सलमान खान आज जोधपूर सत्र न्यायालयात हजर राहणार आहे. सलमान कालच जोधपूरकडे रवाना झाला.

  • जोधपूर सत्र न्यायालयाने काळवीटांच्या शिकार प्रकरणी 5 एप्रिल रोजी सलमानला दोषी ठरवलं होतं. त्याला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दोन रात्री तुरुंगात घालवल्यानंतर सलमान तिसऱ्या दिवशी जामीनावर बाहेर आला.

  • काळवीट शिकारप्रकरणी सलमानला सुनावल्या गेलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी मागणी सलमानच्या वकिलांकडून करण्यात आली आहे.

  • सलमान रविवारी 1.30 च्या सुमारास जोधपूरला पोहोचला. सलमानसोबत त्याचे मित्र काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी, बहिण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेरा आहेत. मागील सुनावणीत सलमानसोबत त्याच्या दोन्ही बहिणी अलवीरा आणि अर्पिताही उपस्थित होत्या.

निर्माता, दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांचे निधन :
  • मुंबई : ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या १९६० साली बनविलेल्या चित्रपटात भूमिका देऊन अभिनेता धर्मेंद्र यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले करणारे या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता अर्जुन हिंगोरानी यांचे उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे शनिवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.

  • अर्जुन हिंगोरानी यांच्या निधनाबद्दल धर्मेंद्र यांनी शोक व्यक्त केला आहे. हिंगोरानी व धर्मेंद्र एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. धर्मेंद्र यांनी अर्जुन हिंगोरानी यांच्या बरोबरचे एक कृष्णधवल छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर झळकवून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • धर्मेंद्र यांनी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत आलो होतो तेव्हा मी एकटा होतो. मला हिंदी चित्रपटात पहिली भूमिका अर्जुन हिंगोरानी यांनी दिली. अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना घेऊन कब, क्यूँ और कहाँ (१९७०), कहानी किस्मत की (१९७३), सल्तनत (१९८३), कौन करे कुर्बानी या चित्रपटांचे दिग्दर्शन, निर्मितीही केली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८४९: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.

  • १९४६: सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.

  • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

  • १९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.

  • २०००: व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.

  • २०००: कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.

जन्म

  • १८६१: पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१)

  • १८८०: भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९७२)

  • १९०९: पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन एच. भूमी यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९१)

  • १९२३: मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंद भेंडे यांचा आरोंदा (सिंधुदुर्ग) येथे जन्म.

मृत्यू

  • १९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

  • १९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.

  • २००१: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९०५)

  • २००१: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन. (जन्म: १३ जून १९२३ - अंबाला, पंजाब)

  • २००२: मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९१०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.