चालू घडामोडी - ०८ फेब्रुवारी २०१८

Date : 8 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्या प्रकरणी सलग सुनावणीचा निर्णय होण्याची शक्यता :
  • नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणात आजपासून सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. यावेळी रोजच्या रोज सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे.

  • अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सात ऑगस्टला विशेष खंडपीठ तयार करण्यात आलं आहे. त्यात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

  • आज (गुरुवार) दुपारी दोन वाजता याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेची सुनावणी 2019 पर्यंत टाळावी अशी मागणी मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी केली. मात्र कोर्टानं त्याला स्पष्ट नकार दिला.

  • यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानं वादग्रस्त जमिनीचे तीन भाग केले. त्यात एक हिस्सा सुन्नी वक्फ बोर्ड एक भाग निर्मोही अखाडा आणि तिसरा भाग राम ललासाठी वाटून देण्याचा निर्णय दिला होता. आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं आहे.(source :abpmajha)

दुबईतील भारतीयाला 6.41 कोटींची लॉटरी, आतापर्यंत 124 भारतीय झालेत मालामाल :
  • नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये 6.41 कोटीं रुपयांची लॉटरी लागली आहे. टॉम एरेक्कल मणी असे त्या व्यक्तीचे नाव असून तो बंगळुरुचा राहणार आहे. ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये आतापर्यंत 124 भारतीय वंशाचे लोक मालामाल झाले आहेत. 

  • ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ची सुरुवात 1999मध्ये झाली आहे. टॉम एरेक्कल मणी व्यतिरिक्त 124 भारतीयांनी ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये प्रत्येकानं एक मिलियन डॉलर जिंकले आहेत.  खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार टॉम एरेक्कल मणी यांचा तिकीट नंबर 2190 लॉटरीमध्ये लागला. आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल या लॉटरीची सोडत काढण्यात आली

  • आंतरराष्ट्रीय कार्ड कंपनीमध्ये काम करत असलेलेल्या 38 वर्षीय मणी यांनी गेल्यावर्षी ते तिकीट खरेदी केलं होतं. मिळालेल्या वृत्तानुसार, लॉटरी लागल्याचे समजताच टॉम एरेक्कल मणी यांचा आनंदाला पारा उरला नाही. मणी म्हणाले की, मला समजत नाही मी काय कारु, मी खूप आनंदी आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्या जवळ शब्द नाहीत. माल आजूनही यावर विश्वास बसत नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात म्हत्वाची बातमी देण्याबद्दल ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ला मी धन्यवाद म्हणतो. 

  •  दुबई: 8 जानेवारी रोजी ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ या लॉटरीचे पहिल्या क्रमांकाचे जॅकपॉट बक्षीसही भारतीय वंशाच्या हरिकृष्णन व्ही. नायर यांनी जिंकले होते. नायर यांना बक्षिसापोटी १३ दशलक्ष संयुक्त अरब अमिरातीचे दिरहम (सुमारे २०.६७ कोटी रुपये) एवढी रक्कम मिळाली होती. 

  • या लॉटरीची तिकिटे आॅनलाइन किंवा विमानतळांवर खरेदी करण्याची सोय होती. ५०० दिरहमचे एक तिकीट घेतल्यास, त्यावर आणखी एक तिकीट मोफत दिले जात होते. नायर यांचे नशीब एवढे बलवत्तर की, त्यांना अशा मोफत मिळालेल्या तिकिटावर हे जॅकपॉटचे बक्षीस लागले. एवढे मोठे बक्षीस लागल्याचे समजल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची व नंतर आनंदाची होती! एकटे नायरच नव्हेत, तर इतर चार भारतीयांनाही या लॉटरीने साथ दिली. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.(source :Lokmat)

‘केंद्राने आंध्र प्रदेशला दिलेल्या रकमेपेक्षा ‘बाहुबली’ची कमाई जास्त’ :
  • यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने आंध्र प्रदेशसाठी दिलेल्या निधीवरून नाराज असलेल्या तेलुगू देशम पक्षाने (टीडीपी) ‘फिल्मी टर्न’ घेतला आहे. टीडीपी खासदार जयदेव गल्ला यांनी केंद्र सरकार आणि अर्थमंत्र्यांनी आंध्र प्रदेशला दिलेल्या सर्व आश्वासनांची पुर्तता करावी अन्यथा भाजपाबरोबरील संबंधांबाबत पुनर्विचार करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसेल, अशा शब्दांत तंबीच दिली आहे.

  • अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला दिलेला निधी हा ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीच्या बॉक्स ऑफिस कमाईपेक्षा कमी असल्याचे त्यांनी म्हटले. चित्रपट समीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बाहुबली-२ द कॉन्क्लूजन’ची भारत आणि विदेशातील एकूण कमाई ही १७०० कोटी रूपये आहे. आंध्र प्रदेशला देण्यात येणारी रक्कम ही बाहुबलीच्या कमाईपेक्षा कमी असल्याचे जयदेव गल्ला यांनी लोकसभेत म्हटले. त्यानंतर टीडीपीच्या खासदारांनी सभात्याग केला.

  • वर्ष २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना जयदेव गल्ला म्हणाले, सरकारकडे ही अंतिम संधी आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळायला हवा. आंध्र प्रदेशला देण्यात आलेली आश्वासने पूर्ण केली जावीत. जर राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नसतील तर भाजपाप्रणीत आघाडीत का राहावे, असा सवाल करत आमच्या धैर्याची परीक्षा खूप झाली, असे ते म्हणाले. जर आश्वासने पूर्ण केली नाही तर पुढील निवडणुकीत भाजपाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इतर सहकारी पक्षांनाही चुकीचा संदेश जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

  • राजधानी अमरावती, पोलावरम आणि राज्याला विशेष पॅकेज आणि रेल्वे झोनबाबत या अर्थसंकल्पात कोणताच उल्लेख नाही. जर भाजपाला वाटत असेल की, युती तुटल्यानंतर आंध्रात त्यांचा पक्ष आणखी मजबूत होईल, टीडीपी कमजोर होईल, तर त्यांनी काँग्रेसची परिस्थिती पाहिली पाहिजे. त्यांचा एकही खासदार आणि आमदार राज्यात नाही, अशा शब्दांत त्यांना सुनावले. आंध्र प्रदेशाचे विभाजन करण्याची चूक केल्यानंतर काँग्रेसचे दोन्ही राज्यातून नामोनिशाण मिटले आहे.

  • आंध्र प्रदेशातील जनतेला मुर्ख बनवता येणार नाही, असे म्हणत जेटलींनी राज्यासाठी त्वरीत आर्थिक तरतूद करावी अशी मागणी केली. आंध्र प्रदेशमध्ये निवडणुका नसल्यामुळे केंद्र सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. अमरावतीत उच्च न्यायालय, सचिवालय, राजभवन आणि इतर कामांच्या आमच्या मागणीवर कोणतीच अंमलबजावणी झाली नसल्याचे ते म्हणाले.(source :loksatta)

मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप करु नका! चीनचा भारताला इशारा :
  • नवी दिल्ली - मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीवरुन  आता भारत आणि चीनमध्येच सामना सुरु झाला आहे. भारताने वेळप्रसंगी मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप करण्याची तयारी ठेवली आहे. त्यावर चीनने जोरदार आक्षेप घेतला आहे. मालदीवमध्ये अन्य कुठल्याही देशाच्या हस्तक्षेपाला आपला ठाम विरोध आहे असे चीनने म्हटले आहे. या विधानामागे चीनचा इशारा भारताकडे आहे. 

  • मालदीवमध्ये लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तिथल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारताकडे लष्करी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. मालदीवच्या सार्वभौमत्वाचा आदर राखून आंतरराष्ट्रीय सुमदाय रचनात्मक भूमिका निभावू शकतो. मालदीवमध्ये कोणतीही कारवाई केल्यास परिस्थिती अधिक चिघळू शकते असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. यात कुठेही भारताचा उल्लेख केलेला नाही. 

  • चीनने मालदीवबरोबर मुक्त व्यापाराचा करार केला आहे. पण या करारावर तिथल्या विरोधी पक्षांना आक्षेप आहे. हिंद महासागरात शिरकाव करण्यासाठी चीनने मालदीवमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीनचा हाच मनसुबा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. 

  • मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष सातत्याने भारताने काहीतरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करत आहेत. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष एमडीपीचे नेते मोहम्मद नाशीद यांनी भारताने लष्करी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.(source :Lokmat)

तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त :
  • मुंबई : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची पुण्याहून अवघ्या १० महिन्यात बदली करण्यात आली आहे. पीएमपी नावाने परिचित असणा-या या नागरी प्रवासी वाहतुकीत शिस्त आणण्याचे प्रयत्न करणा-या मुंडे यांना आता नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे.

  • तर नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सह कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. आयएएस अधिकाºयांना सध्या दोन महिन्यातच बदलले जात आहे तेथे तुकाराम मुंडे यांना १० महिने पुण्यात मिळाले. पीएमपीमध्ये नगरसेवकांनीच त्यांच्या वशिल्याने कंत्राटी कामगारांची भरती केली होती.

  • त्यातील काम न करणाºया २५० कंत्राटी कामगारांना मुंडे यांनी कामावरुन कमी केले होते. पीएमपीच्या इमारतीतील राष्टÑवादी काँग्रेसच्या कामगार संघटनेचे कार्यालय होते. ते हटविण्याची नोटीस मुंडे यांनी मंगळवारी दिली होती. मात्र, कारवाई करण्यापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी निघाले. मुंडे यांच्या जागी नैना गुंडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची बदली करण्यात आली होती ; पण ती भाजपा नेत्यांनीच रद्द करायला लावली. त्यामुळे त्या जागी आता एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • कुरुंदकर ३१ आॅगस्ट २०१८ ला निवृत्त होत आहेत. पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेमा देशभ्रतार यांची बदली सामाजिक न्याय विभागात उपसचिव म्हणून करण्यात आली आहे. दूध फेडरेशन (महानंद)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी दिपककुमार मिना यांची नेमणूक करण्यात आली आहे.(source :Lokmat)

आयडिया आणि एअरसेलचे नो कनेक्ट :
  • नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी आयडिया सेल्युलरने एअरसेलची आंतरजोडणी सुविधा (इंटरकनेक्ट सर्व्हिसेस) निलंबित केली आहे. एअरसेलकडे आंतरजोडणी शुल्काची मोठी रक्कम थकलेली असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आयडियाने म्हटले आहे.

  • आयडियाने म्हटले आहे की, एअरसेलने शुल्काची रक्कम जमा करताच, आंतरजोडणी सुविधा तातडीने पूर्ववत केली जाईल. थकीत रकमेसाठी नोव्हेंबर २0१७ पासून एअरसेलकडे पाठपुरावा केला जात आहे. तथापि, कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंतरजोडणी सेवा निलंबित करण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला.

  • सूत्रांनी सांगितले की, एका दूरसंचार कंपनीच्या नेटवर्कवरून दुसºया कंपनीच्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी आंतरजोडणी सुविधा गरजेची असते. आयडियाने ही सेवा बंद केल्याने, एअरसेलच्या नेटवर्कवरून आता आयडिया नेटवर्कवर फोन करता येणार नाही.(source: lokmat)

टीम इंडियाची विजयी ‘हॅट्ट्रिक’, कोहलीच्या तडाख्यानंतर ‘फिरकी’चा जलवा :
  • केपटाऊन : ‘रनमशिन’ विराट कोहलीच्या धमाकेदार नाबाद दीडशतकानंतर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकताना दक्षिण आफ्रिकेचा १२४ धावांनी धुव्वा उडवला. या शानदार विजयासह विराट सेनेने सहा सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारीत ५० षटकात ६ बाद ३०३ धावांची आव्हानात्मक मजल मारल्यानंतर यजमानांचा डाव ४० षटकात केवळ १७९ धावांत गुंडाळला. चहल - कुलदीप या फिरकी गोलंदाजांनी प्रत्येकी ४ बळी घेत पुन्हा एकदा यजमानांना आपल्या जाळ्यात अडकवले.

  • मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना द. आफ्रिकेचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला. दुसºया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने धोकादायक हाशिम आमलाला (१) पायचीत पकडून यजमानांच्या फलंदाजीला सुरुंग लावले. यानंतर कर्णधार एडेन मार्करम (३२) आणि अनुभवी जेपी ड्युमिनी (५१) यांनी ७८ धावांची भागीदारी करुन संघाला सावरले. कुलदीपने १७व्या षटकात मार्करमला बाद करुन ही जोडी फोडली.

  • यानंटर ठराविक अंतराने द. आफ्रिकेचे फलंदाज बाद झाले. यजमानांनी १०० धावांमध्ये ९ फलंदाज गमावल्याने त्यांचा डाव १ बाद ७९ वरुन १७९ धावांत संपुष्टात आला. कुलदीपने टिच्चून मारा करताना २३ धावांत ४, तर युझवेंद्रने ४६ धावांत ४ बळी बाद करुन यजमानांची ‘फिरकी’ घेतली. ड्युमिनीने ६७ चेंडूत ४ चौकारांसह ५१ धावा करत द. आफ्रिकेकडून एकाकी झुंज दिली.

  • तत्पुर्वी, कागिसो रबाडाने पहिले षटक निर्धाव टाकतानाच हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर बाद करत भारताला मोठा धक्का दिला. यावेळी, दक्षिण आफ्रिका जोरदार पुनरागमन करणार अशीच शक्यता होती.(source :Lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

  • १८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.

  • १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

  • १९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.

  • १९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

  • २०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

जन्म

  • १७००: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १७८२)

  • १८३४: रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलिएव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)

  • १८४४: भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.

  • १८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)

  • १९०९: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९९८)

  • १९६३: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.

मृत्यू

  • १९२७: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर१८४९)

  • १९७१: मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८८७)

  • १९७५: नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिनसन यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)

  • १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १९०२)

  • १९९५: भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन.

  • १९९९: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.