चालू घडामोडी - ०८ डिसेंबर २०१७

Date : 8 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचे ड्रोन चुकून घुसले चीनच्या हद्दीत , चौकशीचे आदेश :
  • नवी दिल्ली : भारताचे एक ड्रोन काही तांत्रिक समस्येमुळे सिक्कीममधून चीनच्या हद्दीत गेले. सीमा सुरक्षा दलाने प्रोटोकॉलनुसार ही माहिती चीनच्या समकक्ष अधिकाºयांना दिली.

  • त्यानंतर हे ड्रोन परत घेण्यात आले. या घटनेमागचे नेमके कारण काय आहे याचा तपास करण्यात येत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

  • रशिया-भारत-चीन यांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी चीनचे विदेश मंत्री वांग री को हे ११ डिसेंबर रोजी भारतात येत आहेत. अशा काळात ही घटना घडली आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, नियमित सराव करत असताना एक मानवरहित विमानाचा (ड्रोन) संपर्क तुटला आणि हे विमान सिक्कीममधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून पलीकडे गेले. हवाई हद्दीत घुसले ड्रोन

  • बीजिंग : आमच्या हवाई हद्दीत भारताचे ड्रोन अनधिकृतपणे घुसल्याचा आरोप चीनने केला आहे. हे ड्रोन नंतर सिक्कीम क्षेत्रात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावाही चीनने केला आहे. याबाबत आम्ही विरोध नोंदविला असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे.

राज्य गुप्त वार्ता विभागाचे, ‘इंटेलिजन्स’चे आता गावागावांत नेटवर्क :
  • यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून कोलमडलेले राज्य गुप्तवार्ता विभागाचे (स्टेट इंटेलिजन्स) नेटवर्क आता पुन्हा उभे राहू पाहात आहे. गुप्तवार्ता आयुक्तालयाच्या सुचनेवरून गावखेड्यापर्यंत यंत्रणा उभी केली जात असून त्यात गाव प्रशासनातील घटक व राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांची ‘खबरी’ म्हणून मदत घेतली जात आहे.

  • राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी) हा शासनाचे कान-नाक-डोळे म्हणून ओळखला जातो. पूर्वी कोणत्याही घटना-घडामोडीची पहिली खबर गुप्तचर यंत्रणेला मिळायची.

  • त्यामुळे पोलीस यंत्रणाही गुप्तचरांपासून वचकून राहायची. परंतु गेल्या काही वर्षात गुप्तचर विभागाचे जाळे खिळखिळे झाले. त्यामुळे पोलिसांच्या मागावर राहण्याची वेळ गुप्तचरांवर आली.

एनएसजी सदस्यत्वासाठी रशियानं भारताला दिलं समर्थन, चीन आणि पाकला झटका :
  • नवी दिल्ली- रशियानं एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शवल्यानं चीन आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मॉस्कोमध्ये रशिया आणि चीनची विविध विषयांवर एक बैठक सुरू आहे. त्या बैठकीदरम्यान रशियानं हे विधान केलं आहे.

  • एनएसजी सदस्यत्वासाठी भारताच्या दावेदारीची पाकिस्तानशी तुलना होऊ शकत नाही, असं रशियानं चीनला सुनावलं आहे. भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला चीननं वारंवार विरोध केला आहे.

  • 48 सदस्य असलेल्या एनएसजी ग्रुपच्या विस्तारासाठी एक परीक्षा निवडण्यात यावी. त्यानंतरच मेरिटच्या आधारावर एखाद्या देशाला सदस्यत्व देण्यात यावं, अशी एक अट चीननं ठेवली आहे.

  • एनएसजी ग्रुप आंतरराष्ट्रीय स्तरावर आण्विक व्यापाराला नियंत्रित करतो. भारताच्या दावेदारीला चीन नेहमीच पाकिस्तानच्या चष्म्यातून पाहतो. यासंदर्भात भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेय रायबकोव्ह यांचीही भेट घेतली होती.

  • रशियानं पहिल्यांदाच दोन प्रकरणांना एकत्र जोडण्यावर असहमती दर्शवत सार्वजनिक विधान केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र या संघटनेच्या नियमांनुसार नवा सदस्य म्हणून भारताला प्रवेश देण्यासाठी चीनची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

सहा दशकानंतर म्हैसूर राजघराण्यात पुत्र जन्म :
  • तब्बल सहा दशकानंतर म्हैसूर संस्थानच्या यदूवंशाला पुत्रप्राप्ती झाली आहे. राणी त्रिषिका कुमारी यांच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला आहे. त्यामुळे राजमाता प्रमोदादेवी व राजा यदुवीर यांचा आनंद व्दिगुणीत झाला आहे.

  • बंगळुरातील इंदिरानगरातील खासगी रुग्णालयात राणी त्रिषिका कुमारी यांनी 6 डिसेंबर रोजी रात्री 9-50 वाजता राजवंशाच्या पुत्राला जन्म दिला. राजमाता प्रमोदादेवी व राजा यदुवीर जातीने बाळाची व बाळाच्या आईची काळजी घेत आहेत.

  • यापूर्वी 1953 मध्ये श्रीकंठदत्त नरसिंहराज वडेयर यांचा राजघराण्यात जन्म झाला होता. त्यांनंतर आजवर राजघराण्याला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे राजमाता प्रमोदादेवी यांनी यदूवीर यांना राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून दत्तक घेतले होते.

  • त्रिषिका कुमारींना पुत्रप्राप्ती झाल्याचे समजताच म्हैसूर येथील राजवाडा व म्हैसूर शहरातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजा यदुवीर यांच्यावर राज्यभरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वंदे मातरम् वाद प्रकरण : 'माँ'ला सलाम नाही करणार, मग काय अफझल गुरूला करणार का? - व्यंकय्या नायडूंचा हल्लाबोल :
  • नवी दिल्ली - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिवंगत विहिंप नेते अशोक सिंघल यांच्यावर आधारित लिहिण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान 'वंदे मातरम्' वरुन सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ''वंदे मातरम् गाण्यास लोकांना काय समस्या आहे. 'वंदे मातरम्'वरुन वादविवाद होताना दिसत आहेत. 

  • माँ तुझे सलाम, आईला सलाम नाही करणार तर मग कुणाला करणार? अफझल गुरूला सलाम करणार का?'', असे वक्तव्य करत व्यंकय्या नायडू यांनी वंदे मातरम् न गाणा-यांवर हल्लाबोल चढवला आहे.  

  • वंदे मातरम् म्हणजे मातृभूमीचे नमनं करणं असे सांगत नायडू पुढे म्हणाले की, ''जेव्ही कुणी भारत माता की जय असे म्हणतं, तेव्हा याचा देवासोबत काहीही संबध नसतो. यावेळी नायडू यांनी 1995 साली सुप्रीम कोर्टाकडून हिंदुत्ववर देण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत म्हटले की, हिंदू धर्म नाही तर जगण्याची एक पद्धत आहे.

  • हिंदू धर्म संकुचित संकल्पना नसून देशाचा एक व्यापक सांस्कृतिक असा अर्थ आहे. हिंदू धर्म भारताची संस्कृती आणि परंपरा आहे''.

आधार जोडणीला देणार ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ! , आज निघणार अधिसूचना :
  • नवी दिल्ली : सर्व सरकारी तसेच मोबाइल, पॅन आदी सेवांना आधारशी जोडण्यासाठी असलेली ३१ डिसेंबरची मुदत वाढवून ३१ मार्च २०१८ करण्यात येणार असून, ८ डिसेंबर रोजी सरकार यासंबंधीची अधिसूचना जारी करेल, अशी माहिती अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.

  • १३९ शासकीय सेवांना आधार जोडणीसाठी मुदतवाढ मिळणार आहे. त्यात बँक खात्यांचाही समावेश असेल. आधार जोडणी न केल्यास बँक खाती अवरोधित करण्यात येणार आहेत.

  • सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठासमोर हे प्रकरण आले असता अ‍ॅड. वेणुगोपाल यांनी सांगितले की, मोबाइल क्रमांक आधारशी जोडण्यास मात्र मुदतवाढ देण्यात येणार नाही. मोबाइल आधारशी जोडण्यास ६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

  • लोक निती फाउंडेशन खटल्यात सर्वोच्च न्यायालयानेच ही मुदत घालून दिलेली आहे. त्यामुळे मोबाइल-आधार जोडणीला मुदतवाढ द्यायची असेल, तर न्यायालयाचा आदेश लागेल.

  • आधार योजनेच्या वैधतेला आव्हान देणाºया याचिकांची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती अ‍ॅड. पी. बी. सुरेश, विपीन नायर आणि श्याम दिवाण यांनी केली होती. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.

  • १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.

  • १९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.

  • १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.

  • १९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.

  • १९८५: सार्क परिषदेची स्थापना.

  • २००४: रवींद्रनाथ टागोर  यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.

  • २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.

  • २०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.

जन्म

  • १७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)

  • १७६५: प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८२५)

  • १८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च१९४७)

  • १८७७: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९५५)

  • १८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)

  • १८९७: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)

मृत्य

  • १९७८: इस्रायलच्या ४थ्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन. (जन्म: ३ मे१८९८)

  • २००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.

  • २०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.