चालू घडामोडी - ०८ ऑगस्ट २०१७

Date : 8 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुजरात राज्यसभा निवडणूक : अहमद पटेल यांची प्रतिष्ठा पणाला
  • गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे, या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव व नेते अहमद पटेल यांच्यासहीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व बलवंत सिंह राजपूत यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.  

  • अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनीती आहे. 

  • केंद्रातील सत्ताधारी भाजपाने येथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी व बलंवत सिंह राजपूत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

  • शाह व इराणी यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र राजपूत यांना जिंकवण्यासाठी व पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजपाला अतिरिक्त मतं मिळवणे गरजेचं आहे. 

आनंदचा कारुआनावर दमदार विजय : 
  • विश्वविजेतेपदावर पाच वेळा आपले नाव कोरणाऱ्या विश्वनाथन आनंदने फॅबिआनो कारुआना या तुल्यबळ खेळाडूला अवघ्या २७ चालींमध्ये पराभूत केले आणि सिंक्वूफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

  • फ्रान्सच्या व्हॅचिअर लाग्रेव्हने साडेतीन गुणांसह आघाडी स्थान कायम राखले आहे. त्याने पाचव्या फेरीत लिवॉन आरोनियनला बरोबरीत रोखले.

  • विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन या नॉर्वेच्या खेळाडूने चौथ्या फेरीतील पराभवानंतर वेस्ली सो याच्यावर मात करीत तिसऱ्या स्थानावर मजल गाठली, आनंद व कार्लसन यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत मात्र प्रगत गुणांच्या आधारे ते अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

  • आरोनियन, कारुआना, सर्जी कर्याकिन यांचे प्रत्येकी अडीच गुण झाले आहेत. हिकारू नाकामुरा, पीटर स्विडलर, इयान नेपोमिचिछी व वेस्ली यांनी पाचव्या फेरीअखेर प्रत्येकी दोन गुण मिळविले आहेत. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचं निधन : 
  • कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेळगावमधील यमुनापूर या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • डॉ. गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली.

  • महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये त्यांनी मोठं काम केलं असून पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.

  • डॉ. गस्ती यांनी गावातील शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयात त्यांनी पीएचडी मिळवली होती. डॉ. गस्ती यांनी सामाजिक कार्यासह लेखनही केलं. 

नोव्हेंबर महिना अखेरीस येणार हैदराबादमध्ये : इवांका ट्रम्प
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हैद्राबादमध्ये येणार असल्याचं समजतं आहे.

  • २८ नोव्हेंबर रोजी हैद्राबादमध्ये होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी इवांका ट्रम्प हैद्राबादमध्ये येणार आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हैदराबादमध्ये येणार असल्याचं समजतं आहे.

  • इंडियन एक्स्प्रेसला सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या परिषदेला हजेरी लावणार आहे, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१० मध्ये ही परिषद सुरू केली असून यंदाचं परिषदेचं हे आठवं वर्ष आहे. 

राजीवकुमार यांची निती आयोग उपाध्यक्षपदी नियुक्ती :
  • राजीवकुमार यांच्याबरोबरच 'एम्स'मधील बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख विनोद पॉल यांचीही निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. 

  • निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ राजीवकुमार यांची नियुक्ती झाली आहे, अरविंद पंगारिया यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.

  • राजीवकुमार हे धोरण आणि संशोधन विभागाचे वरिष्ठ फेलो होते, कुमार यांनी ऑक्‍सफर्ड विद्यापीठातून डी.फिल आणि लखनौ विद्यापीठातून पी.एच.डी. प्राप्त केली आहे.

  • २००६ ते २००८ या काळात राजीवकुमार हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचेही सदस्य होते, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत, तसेच विविध वित्तसंस्थांमध्ये त्यांनी वरीष्ठ पदांवर काम केले आहे.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • पितृ दिन : तैवान (मँडेरिन भाषेत बा बा या शब्दांचा अर्थ वडील असा होतो!)

जन्म, वाढदिवस

  • दादा कोंडके, मराठी लोकप्रिय अभिनेते : ०८ ऑगस्ट १९३२

  • वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ : ०८ ऑगस्ट १९२१

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • लोथार, लोथारिंजियाचा राजा : ०८ ऑगस्ट ८६९

ठळक घटना

  • चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला : ०८ ऑगस्ट १९४२

  • सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना : ०८ ऑगस्ट १५०९

  • भुतानच्या राष्ट्राची स्थापना : ०८ ऑगस्ट १९४९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.