चालू घडामोडी - ०७ ऑक्टोबर २०१७

Date : 8 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार ICAN ला जाहीर १० डिसेंबर रोजी : 
  • १० डिसेंबर रोजी ओस्लो येथे या पुरस्काराचे वितरण होणार असून पुरस्काराच्या स्वरुपात ICAN ला ११ लाख डॉलर इतकी रक्कम मिळणार आहेत.

  • संपूर्ण जगातून अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय अभियान International Campaign To Abolish Nuclear Weapons (ICAN) या संस्थेला यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • नॉर्वेतील नोबेल समितीने सांगितले की, जगात अण्वस्त्रांच्या वापरामुळे होणाऱ्या विध्वंसाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याबद्दल ICAN ला हा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.

  • शांततेसाठीच्या या नोबेलसाठी पोप फ्रान्सिस, सौदीतील ब्लॉगर रैफ बदावी, ईरानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ हे देखील स्पर्धेत होते, २००७ मध्ये सुरु झालेल्या ICAN या अभियानासाठी जगातील १०१ देशांमध्ये ४६८ सहयोगी संस्था काम करीत आहेत.

  • नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीच्या सदस्या बी. आर. अँडरसन यांनी म्हटले आहे की, आपण सध्या अशा जगात आहोत ज्यावर अणुयुद्धाचे सावट असून त्यामुळे जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या ICAN संस्थेची निवड नोबेलसाठी करण्यात आली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या फेरतपास :
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या फेरतपासाची खरोखरच आवश्यकता आहे का ? गांधीजींवर नथुराम गोडसेच्या तीन गोळ्यांबरोबरच कुणा एका ‘अज्ञाता’ने चौथीही गोळी झाडल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे ? हे प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये शुक्रवारी सुनावणीस आले.

  • खंडपीठाला फार दखल घ्यावीशी वाटली नाही; पण तरीही याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अमरेंद्र शरण यांची न्यायालयाचा मित्र (अ‍ॅमिकस क्युरी) म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश दिला.

  • गांधीजींच्या हत्या प्रकरणाचा तपास नीट झालेला नाही आणि त्यांच्या हत्येमागचे खरे षड्यंत्र जगापासून दडविण्यात आल्याचा दावा करून मुंबईस्थित डॉ. पंकज फडणीस यांनी हत्येच्या फेरतपासाची मागणी करणारी विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

  • त्याची सुनावणी न्या. शरद बोबडे आणि न्या. एल. नागेश्वरराव यांच्या खंडपीठापुढे सुमारे वीस मिनिटांसाठी झाली असून हत्येच्या घटनेला (३० जानेवारी १९४८) आणि नथुराम गोडसे व नारायण आपटे या दोन मारेकऱ्यांना फाशी देऊन (१५ नोव्हेंबर १९४९) ६७ वर्षे उलटलीत.

  • तसेच हत्येमागचे षड्यंत्र शोधण्यासाठी नेमलेल्या जे.एल. कपूर आयोगाच्या अहवालालाही (१९६९) सुमारे ४७ वर्षे झाल्याचा संदर्भ देत खंडपीठाने फेरतपासाबाबत कायद्यानेही फार काही करता येणार नसल्याचे सूचित केले. 

  • ३० ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली आहे.

जागतिक बँक - भारतीय अर्थव्यवस्थेतील मरगळ तात्पुरती :
  • भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक असून, जीएसटीचे हे तात्पुरते परिणाम आहेत, येत्या काही महिन्यांत ही मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

  • जीएसटीवरून मोदी सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत असताना, जागतिक बँकेने मात्र जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.

  • जीएसटी लागू केल्याने भारतात अनेक सकारात्मक बदल होतील, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम म्हणाले, जीएसटीनंतरच्या तीन महिन्यांत अर्थव्यवस्थेत घसरण झाल्याचे जे पाहायला मिळाले आहे, त्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहू नका.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व्यापाराला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करीत असून त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच फळ येईल, असेही त्यांनी सांगितले.

  • विदेशी गुंतवणूक भारतात यावी, यासाठीही प्रयत्न होत आहेत. पण निरक्षरता व आरोग्यविषयक आव्हानांना भारत तोंड देत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.

केंद्र सरकारचा निर्णय पोस्ट आॅफिसातील व्यवहारांनाही ‘आधार’ :
  • टपाल कार्यालयांतील गुंतवणूक, पब्लिक प्रॉव्हिडंड फंड म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि किसान विकास पत्रे यांनाही आता आधार बंधनकारक करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

  • या प्रकारची गुंतवणूक असणा-यांना ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी आपला १२ अंकी आधार क्रमांक संबंधित कार्यालयात सादर करावा लागणार आहे.

  • वित्त मंत्रालयाने चार स्वतंत्र गॅझेट अधिसूचना जारी करून या गुंतवणूक योजनांत आधार बंधनकारक केला असून २९ सप्टेंबर रोजीच या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.

  • यापुढे आधार क्रमांक सादर केल्याशिवाय या योजनांत गुंतवणूकच करता येणार नसून ज्यांनी आधीच गुंतवणूक केली आहे, त्यांनाही आधार क्रमांक सादर करावा लागेल.

  • ज्या गुंतवणूकदारांना आधार क्रमांक मिळालेला नसेल, त्यांना आधारसाठी केलेल्या अर्जाची प्रत सादर करावी लागेल, बँक खात्यांना आधार क्रमांकाने जोडण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे.

  • आधार क्रमांक प्राप्त करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत आधी असून ती आता वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे, भारत सरकारच्या ३५ मंत्रालयांमार्फत १३५ कल्याणकारी योजना राबविल्या जातात.

  • गरीब महिलांना मोफत स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल आणि खतांवरील सबसिडी, सार्वजनिक वितरणप्रणालीमार्फत चालविण्या येणारी स्वस्त धान्य दुकाने, मनरेगा आदी योजनांचा त्यात समावेश आहे.

गंभीर परिणाम भोगावे लागतील - पाकिस्तानने भारताला दिली धमकी :
  • जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर मागच्या वर्षभरात भारत-पाकिस्तानच्या सैन्यात अनेकदा तुंबळ संघर्ष झाला असून मर्यादीत स्वरुपाच्या या लढाईमध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे पार  मोडून टाकले आहे.

  • पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी भारताला धमकी दिली असून भारताने सर्जिकल स्ट्राईककरुन आमच्या अणवस्त्र तळांना लक्ष्य केले तर, भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावेलागतील. 

  • ख्वाजा असिफ सध्या अमेरिका दौ-यावर असून तिथून बोलताना त्यांनी भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. 

  • केंद्र सरकारने आणखी एका सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला तर, पाकिस्तानात घुसून त्यांचे अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे असे हवाई दल प्रमुख धानोआ यांनी सांगितले होते.

  • पाकिस्तानातील अणवस्त्राचे तळ शोधून तिथे हल्ला करु शकते असे धानोआ म्हणाले होते, पाकिस्तान वारंवार त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांची धमकी भारताला देत असतो. त्या पार्श्वभूमीवर बी.एस.धानोआ यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला होता. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस : ०७ ऑक्टोबर ३७६१

  • आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन

जन्म /वाढदिवस

  • एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्ट चे निर्माते शमौन कोवेल यांचा जन्म : ०७ ऑक्टोबर १९५९

  • कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म : ०७ ऑक्टोबर १९१७

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू : ०७ ऑक्टोबर १७०८

  • महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन : ०७ ऑक्टोबर १९९८

  • साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन : ०७ ऑक्टोबर १९९९

ठळक घटना

  • महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले : ०७ ऑक्टोबर १९१९

  • के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली : ०७ ऑक्टोबर १९१९

  • सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक : ०७ ऑक्टोबर २००२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.