चालू घडामोडी - ०८ डिसेंबर २०१८

Date : 8 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम नवे मुख्य आर्थिक सल्लागार :
  • इंडिअन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत राहतील. यापूर्वी या पदावर असलेल्या अरविंद सुब्रमण्यम यांची ते जागा घेतील. अरविंद सुब्रमण्यम यांनी याच वर्षी जुलै महिन्यांत व्यक्तिगत कारणाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

  • डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे सध्या इंडिअन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेमध्ये फायनान्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. शिकागोमधून त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली आहे. तसेच आयआयटी आणि आयआयएममधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. सुब्रमण्यम यांची गणना जगातील उच्च स्तरीय बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिक पॉलिसी तज्ज्ञांमध्ये होते.

  • सेबीच्या कॉर्पोरेट गवर्नन्स तज्ज्ञांची समिती आणि आरबीआयसाठी बँकांच्या गव्हर्नन्सचे काम करणाऱ्या समितीचा भाग असण्याबरोबर कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि भारतात बँकिंग सुधारणांसाठी त्यांना ओळखले जाते. या सर्व क्षेत्रांमधील त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. सुब्रमण्यम हे वैकल्पिक गुंतवणूक धोरण, प्राथमिक-माध्यमिक बाजार आणि संशोधनावर आधारित सेबीच्या समितीचा भागही राहिले आहेत.

  • करिअरच्या सुरुवातीला त्यांनी न्यूयॉर्कमधील जेपी मॉर्गन या कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी आयसीआयसीआयच्या एलाइट डिरेव्हेटिव्हज गटात व्यवस्थापक म्हणून आपली सेवा दिली आहे.

देशभरात दहा वर्षांत ३८४ वाघांची शिकार :
  • महाराष्ट्रात अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार मारल्याचे प्रकरण गाजत असतानाच देशात शिकाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत ३८४ वाघांना ठार केल्याचे माहिती अधिकारातील अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरातून उघड झाले.

  • याचा दुसरा अर्थ दर महिन्याला तीन वाघांची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २००८ ते २०१८ दरम्यान एकूण ९६१ जणांना वाघाची शिकार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने नोईडा येथील वकील रंजन तोमर यांनी माहिती अधिकारात केलेल्या अर्जावर ही माहिती दिली आहे.

  • तोमर हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून त्यांनी गेल्या दहा वर्षांत शिकाऱ्यांनी किती वाघांना ठार मारले व त्यातील किती जणांना शिक्षा झाल्या, असा प्रश्न विचारला होता. विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार १० वर्षांत ३८४ वाघ मारले गेले असून त्यात ९६१ शिकाऱ्यांना अटक झाली आहे. यात किती जणांना शिक्षा झाल्या याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

परग्रहावरील लोक पृथ्वीवर येऊन गेले असतील :
  • वॉशिंग्टन : परग्रहावर जीवसृष्टीचे अस्तित्व असण्याची शक्यता नासाच्या एका शास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे. तेथील लोक म्हणजे एलियन्स पृथ्वीवर येऊनही गेले असतील; पण ते आपल्याला समजले नसेल, असेही त्याने म्हटले आहे.

  • आपल्या सूर्यमालेबाहेर जे असंख्य ग्रह, तारे आहेत. त्यावर जीवसृष्टी आहे का, याचा खगोलशास्त्रज्ञ अथक शोध घेत आहेत. परग्रहावरील माणसे पृथ्वीवर येऊन गेल्याचे अनेक जण सांगतात. त्याचे काही पुरावेही देतात; पण त्यांच्या अस्तित्वाबद्दल ठोस माहिती हाती लागलेली नाही. या माणसांवर आधारित अनेक कथा-कादंबऱ्या लिहिण्यात आल्या.

  • चित्रपटही निघाले; पण ते काल्पनिक सदरात मोडणारे आहेत. नासा रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञ सिल्वानो कोलोम्बानो यांनी एका शोधनिबंधात म्हटले आहे की, पृथ्वीवरील माणसांची परग्रहावरील माणसांविषयी जी कल्पना आहे त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे दिसत असावेत. ही माणसे अधिक हुशार तसेच आकाराने सूक्ष्मही असू शकतात. त्यांचा’ इतिहास प्राचीन?

  • नासाचे शास्त्रज्ञ सिल्वानो कोलोम्बानो यांनी म्हटले आहे की, परग्रहावरील माणसांबाबत आपल्या ज्या संकल्पना आहेत त्यात काही बदल केले तर त्यांचा नव्या दृष्टिकोनातून शोध घेता येईल. पृथ्वीवरील मानवी संस्कृतीचा योग्य विकास खºया अर्थाने १० हजार वर्षांपूर्वी सुरू झाला. माणूस वापरत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला ५०० वर्षांपूर्वीपासून प्रारंभ झाला. आपल्या मानवी संस्कृतीच्या इतिहासापेक्षा परग्रहांवरील माणसांच्या अस्तित्वाचा इतिहास आणखी प्राचीन असू शकेल.

‘बुद्धिमत्ता असूनही देशाची प्रगती नाही’ :
  • नवी दिल्ली : ‘मोठी आडनावे’ असलेल्यांनी देशावर राज्य केले; परंतु उत्तम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक संसाधने असूनही देश प्रगती करू शकला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर टीका केली. पूर्वी पक्षांच्या मतपेट्यांना फटका बसेल म्हणून दारिद्र्य निर्मूलन झाले नसल्याचा आरोपही मोदी यांनी केला.

  • ‘जागरण फोरम’मध्ये नेहरू-गांधी कुटुंबांचा अप्रत्यक्ष उल्लेख करून मोदी म्हणाले की, मोठी आडनावे असलेले लोक सत्तेत आले आणि गेलेही; परंतु प्रश्नांना उत्तरे सापडलेली नाहीत.

पाच राज्यांचे निकाल देतील लोकसभा निवडणुकांचा कल :
  • नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात असून, ११ डिसेंबर रोजी त्यांचे निकाल काय लागतात, त्यावर भाजपा व काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. जनता अद्यापही भाजपाच्या बाजूने आहे की पुन्हा काँग्रेसच्या बाजूने वळू लागली आहे, हे या निकालांतून स्पष्ट होणार आहे.

  • पाचही राज्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत गेल्या निवडणुकांत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. छत्तीसगड व मध्य प्रदेश १५ वर्षे भाजपाकडे आहेत. हा भाग उत्तर भारतातील आहे. त्यामुळे हे निकाल उत्तर भारतातील मतदारांचाच कल सांगणारे असू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा उत्तर भारतातच मिळाल्या होत्या आणि त्याआधारेच केंद्रात सत्ता स्थापन करणे शक्य झाले होते. नेमक्या या राज्यांत भाजपाला आता फटका बसला तर त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर होईल.

  • या पाचपैकी किमान दोन राज्ये तरी आपल्याला मिळावीत, असा काँग्रेसचा प्रयत्न होता. मध्य प्रदेश व राजस्थान ही दोन राज्ये भाजपाच्या हातातून निसटून काँग्रेसकडे आली, तर त्या पक्षाचे नेते हर्ष-उल्हासाने नाचूच लागतील. तरीही काँग्रेसची नजर मात्र राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडवर आहे. तिथे भाजपाला हादरा बसणे काँग्रेसला महत्त्वाचे वाटते.

  • काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व पक्षात सर्वमान्य असले तरी त्यांनी विजय मिळवून दिला, हे काँग्रेसजनांना पाहण्याची इच्छा असणार. स्वत: राहुल गांधी यांचीही यापेक्षा वेगळी इच्छा असू शकत नाही. त्यामुळेच भाजपा व काँग्रेस यांच्यासाठी ही सेमिफायनल अतिशय अत्यंत महत्त्वाची आहे.

निजामुद्दीन दर्ग्यात महिला प्रवेशावर होणार सुनावणी :
  • नवी दिल्ली : येथील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी पुण्यातील कायदा शाखेच्या विद्यार्थिनींनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. महिलांना प्रवेशबंदी असल्याची नोटीस या दर्ग्याबाहेर लावण्यात आली आहे.

  • २७ नोव्हेंबरला या विद्यार्थिनी तिथे गेल्या असता ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, ही प्रवेशबंदी घटनाबाह्य असल्याचे जाहीर करून, दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार, दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस, दर्ग्याचे विश्वस्त मंडळ यांना योग्य ती पावले उचलण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा.

  • कवाल्यांसाठी प्रसिद्ध हजरत निजामुद्दीन औलिया हा दिल्लीतील अत्यंत प्रसिद्ध दर्गा असून, तिथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. येथे संध्याकाळी कवालीचे होणारे कार्यक्रम देशभरात प्रसिद्ध आहेत. अनेक नामवंत कलाकार या दर्ग्यात आपली कला सादर करायला मिळणे हे भाग्याचे लक्षण समजतात.

मराठा समाजाचे जात प्रमाणपत्र कसे असेल :
  • मुंबई : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर आता या दिशेने पुढील पाऊल टाकले जात आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. त्याचप्रमाणे ही दोन्ही प्रमाणपत्रं कशी असतील, याचे नमुने जारी केले आहेत.

  • राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच राज्य सरकारने हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करुन 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले.

  • मराठा समाजाला या प्रवर्गाचे फायदे मिळावेत आणि आगामी मेगा भरतीत सोयीचे व्हावे, यासाठी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गाच्या जातीचे प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने जीआर जारी करुन मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गासाठी देण्यात येणारी जात प्रमाणत्रे ग्राह्य धरली जावी, असे आदेश काढले आहेत.

  • या शासन निर्णयासोबतच जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र कसे असेल त्याचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार आता मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.

  • १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.

  • १९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.

  • १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.

  • १९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.

  • १९८५: सार्क परिषदेची स्थापना.

  • २००४: रवींद्रनाथ टागोर  यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.

  • २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.

जन्म 

  • १७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)

  • १७६५: प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८२५)

  • १८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)

  • १८७७: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९५५)

  • १८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)

  • १८९७: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)

  • १९००: जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिगदर्शक उदय शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)

  • १९३५: चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.

  • १९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.

  • १९४४: चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.

  • १९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९७८: इस्रायलच्या ४थ्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९८)

  • २००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.

  • २०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.